UPSC Full Form in Marathi: UPSC म्हणजे काय?

UPSC Full Form in Marathi
UPSC Full Form in Marathi: UPSC म्हणजे काय?

मित्रांनो तुम्ही UPSC बद्दल जरूर कुठे ना कुठे ऐकल असेल. परंतु, बऱ्याच लोकांना UPSC बद्दल पूर्ण माहिती नसते. तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये UPSC Full Form In Marathi, UPSC म्हणजे काय?, UPSC साठी लागणारी पात्रता, UPSC Meaning In Marathi अशी सर्व माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो मग आता वेळ वाया न घालवता आपण माहिती जाणून घेण्यास सुरवात करूया.

मित्रांनो आपण हा लेख पूर्ण शेवट पर्यंत वाचाल अशी आशा बाळगतो आणि जर या लेखाबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा ह्या लेखाबद्दल तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यावयाच्या असल्यास आम्हाला नक्की Comment करून सांगा. तसेच आपल्या मित्रांबरोबर हि माहिती नक्की Share करा जेणेकरून त्यांना पण UPSC Kay Aahe माहिती होईल.

UPSC Full Form in Marathi: UPSC म्हणजे काय?

Tweet

UPSC म्हणजे काय? UPSC kay aahe?

मित्रांनो ज्याप्रमाणे आपण आधीच बघितले आहे कि MPSC हि एक राज्य सरकारची संस्था आहे. त्याचप्रमाणे UPSC हि एक केंद्र सरकारची संस्था आहे. UPSC मध्ये राज्य सरकारचा कोण्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. 

UPSC ची स्थापना १ ऑक्टोबर १९२६ झाली होती. तसेच नंतर UPSC ला भारतीय संविधान २६ जानेवारी १९५० नुसार संविधानिक मान्यता देण्यात आली.

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास UPSC हि एक भरती प्रक्रिया राबविणारी केंद्र सरकारची संस्था आहे. हि संस्था प्रामुख्याने गट-अ व गट-ब म्हणजेच Class-1 व Class-2 या पदासाठी भरती प्रक्रिया राबविते.

UPSC Full Form In Marathi-UPSC फुल फॉर्म मराठीमध्ये

आपण UPSC बद्दल नेहमी बातम्या आणि वर्तमानपत्रामध्ये काही न काही वाचत असतोच. परंतु UPSC फुल फॉर्म काय होतो तेच माहिती नसते. तर चला आपण आता UPSC चा Full Form जाणून घेऊ.

तर मित्रांनो UPSC चा फुल फॉर्म इंग्लिश मध्ये हा “Union Public Service Commission” असा होतो. 
तसेच UPSC ला मराठीमध्ये “केंद्रीय लोकसेवा आयोग” किंवा “संघ लोकसेवा आयोग” असे म्हटले जाते.

UPSC परीक्षेसाठी पात्रता काय असते?

मित्रांनो दरवर्षी लाखो विद्यार्थी हे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) साठी तयारी करत असतात. तुमचे मित्रमंडळी किंवा नातेवाईक सुद्धा UPSC ची तयारी करत आहे असे बरेच वेळा तुम्ही ऐकले असेलंच. 

मग आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल कि आपण या परीक्षेसाठी पात्र आहोत का? तर हे माहित करण्यासाठी तुम्ही खाली दिलेली पात्रता बघू शकता.

UPSC साठी आवश्यक असलेली पात्रता.

  • या परीक्षेस पात्र होण्याकरिता सर्वप्रथम उमेदवाराकडे  कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे किंवा उमेदवार हा पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये परीक्षा देत आसावा. 
  • उमेदवार हा भारताचा नागरिक असावा लागतो. 
  • इतर मागासवर्गीय मधील (OBC)उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे आणि कमान वय हे ३५ वर्ष असणे गरजेचे आहे. 
  • अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) मधील उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे आणि कमान वय हे ३७ वर्ष असणे गरजेचे आहे.
  • तसेच सामान्य वर्गामधील उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे आणि कमान वय हे ३२ वर्ष असणे गरजेचे आहे.

तुमच्याकडे जर वर दिलेल्या सर्व गोष्टी असतील तर तुम्ही UPSC परीक्षा देऊ शकता.

UPSC द्वारे कोणत्या कोणत्या परीक्षा घेतल्या जातात?

UPSC द्वारे प्रामुख्याने गट-अ आणि गट-ब या पदासाठी परीक्षा घेतल्या जातात. आता आपण त्या कोणत्या परीक्षा आहेत ते जाणून घेणार आहोत.

  • राष्ट्रीय संरक्षण अकादमी National Defence Academy (NDA) 
  • नवल अकादमी परीक्षा – Naval Academy Examination (NAE)
  • एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा Combined Defense Services Exam (CDS)
  • नागरी सेवा परीक्षा – Civil Services Examination (CSE)
  • अभियांत्रिकी सेवा परीक्षा – Engineering Services Examination (ESE)
  • एकत्रित भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा – Combined Geo-Scientist and Geologist Examination.
  • केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाची परीक्षा – Central Armed Police Forces Examination (CAPF).
  • विशेष वर्ग रेल्वे शिक्षु परीक्षा – Special Class Railway Apprentices Exam (SCRA)
  • भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा – Indian Economic Service and Indian Statistical Service  Examination (IES/ISS).
  • एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (सीएमएस) – Combined Medical Services  Examination (CMS)
  • भारतीय वनीकरण सेवा परीक्षा – Indian Forestry Services Examination (IFoS).

UPSC परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

UPSC परीक्षेमध्ये IAS, IPS, IFS, IRS या पदासाठी ३ टप्यामध्ये परीक्षा घेतली जाते.

  • पूर्व परीक्षा (Prelims Exam)
  • मुख्य परीक्षा (Mains Exam)
  • मुलाखत (Interview)

पूर्व परीक्षा पास केल्यास उमेदवार मुख्य परीक्षेस पात्र होतो आणि मुख्य परीक्षेस पास झाल्यावर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलवले जाते. मुलाखती नंतर मग उमेदवाराला विशिष्ट पदासाठी नियुक्त केले जाते.

UPSC साठी अर्ज कसा करावा? UPSC Apply Online.

UPSC परीक्षेस अर्ज करण्यासाठी उमेदवाराला UPSC च्या अधिकारीक संकेतस्थाळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. 

तिथे उमेदवारास योग्य ती वयक्तिक माहिती भरावी लागते नंतर उमेदवाराचा पासपोर्ट फोटो,  स्वाक्षरी आणि काही महत्वाचे डॉक्युमेंट उपलोड करावे लागतात. 

नंतर उमेदवार ज्या पदासाठी पात्र आहे त्या पदासाठी अर्ज करू शकतात. 

इथे खाली मी UPSC(संघ लोकसेवा आयोग) चे अधिकारीक संकेतस्थळ सांगत आहे. तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

Apply Online For UPSC Exam / संघ लोकसेवा आयोग

हे पण जरूर वाचा : MPSC Full Form in Marathi: MPSC म्हणजे काय?

निष्कर्ष

आपण या लेखामध्ये बघितले कि UPSC म्हणजे काय?, UPSC Full Form In Marathi, UPSC परीक्षेसाठी लागणारी पात्रता काय असते?, UPSC द्वारे कोणत्या परीक्षा घेण्यात येतात?, UPSC परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?, UPSC साठी अर्ज कसा करावा लागतो? 

तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेल्या या माहिती मधून तुमच्या शंका दूर झाल्या असणारच. जर तुम्हाला UPSC बद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कंमेंट करून विचारू शकता. आम्ही तुम्हाला नक्की प्रतिसाद देऊ. 

आम्ही UPSC बद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला सांगा तसेच हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.

FAQ’s

  1. UPSC परीक्षा कोणता भाषेत होत असते?

    उत्तर: UPSC परीक्षा हि मराठी,हिंदी, इंग्लिश आणि अजून बऱ्याच भाषेत होत असते.

  2. UPSC साठी उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा का?

    उत्तर: हो, UPSC साठी उमेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा.

  3. UPSC साठी पात्र होण्याकरिता वय मर्यादा किती पाहिजे?

    उत्तर: UPSC साठी पात्र होण्याकरिता किमान वय मर्यादा हि २१ वर्षे आयला हवी.

  4. UPSC परीक्षा कितीदा देता येते?

    उत्तर: UPSC परीक्षा हि इतर मागासवर्गीय मधील (OBC) – ९, सामान्य वर्गामधील (General) – ६ आणि अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) मधील उमेदवारांना ३७ वर्षापर्यंत देता येते.

  5. UPSC म्हणजे काय?

    उत्तर: UPSC म्हणजे “संघ लोकसेवा आयोग”.

Share with your friends.
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •   
  •  

Leave a Comment