Information of Salmon Fish In Marathi। Salmon Fish Name In Marathi

Information of Salmon Fish In Marathi
Information of Salmon Fish In Marathi

मित्रांनो नमस्कार,

मला माहिती आहे कि तुम्ही फार ठिकाणी साल्मन माशाबद्दल माहिती बघितली पण तुम्हाला हवी तशी माहिती सापडली नाही तर मित्रांनो तुम्ही आता काळजी करू नका कारण या लेखात आपण साल्मन माशाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे.  याअगोदरच्या लेखात आपण Siblings Meaning In Marathi, Marathi Barakhadi In English, Obsessed Meaning In Marathi, Vibes Meaning In Marathi याबद्दल माहिती बघितीली.

आजच्या या लेखात आपण Information of Salmon Fish In Marathi, Salmon Fish Name In Marathi, Salmon in Marathi, साल्मन माश्याच्या प्रजाती, साल्मन माश्याची अन्य नावे कोणती? साल्मन माश्यात कोणते महत्वाचे घटक आढळतात? साल्मन माश्यापासून आपल्याला कोणते फायदे मिळतात? अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. 

परंतु त्याअगोदर मला तुम्हाला एक सांगायचे आहे ते म्हणजे या लेखात आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि तुम्हाला पण ती माहिती जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शब्द नि शब्द शेवटपर्यंत वाचावा लागेल जेणेकरून तुम्हाला यानंतर कुठलीच शंका शिल्लक राहणार नाही. 

या लेखामध्ये दिलेली माहिती जर तुम्हला आवडली तर आम्हाला याबद्दल नक्की कमेंट करून सांगा तसेच तुमचे याबाबद्दल काही प्रश्न असेल तर त्याबद्दल सुद्धा खाली कमेंट करा. 

चला तर मित्रांनो आता वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात Salmon Fish Meaning In Marathi.

Information of Salmon Fish In Marathi। Salmon Fish Name In Marathi

Tweet

Information of Salmon Fish In Marathi: साल्मन मासा म्हणजे काय?

मित्रांनो आपल्याला सद्याच्या रसायनयुक्त खाद्यपदार्थांपेक्षा चांगले अन्न सेवन करणे फार महत्वाचे झाले आहे. बरेच लोक पौष्टीक आहार मिळवण्यासाठी फार मेहनत घेतात. तसेच ते त्यांच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देतात. 

मग आता आरोग्य चांगले राहावे यासाठी काही लोक शाकाहार तर काही लोक मांसाहाराचे सेवन करतात. मग जेव्हा आपण मांसाहाराबद्दल बोलतो तेव्हा समुद्री अन्न (Sea Food) हे अतिउत्तम मानले जाते. त्यात प्रामुख्याने साल्मन माशाची तर गोष्टच वेगळी आहे.

मग आता साल्मन माशा नेमका आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल?

तर मित्रांनो साल्मन मासा हा सॅल्मोनिडे (Salmonidae) या कुटुंबातील एक मासा आहे. तसेच Salmonidae या कुटुंबात आणखी काही मासे आहेत त्यांची नावे ट्राउट, चार, ग्रेलिंग आणि व्हाईट फिश अशी आहेत.

साल्मन मासा हा उत्तर अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर च्या उपनद्यांमध्ये आढळतो. तसेच साल्मन माश्याची काही भागामध्ये लोक शेती सुद्धा करतात त्यालाच फिश फार्मिंग असे म्हटले जाते. 

साल्मन माशे हे विशिष्ट्य प्रकारच्या प्रजातींमधून येतात त्याला “अ‍ॅनाड्रॉमस” म्हटले जाते. यामध्ये हे माशे खऱ्या आणि गोड्या पाण्यामध्ये राहू शकतात. हे माशे समुद्रातील पाण्यात राहतात आणि जेव्हा ते अंडी देतात तेव्हा ते नदीच्या पाण्यात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येऊन नदीमध्ये अंडी देतात. 

भारतात साल्मन माशे हे ओडिसा आणि पश्चिम बंगाल मध्ये समुद्रात आढळतात. तसेच पश्चिमेला आपल्या महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये समुद्रकिनारी आढळतात.

हे पण जरूर वाचा : Siblings Meaning In Marathi: Siblings म्हणजे काय?

Salmon Fish Name In Marathi: साल्मन माश्याचे मराठी नाव काय?

भारतात बरेच लोक महत्वाच्या प्रथिनांसाठी आणि आणखी पौष्टिक आहारासाठी मांसाहाराला प्राधान्य देत असतात. साल्मन मासा हा सुद्धा यात प्रामुख्याने समाविष्ट केला जातो. 

साल्मन माश्याला मराठीमध्ये “रावस मासा” असे म्हटले जाते. 

हा मासा प्रामुख्याने नदीमध्ये त्याचे अंडी देतो आणि नंतर मग ते अंडी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून समुद्रात जातात आणि नंतर मग त्यापासून साल्मन मशे तयार होऊन ते जास्त काळ समुद्रात आपले जीवन जगतात. 

रावस माश्याला जगभरात “Indian Salmon Fish” म्हणून ओळखले जाते. 

तसेच याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्यामुळे त्यांना त्याप्रमाणे नावे देण्यात आली आहे जसे कि ऑस्ट्रेलियन सॅल्मन, डॅन्यूब सॅल्मन आणि हवाईयन सॅल्मन.

Description of Salmon In Marathi: साल्मन माश्याचे वर्णन

साल्मन हा शब्द “साल्मो” या लॅटिन शब्दापासून आला आहे. साल्मन हे माशे विविध रंगाचे, वजनाचे आणि विविध लांबीचे आढळतात त्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. 

Salmon in marathi
Salmon in marathi

तसेच विकिपीडियाकडून घेण्यात आलेल्या माहितीनुसार साल्मन माश्याचे जास्तीत जास्त वजन हे ९.४ किलो पासून ते १४५ किलो पर्यंत सापडले आहे.

लांबीमध्ये रावस मासे हा जास्तीत जास्त ८९ से.मी. पासून ते २०० से.मी. पर्यंत लांब असतात.

साल्मन माशाचा वरचा रंग हा चांदीच्या रंगाचा असतो आणि त्यांचा आतील म्हणजेच मासाचा रंग हा गुलाबी किंवा नारंगी असतो.

हे पण वाचा: RIP Meaning In Marathi

Nutritional Values of Rawas Fish In Marathi: रावस फिश मधील पोषक तत्वे.

समुद्री मांसाहारी अन्न म्हटले म्हणजे त्यात प्रामुख्याने विविध माश्यांचा समावेश होत असतो. त्यात मग आता रावस मासा हा तर फार महत्वाचा आणि सर्वात उपयुक्त म्हणून ओळखला जातो. 

चला तर मग जाणून घेऊयात साल्मन माशामध्ये कोणते पोषक तत्व आढळतात. 

साल्मन माशामध्ये इतर माश्यांच्या तुलनेत भरपूर प्रमाणामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, गुड फॅट्स, ओमेगा ३ सारखे प्रथिने असे भरपूर प्रकारचे मानवी शरीरास उपयुक्त असणारे प्रथिने आढळतात आणि हेच कारण आहे कि लोकांना ह्या माशाचे सेवन करण्यास सांगितले जाते. 

आता खालील तक्त्यात साल्मन माशामध्ये आढळणाऱ्या प्रथिनांची मात्रा आणि प्रथिनांचे नाव सांगितले आहे.

Nutritional Values of Rawas Fish In Marathi

प्रथिनांचे नाव१००ग्राम प्रति मात्रा
ऊर्जा (Energy)१२७ कि. कॅलरी 
एकूण लिपिड (Total lipid)४.४ ग्रॅम
कॅल्शियम (Calcium)७ मिग्रॅ
पाणी (Water)७५.५२ ग्रॅम
तांबे (Copper)०.०६३ मिग्रॅ
प्रथिने (Protein)२०.५  ग्रॅम
लोह (Iron)०.३८  मिग्रॅ
मॅग्नेशियम (Magnesium)२७ मिग्रॅ
सोडियम (Sodium)७५ मिग्रॅ
सेलेनियम (Selenium)३१.४ μg
झिंक (Zinc)०.३९ मिग्रॅ
फॉस्फरस (Phosphorus)२६१ मिग्रॅ
पोटॅशियम (Potassium)३६६ मिग्रॅ
व्हिटॅमिन-ए (Vitamin-A)३५ μg
व्हिटॅमिन बी-१२ (Vitamin B-12)४.१५ μg
व्हिटॅमिन बी-०६ (Vitamin B-6)०.६११ मिग्रॅ
थायमिन (Thiamine)०.०८ मिग्रॅ
नियासिन (व्हिटॅमिन बी ३) Niacin (Vitamin B3)७.९९५ मिग्रॅ
रिबोफ्लेविन (Riboflavin)०.१०५ मिग्रॅ
एकूण फॅटी ऍसिडस् (Total saturated fatty acids)०.८१ ग्रॅम
फोलेट (Folate)४ μg
एकूण पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्०.८११ ग्रॅम
एकूण मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडस्१.३४८ ग्रॅम
कोलेस्टेरॉल (Cholesterol)४६ मिग्रॅ

Benefits of Indian Salmon In Marathi: साल्मन मासा खाण्याचे फायदे

salmon fish in marathi
Salmon Fish In Marathi

१) प्रोटीन ची कमी पूर्ण करणे:

आपण आताच वर जाणून घेतले कि साल्मन माश्यात किती प्रकारचे प्रथिने आढळतात. आपल्या शरीरासाठी प्रोटीन हे फार महत्वाचे असते. आपल्या शरीरातील प्रोटीन कमी झाल्याने आपल्याला त्वचेसंबंधीत/ हाडांसंबंधीत वेगवेगळे आजार होऊ शकतात. 

अश्यातच डॉक्टरांकडून जास्त प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास सांगितले जाते. म्हणून प्रोटीन ची कमतरता पूर्ण करण्यासाठी साल्मन माश्याचे सेवन हे फार फायदेशीर ठरू शकते.

२) डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी:

डोळा म्हणजे नेत्र हे नावाचे अनमोल अवयवांपैकी एक आहे आणि त्यांचे स्वस्थ चांगले ठेवणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. साल्मन माशामध्ये पुरेश्या प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड उपलब्ध आहे. 

एवढेच नाही तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे कि माश्याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते आणि तसा सल्लाही डॉक्टरांकडून देण्यात येतो. 

डोळ्यांमधील रेटिना हा भाग खूप महत्वाचा असतो कारण त्या भागामुळेच आपल्याला सर्वकाही दिसत असते. म्हणून रेटिनाला मजबूत ठेवण्याकरिता आणि त्याला वेगवेगळ्या रोगांपासून दूर ठेवण्याकरिता ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड यांचे सेवन फार महत्वाचे आहे. 

म्हणून या सर्वांकरिता साल्मन माश्याचे सेवन हे फार महत्वाचा मानले जाते.

हे पण वाचा: All Vegetables Name In Marathi With Pictures

३) त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त:

त्वचेसाठी सुद्धा साल्मन माश्याचे सेवन हे गुणकारी ठरू शकते. जसे कि तुम्हाला माहित आहे साल्मन मध्ये ओमेगा-३ ऍसिड सापडते यामुळे हे आपल्या त्वचेला मऊ, चमकदार आणि गोरा बनवण्यास मदत करते. 

याचे योग्य प्रमाणात सेवन करणे फार महत्वाचे आहे यासाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता.

४) केसांचे आरोग्य राखण्यासाठी:

साल्मन माशामध्ये योग्य प्रमाणामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड, लोह, व्हिटॅमिन बी- १२ असते हे केसांसाठी उत्तम मानले जाते. याचे योग्य प्रमाणात सेवन हे केसांच्या विविध समस्या पासून दूर ठेवण्यास मदत करते. 

साल्मन माश्याचे सेवन केल्याने केसांच्या समस्या जसे केस कोरडे पडणे, केस गळणे, केस पांढरे होणे अश्या अनेक केसांच्या समस्येवर साल्मन उपयोगी आहे. 

५) मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यास उपयुक्त:

जसे कि आपल्याला माहीतच आहे कि साल्मन हे प्रथिनांचे भांडार आहे. यात लोह, ओमेगा ऍसिड, व्हिटॅमिन हे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे हे सर्व प्रथिने आपली बुद्धिमत्ता वाढवण्यास आणि मेंदूशी संबंधित सर्व मासपेशींचा योग्य विकास करण्यास लाभदायक ठरतात.

६) वजन कमी करण्यास उपयोगी:

साल्मन माशामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर उपलब्ध आहे तसेच यामध्ये कॅलेरीचे प्रमाण सुद्धा कमी आहे. त्यामुळे याचे सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरून राहते आणि आपल्याला भूक लागत नाही आणि मग आपले वजन कमी होण्यास मदत होते.

७) हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यास:

आजच्या काळात सर्वात जास्त लोकांना हृद्यासंबंधी आजार जास्त होत आहेत. याला कारण म्हणजे आपल्या शरीरातील जास्त कोलेस्ट्रॉल चे प्रमाण आहे. परंतु साल्मन माशामध्ये योग्य प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ऍसिड आढळते आणि हे ऍसिड आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. 

याशिवाय हे प्रथिने आपली रक्तवाहिन्या अधिक मजबूत करण्यास मदत करतात आणि हृदयाची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत करतात. म्हणून आपण आपापल्या डॉक्टरांशी यासंबंधित सल्ला घेऊन या माश्याचे सेवन करू शकता.

हे पण वाचा: Chia Seeds In Marathi

Salmon मासा कश्या प्रकारे खाऊ शकतो

मित्रांनो आतापर्यंत आपण साल्मन बद्दल बरीच माहिती जाणून घेतली आता आपण साल्मन कश्या प्रकारे खाऊ शकतो त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आपण साल्मन विविध प्रकारे खाऊ शकतो. जसे आपण साल्मन माश्याची करी बनवून खाऊ शकतो, साल्मन माश्याला फ्राय करू शकतो, कधी कधी आपण त्याला भाजून सुद्धा खाऊ शकतो.

मित्रांनो जर तुम्हाला साल्मन माश्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही खालील व्हिडीओ मधून बघून “साल्मन फिश फ्राय रेसिपी” घरी सुद्धा बनवू शकता.

साल्मन फिश फ्राय रेसिपी

Side Effect of Salmon: साल्मन पासून होणारे नुकसान

साल्मन मासा खाण्याचे ज्याप्रकारे फायदे आहे त्याचप्रकारे काही नुकसान सुद्धा आहे. साल्मन माश्याच्या सेवना अगोदर काही गोष्टी लक्ष्यात ठेवल्या तर आपण या होणाऱ्या नुकसानापासून आपला बचाव करू शकतो. 

साल्मन माश्याचे सेवन कारण्याअगोदर खालील गोष्टी लक्ष्यात आसू द्या:

  • ज्या लोकांना मांसाहार चालत नाही किंवा ज्या लोकांना मांसाहारापासून एलर्जी आहे त्यांनी डॉटरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. 
  • हृदयरोगाशी संबंधित व्यक्तीनी, त्वचेशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच साल्मन माश्याचे सेवन करावे. 
  • काही वेळा लोक हे मासे जास्त काळासाठी बर्फामध्ये साठवून ठेवतात ज्याने त्यामध्ये असणारे पोषक घटक नष्ट होऊन ते आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करू शकतात. म्हणून बर्फामध्ये साठवलेले मासे खाण्यापासून टाळावे. 
  • काही लोक साल्मन माश्यांचे मत्स्यपालन करतात यासाठी मग ते कृत्रिम पद्धतीने मासे लवकरात लकवकर मोठे होण्याकरिता रसायनाचा वापर देखील करतात हे आपल्या आरोग्यास फार मोठे हानिकारक ठरू शकतात त्यामुळे आपण खात असलेला मासा कोठून आला आहे याची खात्री करून घ्या. 
  • मुलांसाठी साल्मन माश्याचे सेवन उपयुक्त आहे परंतु यासाठी तुम्ही सर्वात आगोदर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. 
  • मत्स्य पालन केलेल्या माश्यांना जर इंजेक्शन लावले असेल तर त्या माश्यांपासून आपल्याला काही रोग होऊ शकतो म्हणून यासाठी योग्य पडताळणी करूनच याचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Salmon Fish Price In Maharashtra: महाराष्ट्रात साल्मन माश्याचे किंमत

मित्रांनो आतापर्यंत आपण साल्मन माश्याचे फायदे आणि नुकसान तसेच त्यात आढळणाऱ्या प्रथिनाबद्दल जाणून घेतले आता आपण साल्मन माशाची किंमत बघणार आहोत.

मित्रांनो मुंबई मध्ये साल्मन माशाची किंमत हि ६०० ते १८०० रुपये/किलो आहे. तसेच काही बाजारात साल्मन हे ६०० ते ८०० रुपये/किलो सुद्धा विकली जाते.

साल्मनची किंमत खूप जास्त असल्याने याची काही लोक शेती म्हणजेच Fish Farming करून खूप जास्त पैसे कमावत आहेत.

निष्कर्ष

तर मित्रांनो, आपण या लेखात बघितले कि साल्मन माशाचे काय महत्व आहे. तसेच साल्मन माश्यामध्ये कोणते गुणकारी प्रथिने आढळतात त्याबाबद्दल माहिती बघितली, त्यानंतर साल्मन माश्यापासून आपल्याला काय फायदे आणि काय नुकसान आहे त्याबाबद्दल माहिती बघितली, नंतर  Salmon Fish Name In Marathi, 

Description of Salmon In Marathi इत्यादी माहिती जाणून घेतली. 

मला अशा आहे मी दिलेली Information of Salmon Fish In Marathi मधून तुमचे सर्वच प्रश्न दूर झाले असणार. तसेच दिलेल्या माहितीबद्दल तुम्ही आम्हाला आपल्या प्रतिक्रिया खाली Comment करून नक्की कळवा आणि हा लेख इतरांपर्यंत Share करायला विसरू नका. 

याव्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आपणास नक्की प्रतिसाद देऊ. 

धन्यवाद…

Disclaimer:

मित्रांनो, या लेखात दिली गेलेली माहिती आणि सल्ला हा फक्त आणि फक्त सामान्य माहितीसाठी आहे. या माहितीवर कोणतीही कृती करताना आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. तसेच जे लोक आजरावर उपचार घेत असतील, ज्यांना हृदयासंबंधी आणि त्वचेसंबंधी काही आजार असतील त्यांनी तर अवश्य आपल्या तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 

साल्मन माश्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार तुम्ही केलेल्या कृतीवर आम्ही म्हणजेच TalkInMarathi.com कोणतीही जबाबदारी घेत नाही म्हणून तुम्ही यावर कृती (Action) करताना आपल्या वाद्यकीय सल्ल्यानुसार निर्णय घ्यावा. 

धन्यवाद…

Source/ Resources:

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. साल्मन मासा भारतात कुठे सापडतो?

    उत्तर: साल्मन मासा हा भारतात ओडिसा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि गुजरात या भागात समुद्रामध्ये आढळतो.

  2. साल्मन माश्याची लांबी किती असते?

    उत्तर: साल्मन मासा हा लांबीमध्ये ८९ से.मी. ते २०० से.मी. पर्यंत असू शकतो.

  3. साल्मन माश्याचे मूळ कुठे आहे?

    उत्तर: साल्मन माश्याचे मूळ हे उत्तर अटलांटिक आणि पॅसिफिक महासागर च्या उपनद्यांमध्ये आहे.

1 thought on “Information of Salmon Fish In Marathi। Salmon Fish Name In Marathi”

Leave a Comment