UGC Full Form In Marathi: UGC काय आहे?

UGC Full Form In Marathi
UGC Full Form In Marathi: UGC काय आहे?

नमस्कार मित्रांनो,

आपण शिक्षण घेत असताना किंवा महाविद्यालयात शिकतांना आपल्या कानावर UGC हा शब्द कधी न कधी आला असेलच. मग तुम्हाला प्रश्न सुद्धा पडला असेल कि हे UGC म्हणजे काय?

तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण UGC म्हणजे काय? UGC Full Form In Marathi काय? UGC चे महत्वपूर्ण उद्देश काय? इत्यादी बद्दल माहिती जाणून घेणार आहो. 

या लेखात UGC बद्दल सविस्तर माहिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे तरी तुमच्या सर्व शंका दूर करण्याकरिता तुम्ही ह्या लेखातील प्रत्येक शब्द वाचावा आणि या लेखात तुमच्या काही शंका शिल्लक असतील तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. 

चला तर मग आता वेळ वाया न घालवता जाणून घेऊया UGC Meaning In Marathi.

UGC Full Form In Marathi: UGC काय आहे?

Tweet

UGC म्हणजे काय? UGC Meaning In Marathi

आपण महाविद्यालयात शिकत असताना काही न कधी आपण UGC बद्दल ऐकत असतो. पण मग UGC काय आहे हे आपल्याला माहित आहे का? या लेखात आपण हेच जाणून घेणार आहोत. 

UGC हे एक शैक्षणिक क्षेत्रातील उच्च आयोग आहे. हे आयोग संसदेमध्ये एका अधिनियम द्वारा स्थापित करण्यात आले होते. ज्याचे काम हे भारतातील शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या विश्वविद्यालयांना सूचना देणे, अनुदान देणे, योग्य मार्गदर्शन करणे, शैक्षणिक सुव्यवस्था उपलब्ध करून देणे इत्यादी आहे. 

UGC हे पूर्णतः केंद्र सरकारद्वारा नियंत्रित केलेले एक आयोग आहे. तसेच महत्वाचे निर्णय घेणे, विद्यापीठांना योग्य आणि आवश्यक सुविधा पुरवणे इत्यादी कामे UGC अंतर्गत येतात.

UGC चा इतिहास?

आतापर्यंत वर दिलेल्या माहितीतून तुम्हाला लक्षात आलेच असेल कि UGC काय आहे. आता आपण UGC चा इतिहास जाणून घेणार आहोत.

UGC चा इतिहास खालीलप्रमाणे आहे.

 • स्वातंत्रपूर्व काळात १४४४ मध्ये सार्जंट समितीने शैक्षणिक आयोग सुरु करण्यावर पहिला प्रस्ताव आणला होता. 
 • १९४४ च्या शिफारशीनंतर १९४५ मध्ये या समितीचे गठन केल्या गेले परंतु या अंतर्गत फक्त दिल्ली, वाराणसी आणि अलिगढ या मध्ये येणाऱ्या विश्वविद्यालयांपुरतेच ते मर्यादित होते.
 • नंतर १९४७ मध्ये या शैक्षणिक आयोगाने भारतातील सर्वच विश्वविद्यालयांना नियंत्रित करायला सुरवात केली. 
 • १९४८ मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली एक प्रस्ताव आला त्यामध्ये विद्यापीठ शिक्षण आयोगाचे परिवर्तन करून त्याला विद्यापीठ अनुदान आयोग करण्यावर शिफारस करण्यात आली.
 • २८ डिसेंबर १९५३ रोजी त्याकाळचे शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम यांच्या हस्ते विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना करण्यात आली. 
 • नंतर १९५६ च्या कायद्यांनुसार UGC ला संवैधानिक दर्जा प्रदान करण्यात आला. 
 • UGC चे मुख्य कार्यालय सुरवातीपासून हे दिल्ली येथे आहे. 
 • तसेच १९९४ आणि १९९५ मध्ये UGC ने पुणे, भोपाळ, गुवाहाटी, बंगळुरू, कोलकाता आणि हैद्राबाद येथे सहा कार्यालये सुरु केले.

तर मित्रांनो हा होता UGC चा इतिहास. 

हे पण वाचा : Hanuman Chalisa Pdf Download

UGC Full Form In Marathi- UGC Long Form In Marathi

मित्रांनो आता आपण या भागात UGC चा फुल फॉर्म जाणून घेणार आहोत. 

मराठीत UGC चा फुल फॉर्म हा “विद्यापीठ अनुदान आयोग” असा होतो तर 

इंग्लिशमध्ये UGC चा फुल फॉर्म हा “University Grants Commission” असा होतो. 

तसेच हिंदी मध्ये UGC चा फुल फॉर्म हा “विश्वविद्यालय अनुदान अयोग” असा होतो. 

विद्यापीठांना अनुदान देणे आणि त्यांच्या समस्या कडे लक्ष देण्याचे काम UGC करत असते.

हे पण जरूर वाचा :  BHMS Full Form in Marathi: BHMS म्हणजे काय?

UGC चे महत्वपूर्ण उद्देश

UGC हे भारतातील शिक्षण पद्धत उत्तम करण्याकरिता काम करते. त्याचे महत्वपूर्ण उद्देश हे खालीलप्रमाणे आहेत:

 • UGC चा पहिला महत्वपूर्ण उद्देश म्हणजे असा कि देशात येणाऱ्या सर्व विद्यापीठांच्या शिक्षण, परीक्षा आणि संशोधन इत्यादीं बाबींवर लक्ष ठेवणे. 
 • आवश्यकता भासल्यास विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून नवीन नियम ठरवणे आणि त्याची अंबलबजावणी करणे हा सुद्धा एक महत्वाचा उद्देश UGC चा आहे. 
 • तसेच उच्च शिक्षा पुरवणे आणि त्याबद्दल मार्गदर्शन करणे. 
 • शिक्षण पद्धत अधिक चांगली करणे त्यासाठी नवनवीन उपाय योजना राबविणे. 
 • शिक्षण आणि सरकार यांच्यामध्ये समतोल राखणे. 
 • या शिवाय विद्यापीठांना येणाऱ्या वित्तीय अडचणींवर तोडगा काढणे. 
 • संशोधन आणि इतर विषयांचा अभ्यास करण्याकरिता शिक्षकांना अनुदान देणे. 
 • विद्यापीठा अंतर्गत होणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यशाळा, सेमिनार, संशोधन, प्रशिक्षण इतादींविषयी सुविधा पुरवणे.

UGC-NET परीक्षा काय आहे?

UGC म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग हे NET ची परीक्षा घेत असते. UG आणि PG कोर्स करण्याकरिता काही परीक्षा द्याव्या लागतात त्यामधील एक परीक्षा म्हणजे NET ची परीक्षा होय. 

NET चा फुल फॉर्म हा “National Eligibility Test” असा होतो. NET ची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर कॉलेज आणि विद्यापीठांमध्ये शिक्षक (प्रोफेसर) म्हणून नियुक्ती होते. 

NET हि खूप कठीण परीक्षा असते. हि परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो.

UGC अंतर्गत येणाऱ्या संस्था आणि विद्यालय

UGC अंतर्गत एकूण १६ महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था येतात. त्या संस्था आणि विद्यालय खालीलप्रमाणे आहेत.

 • अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद – All India Council for Technical Education (AICTE)
 • राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद – National Council for Teacher Education (NCTE)
 • भारतीय कृषी संशोधन परिषद – Indian Council of Agricultural Research (ICAR)
 • राष्ट्रीय ग्रामीण संस्थांसाठी परिषद – National Council for Rural Institutes (NCRI)
 • भारतीय दंत परिषद – Dental Council of India (DCI)
 • पुनर्वसन परिषद – Rehabilitation Council (RC)
 • कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर – Council of Architecture (CA)
 • फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया – Pharmacy Council of India (PCI)
 • दूरस्थ शिक्षण परिषद – Distance Education Council (DEC)
 • राज्य उच्च शिक्षण परिषद – State Councils of Higher Education (SCHE)
 • भारतीय पुनर्वसन परिषद – Rehabilitation Council of India (RCI)
 • सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन – Central Council of Indian Medicine (CCIM)
 • भारतीय वैद्यकीय परिषद – Medical Council of India (MCI)
 • सेंट्रल कौन्सिल ऑफ होमिओपॅथी – Central Council of Homoeopathy (CCH)
 • बार कौन्सिल ऑफ इंडिया – Bar Council of India (BCI)
 • इंडियन नर्सिंग कौन्सिल – Indian Nursing Council (INC)

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि UGC म्हणजे काय? UGC Long Form In Marathi काय? UGC चा इतिहास काय? UGC चे महत्वपूर्ण उद्देश, UGC-NET परीक्षा काय? UGC अंतर्गत कोणत्या संस्था आणि विद्यालय येतात? इत्यादी माहिती बघितली. 

मित्रांनो या लेखात दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या उपयोगी पडली असेलच. तसेच या लेखात तुम्हाला काही अडचण शिल्लक राहिली असेल किंवा अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली Comment करून आम्हाला नक्की कालवा.

तसेच हा लेख तुमच्या मित्रांबरोबर Share करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असल्यास आम्हाला निसंकोचपणे कळवा आम्ही आपल्याला नक्कीच प्रतिसाद देऊ. 

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

 1. कोणतेही विद्यालय UGC अंतर्गत असणे आवश्यक आहे का?

  उत्तर: होय, भारतातील कोणत्याही विद्यालयातून शिक्षण घेत असताना ते UGC अंतर्गत असणे आवश्यक आहे.

 2. विद्यालय आणि विद्यापीठ UGC अंतर्गत नसल्यास काय होते?

  उत्तर: विद्यालय आणि विद्यापीठ UGC अंतर्गत नसल्यास तुमच्या पूर्ण केलेल्या शिक्षणास काही मूल्य राहणार नाही, शिवाय तुम्हाला मिळालेली पदवी हि वैध मानली जाणार नाही.

 3. UGC ची स्थापना कधी करण्यात आली?

  उत्तर: UGC ची स्थापना हे २८ डिसेंबर १९५३ रोजी करण्यात आली.

 4. खासगी विद्यापीठ हे UGC द्वारा वैध असतात का?

  उत्तर: होय, खासगी विद्यापीठ UGC द्वारा वैध असतात परंतु त्यामध्ये प्रवेश घेण्याअगोदर एकदा खात्री करून घेणे महत्वाचे असते.

Leave a Comment