SSC Full Form In Marathi: SSC म्हणजे काय?

SSC Full Form In Marathi
SSC Full Form In Marathi: SSC म्हणजे काय?

मित्रांनो मला माहित आहे कि तुम्ही SSC Full Form In Marathi बद्दल जाणून घेण्यासाठी फार उत्सुक आहात. तर मित्रांनो आज आपण या लेखात SSC बद्दल बरीच माहिती जाणून घेणार आहोत.

आज आपण या लेखात SSC म्हणजे काय? SSC Long Form काय? SSC कोण देऊ शकते? SSC साठी लागणारी पात्रता? SSC स्थापना कधी झाली? SSC मार्फत विविध पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, SSC ची परीक्षा प्रक्रिया, SSC परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम कोणता? अश्या सर्व प्रश्नांनाची माहिती जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत वाचावा अशी माझी इच्छा आहे जेणेकरून तुम्हाला काही शंका राहणार नाही. तसेच हा लेख आवडल्यास खाली कंमेंट करून नक्की सांगा व आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात SSC Information In Marathi.

SSC Full Form In Marathi: SSC म्हणजे काय?

Tweet

SSC म्हणजे काय? SSC काय आहे?

मित्रांनो SSC हि एक सरकारी संस्था आहे जी विविध प्रकारच्या सरकारी भरती प्रक्रिया राबवत असते. 

आपण मागच्या काही लेखात बघितले कि MPSC हि राज्य सरकारची संस्था आहे तसेच UPSC हि केंद्र सरकारची संस्था आहे. मग आता त्याचप्रमाणे SSC सुद्धा केंद्र सरकारचीच एक संस्था आहे.

SSC हे भारत सरकारच्या विविध विभागमध्ये निघणाऱ्या पदांसाठी नोकरीची भरती प्रक्रिया राबवण्याचे काम करत असते. SSC द्वारे वर्ग-ब (Group-B) आणि वर्ग-क (Group-C) पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते.

SSC Full Form In Marathi-SSC Long Form मराठीमध्ये

मित्रांनो आता तुमच्या लक्ष्यात आलेच असेल कि SSC काय आहे? चला मग आता आपण जाणून घेऊयात SSC Long Form मराठीमध्ये.

इंग्लिश मध्ये SSC Long Form हा “Staff Selection Commission” असा होतो.

आणि यालाच मराठीमध्ये “कर्मचारी निवड आयोग” असे म्हटले जाते.

कर्मचारी निवड आयोगामधून नोकरी मिळवणे हे बहुतेक लोकांचे स्वप्न असते आणि यासाठीसुद्धा लोक हे दिवसरात्र मेहनत करून अभ्यास करतात.

तर मित्रांनो आता तुमच्या लक्ष्यात आलेच असेल कि SSC Long Form काय होतो.

SSC ची स्थापना कधी झाली आणि SSC चे मुख्यालय कुठे आहे.

SSC ची स्थापना हे ४ नोव्हेंबर १९७५ रोजी केंद्र सरकार कडून करण्यात आली. सुरवातीला याचे नाव हे “Subordinate Service Commission” असे होते.

परंतु, नंतर २६ सप्टेंबर १९७७ रोजी याचे नाव “Subordinate Service Commission” वरून बदलून “Staff Selection Commission” असे ठेवण्यात आले आणि तेव्हा पासूनच या संस्थेला सोप्प्या भाषेत SSC म्हणून ओळखले जाते.

SSC चे मुख्यालय हे राजधानीच्या ठिकाणी म्हणजेच दिल्ली येथे आहे. तसेच याचे क्षेत्रीय कार्यालय हे प्रयागराज, कोलकाता, गुवाहाटी, मुंबई, चेन्नई, बंगलोर, नवी दिल्ली येथे आहे.

एवढेच नाही तर याचे उपक्षेत्रीय कार्यालय हे रायपूर आणि चंडीगढ येथे आहे.

SSC मार्फत कोणत्या पदासाठी परीक्षा घेतल्या जातात.

SSC हे भारत सरकारच्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवते. यामध्ये अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या जातात त्या आता आपण जाणून घेऊयात.

SSC खालील प्रमाणे परीक्षा आणि त्यांच्या भरती प्रक्रिया राबवते:

  • SSC Combined Graduate Level (SSC CGL): एकत्रित पदवीधर
  • SSC Junior Engineer (SSC CGL): कनिष्ठ अभियंता
  • SSC Combined Higher Secondary Level (SSC CHSL): एकत्रित उच्च माध्यमिक स्तर 
  • SSC Central Armed Police Force (SSC CAPF): केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
  • SSC Multi Tasking Staff (SSC MTS): मल्टी टास्किंग स्टाफ
  • SSC Junior Hindi Translator (SSC JHT): कनिष्ठ हिंदी अनुवादक
  • SSC Stenography (SSC Steno): स्टेनोग्राफी

ह्या सर्व परीक्षा SSC कडून घेतल्या जातात.

SSC साठी पात्रता आणि वयोमर्यादा काय असते?

आपण वर जाणून घेतले कि एस एस सी ह्या विविध प्रकारच्या परीक्षा घेते. आता आपण जाणून घेणार आहोत कि या परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता आणि वयोमर्यादा लागते.

१) SSC Combined Graduate Level (SSC CGL): एकत्रित पदवीधर

या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचे म्हटले तर या पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवाराने पदवी पूर्ण केलेली असावी आणि त्याचे वय हे १८ ते ३० वर्ष या मध्ये असावे. 
SSC CGL हि सर्वात जास्त दिली जाणारी परीक्षा आहे. या परिक्षेमार्फत प्राप्तिकर निरीक्षक, सहाय्यक विभाग अधिकारी, बीएसएफ (BSF), सीआरपीएफ (CRPF), केंद्रीयपोलीस संघटना, सीबीआय (CBI) या पदांसाठी नियुक्ती केली जाते.

२) SSC Junior Engineer (SSC CGL): कनिष्ठ अभियंता

या पदासाठी अर्ज करण्याकरीता उमेदवाराकडे इंजिनिअरिंग ची पदवी किंवा डिप्लोमा असायला हवा. हि परीक्षा देऊन उमेदवार हा सरकारी विभागामध्ये जुनियर इंजिनिअर म्हणजेच कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करू शकतो.

या परीक्षेसाठी वयोमर्यादा हि १८ ते ३२ वर्ष्यापर्यंत आहे.

३) SSC Combined Higher Secondary Level (SSC CHSL): एकत्रित उच्च माध्यमिक स्तर

ज्या लोकांनी १२वी पास केली आहे आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहे अश्या लोकांसाठी हि परीक्षा उत्तम आहे. हि परीक्षा पास केल्यास तुम्हाला लिपिक (Division Clerk) आणि डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) या पदासाठी नियुक्त केले जाते.

४) SSC Central Armed Police Force (SSC CAPF): केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल नावावरूनच तुमच्या लक्ष्यात आले असेल कि हे पद पोलीस विभागाचे आहे. या विभागासाठी भरपूर लोकांची काम करण्याची इच्छा असते. या विभागासाठी अर्ज करण्याकरिता वयोमर्यादा हि २० ते २५ वर्ष्या दरम्यान असायला हवी.

हि परीक्षा पास केल्यास BSF आणि CRPF या विभागामध्ये नियुक्ती होते.

५) SSC Multi Tasking Staff (SSC MTS): मल्टी टास्किंग स्टाफ

ह्या परीक्षेत पास झाल्यानंतर मल्टी टास्किंग विभागामध्ये नोकरी मिळते. या परीक्षेसाठी पात्र होण्याकरिता उमेदवार हा १०वी पास असणे आवश्यक आहे.

६) SSC Junior Hindi Translator (SSC JHT): कनिष्ठ हिंदी अनुवादक

या परीक्षेसाठी उमेदवाराची इंग्रजी किंवा हिंदी विषयाच्या टायपिंगवर चांगली निपुणता असायला हवी.

हि परीक्षा पास झाल्यावर सरकारी विभागामध्ये कनिष्ठ अनुवादक पदावर काम करण्यासाठी नियुक्ती होते.

७) SSC Stenography (SSC Steno): स्टेनोग्राफी

या परीक्षेस पात्र होण्याकरिता उमेदवार हा १२वी पास असणे आवश्यक आहे. या परीक्षेत पास झाल्यास स्टेनोग्राफी या पदासाठी नियुक्ती केली जाते.

या परीक्षेसाठी वयोमर्यादा हि वर्ग-सी साठी १८ ते ३० वर्ष आणि वर्ग-डी साठी १८ ते २३ वर्ष असते.

SSC परीक्षा प्रक्रिया कश्या प्रकाची असते?

SSC ची परीक्षा हि तीन टप्यांमध्ये/श्रेणीमध्ये होत असते. यामध्ये परीक्षार्थीला सर्वांमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

१) प्रथम परीक्षा (Preliminary Exam)

२) मुख्य परीक्षा (Mains Exam)

३) वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Exam)

१) प्रथम परीक्षा (Preliminary Exam)

या परीक्षेमध्ये बहुपर्यायी १०० प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नानाला हे २ मार्क्स असतात तसेच हे परीक्षा ऑनलाईन होत असते. उत्तर बरोबर असल्यास २ मार्क्स मिळतात आणि उत्तर चुकल्यास -०.५ मार्क्स हे वजा केले जातात. म्हणूनच ज्या प्रश्नाचे उत्तर हे आपल्याला माहित असते तेच उत्तर देणे आवश्यक असते.

२) मुख्य परीक्षा (Mains Exam)

तुम्ही एकदा प्रथम परीक्षा पास केल्यावरच हि परीक्षा देऊ शकता. या परीक्षेत २ परीक्षा असतात Quantitative Aptitude यामध्ये १०० प्रश्न हे २०० मार्क्ससाठी असतात आणि दुसरी परीक्षा म्हणजे English. Quantitative Aptitude यामध्ये २०० प्रश्न हे २०० मार्क्स साठी असतात.

३) वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Exam)

हि परीक्षा मुख्य परीक्षा पास केल्यावर द्यावी लागते. या परीक्षेमध्ये वर्णनात्मक प्रश्न असतात त्यांचे वर्णन करून उत्तरे लिहावी लागतात. हि परीक्षा १०० मार्क्ससाठी घेतली जाते.

हे पण जरूर वाचा : HDFC Full Form In Marathi: HDFC म्हणजे काय?

SSC परीक्षेसाठी अभ्यासक्रम

आता आपण SSC साठी आवश्यक असणाऱ्या आभ्यासक्रमाबद्दल चर्चा करू.

१) SSC Combined Graduate Level (SSC CGL): एकत्रित पदवीधर

या पदासाठी परीक्षा देण्याकरिता तुम्हाला सामान्य जागरूकता, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, परिमाणिय क्षमता आणि परिस्थिती विज्ञान, सामान्य अभ्यास या विषयांचा अभ्यास करावा लगेल.

२) SSC Junior Engineer (SSC CGL): कनिष्ठ अभियंता

या पदासाठी तुम्हाला तुमच्या अभियांत्रिकीला असणारे विषय आणि जनरल रेसोनिंग, जनरल अवेअरनेस या विषयांचा अभ्यास करायचा असतो.

३) SSC Combined Higher Secondary Level (SSC CHSL): एकत्रित उच्च माध्यमिक स्तर

या परिक्षेसाठी तुम्हाला जनरल इंटेलिजेंस अँड रेसोनिंग, जनरल इंग्लिश, जनरल अवेयरनेस, क्वांटिटेटिव्ह एबिलिटी या विषयांचा समावेश करावा लागतो.

४) SSC Central Armed Police Force (SSC CAPF): केंद्रीय सशस्त्र पोलीस दल

या मध्ये जनरल इंटेलिजेंस अँड रीझनिंग, सामान्य ज्ञान आणि सामान्य जागरूकता, गुणात्मक योग्यता आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन यांचा समावेश असतो.

५) SSC Junior Hindi Translator (SSC JHT): कनिष्ठ हिंदी अनुवादक

या पदाच्या परीक्षेसाठी हिंदी आणि इंग्लिश विषयाच्या व्याकरणाचा यांचा समावेश होतो.

६) SSC Stenography (SSC Steno): स्टेनोग्राफी

या परीक्षेमध्ये जनरल अवेयरनेस, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान आणि आकलन यांचा समावेश केलेला आहे.

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि SSC Long Form काय? SSC म्हणजे काय? SSC कोण देऊ शकते? SSC साठी लागणारी पात्रता? SSC स्थापना कधी झाली? SSC मार्फत विविध पदासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा कोणत्या? SSC ची परीक्षा प्रक्रिया कशी असते?, SSC परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम कोणता?

मी दिलेल्या माहितीबद्दल मला आपल्या प्रतिक्रिया खाली Comment करून नक्की कळवा आणि हा लेख इतरांपर्यंत Share करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आपणास नक्की प्रतिसाद देऊ.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. SSC परीक्षेसाठी काय पात्रता लागते?

    उत्तर: SSC परीक्षेसाठी विविध पदासाठी विविध पात्रता आहे. याचे संक्षिप्त वर्णन आम्ही या लेखात केले आहे.

  2. SSC परीक्षेसाठी १२वी पास विद्यार्थी पात्र आहे का?

    उत्तर: SSC परीक्षेसाठी काही पदासाठी १२वी पास विद्यार्थी पात्र असतो.

  3. SSC परीक्षेसाठी वयोमर्यादा काय असते?

    उत्तर: SSC परीक्षेसाठी विविध पदासाठी वयोमर्यादा हे १८ ते ३५ वर्ष्यापर्यंत असते.

4 thoughts on “SSC Full Form In Marathi: SSC म्हणजे काय?”

Leave a Comment