Patent Meaning In Marathi: पेटंट म्हणजे काय?

Patent Meaning In Marathi
Patent Meaning In Marathi:पेटंट म्हणजे काय?

मित्रांनो नमस्कार,

मित्रांनो तुम्ही बरेचदा पेटंट हा शब्द एकला असेलंच मग तुम्हाला पेटंट म्हणजे काय? Patent Meaning In Marathi माहित आहे का? 

नाही, तर मग आजच्या या लेखात आपण Patent Information In Marathi, पेटंट कसे करावे? पेटंट करणे आवश्यक आहे का? अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. 

तर मित्रांनो  जाणून घेण्यास सुरवात करू त्याअगोदर मला तुम्हाला सांगायचे आहे कि या लेखात मी पेटंट बद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तरी आपण हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि काही शंका शिल्लक असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की विचारा. 

मग आता वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात पेटंट काय आहे?

Patent Meaning In Marathi:पेटंट काय आहे?

पेटंट करून घेणे आजच्या काळात खूप महत्वाचे झाले आहे. पेटंट हा एक प्रकारचा कायदेशीर अधिकार आहे जो कोणत्याही व्यक्ती, कंपनीला, किंवा संस्थेला दिला जातो.

या अधिकाराअंतर्गत ज्या व्यक्ती, कंपनीने किंवा संस्थेने निर्माण केलेल्या नवीन उत्पादन, सेवा, तंत्रज्ञान यांच्यावर सर्वस्व अधिकार हा त्याच व्यक्तीचा असतो. म्हणजेच इतर कोणी त्या सेवेचा किंवा उत्पादनाचा वापर हा मूळ मालकाच्या परवानगीशिवाय करू शकत नाही.

तसेच मूळ मालकाने निर्माण केलेले तंत्रज्ञान, वस्तू, उत्पादन याची नक्कल करणे आणि त्याचा वापर करणे यावर प्रतिबंध लावण्याकरिता पेटंट हे फार उपयोगी पडते. पेटंट असलेली व्यक्ती हि निर्मित केलेल्या वस्तूंचा बेकादेशीर वापर करत असेल तर त्याच्या विरुद्ध तक्रार करून कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार या पेटंट द्वारे मिळत असतो.

हे पण जरूर वाचा :  Mutual Fund Information In Marathi: Mutual Fund म्हणजे काय?

पेटंट कसे करावे? पेटंट करण्याची प्रक्रिया कशी असते?

भारतात पेटंट करण्याकरिता तुम्ही भारत सरकारच्या “ऑफिस ऑफ कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिजाइन्स अँड ट्रेडमार्क्स” या कार्यालयामध्ये जाऊन आपले पेटंट करू शकता. तसेच पेटंट करण्याकरिता पेटंट चे कार्यालय हे चेन्नई, मुंबई आणि दिल्ली येथे आहे परंतु पेटंट चे मुख्य कार्यालय हे कोलकाता येथे आहे.

वर सांगितल्याप्रमाणे पेटंट करण्यासाठी प्रत्येक देशात सरकारचे दिलेले एक पेटंट कार्यालय असते. जर कधी तुमची कल्पना, उत्पादन, तंत्रज्ञान नवीन असेल तर तुम्ही या कार्यालयात अर्ज करू शकता. 

अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पादनाचा किंवा तंत्रज्ञानाची पूर्ण कल्पना व त्यासंबंधित कागदपत्रे या कार्यालयांमध्ये सादर करावी लागतात. त्यानंतर येथील अधिकारी तुमची कल्पनेची पडताळणी करतात आणि नंतर तुम्हाला पेटंट देण्यावर काम करतात.

यामध्ये पेटंट त्याच उत्पादनाला मिळते ज्याची कल्पना हि पूर्णपणे नवीन असायला हवी तसेच त्यावर कोणत्याही व्यक्तीचा अधिकार नसावा. 

आपल्या भारतात पेटंट करण्याकरिता सरकारची एक वेबसाइट आहे त्यावर तुम्ही अर्ज सादर करू शकता.

पेटंट केल्यानंतर ज्या देशात पेटंट झाले आहे फक्त ते त्या देशापुरतेच मर्यादित असते. म्हणजेच जर तुमची कल्पना दुसऱ्या देशातील व्यक्तीने किंवा संस्थेने नक्कल केल्यास त्याच्यावर तुमचा काहीच अधिकार राहणार नाही.

हे महत्वाचे लेख वाचायला विसरू नका:

पेटंट चे प्रकार कोणते?

पेटंट हे कशाचेही असू शकते उदा: एखादी वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, उत्पादन म्हणून या सर्वांसाठी विशिष्ठ प्रकारामध्ये यांचा समावेश करावा लागतो. त्याच पेटंट प्रकाराबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत. 

पेटंट चे मुख्यातः दोन प्रकार आहेत 

१) उत्पादन पेटंट (Product Patent)

२) प्रक्रिया पेटंट (Process Patent)

उत्पादन पेटंट (Product Patent):

या पेटंट च्या नावावरून तुमच्या लक्षात आलेच असेल कि हे पेटंट कशाबद्दल आहे. या  पेटंट मध्ये तुम्ही हुबेहूब दिसणारे दुसरे उत्पादन करू शकत नाही. म्हणजेच जर बाजारामध्ये किंवा कोणत्या व्यक्तीने व संस्थेने आधीच उत्पादन केले असेल आणि त्यांच्याकडे त्यासंबंधित पेटंट असेल तर मग त्याची दुसरे कोणी हूबेहूब नक्कल करूच शकत नाही. 

परंतु जर त्यासारखा एखादा दुसरा उत्पादन करायचे म्हटल्यास त्यामध्ये काहीतरी नवीन असायला हवे जसे त्या उत्पादनाची पॅकिंग, रंग, बनावट, पद्धत इत्यादी. 

आपण याला एका उदाहरणार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता जगात आपण बऱ्याच दुचाकी वाहने बघतो त्यांचा प्रत्येक गोष्ट हि वेगळी वेगळी असते. त्यांचा रंग, त्यांची संरचना, त्याची किंमत, वाहनाचा मायलेज इत्यादी. 

हे सर्व निर्मित करण्यात येत असलेले उत्पादन पेटंट या प्रकारां मध्ये मोडल्या जाते.

प्रक्रिया पेटंट (Process Patent)

प्रक्रिया पेटंट हे तंत्रज्ञान आणि सेवा यांच्या संदर्भात आहे. या पेटंट च्या मार्फत आपले तंत्रज्ञान किंवा काही उत्पादन बनवण्यासाठी करावी लागणारी प्रक्रियेची नक्कल केली जाऊ शकत नाही. 

जर अशी प्रक्रिया हुबेहूब नक्कल आपल्याला प्रक्रियेची कोणी करत असेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाही करण्याचे प्रावधान या पेटंट द्वारे आपल्याला प्राप्त होत असते.

पेटंट मुळे मिळणारे अधिकार

पेटंट करणे हे आता अति महत्वाचे झाले आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे नवीन संकल्पना किंवा जगावेगळे काही तंत्रज्ञान असेल तर तुम्ही लगेच पेटंट करून घ्या. आता आपण पेटंट केल्याने मिळणाऱ्या अधिकारांबद्दल माहिती जाणून घेऊ.

पेटंट केल्यावर खालील अधिकार प्राप्त होतात:

 • पेटंट करणाऱ्या मूळ मालकाला पेटंट मुळे विशेष अधिकार प्राप्त होतो ज्याचा वापर तो त्याच्या उत्पादनाची नक्कल करणाऱ्या व्यक्तीवर करू शकतो आणि नक्कल करणाऱ्यावर तो कायदेशीर कारवाई करू शकतो. 
 • पेटंट धारकांना पेटंट केल्यावर त्यांच्या वस्तूंची निर्मिती करणे, विक्री करणे, तंत्रज्ञान एखाद्या कंपनीला देणे इत्यादी करता येते. 
 • जर पेटंट धारक त्यांचे तंत्रज्ञान हे कोणत्या संस्था किंवा कंपनीला वापरण्यास देऊ इच्छित असेल तर हा अधिकार त्याला पेटंट केल्याने प्राप्त होतो आणि यानुसार पेटंट धारक हा त्या संस्थे कडून रॉयल्टी च्या रूपाने पैसे घेऊ शकतो.

पेटंट करण्यासाठी किती खर्च लागतो?

पेटंट करण्यासाठी सरकार त्यावर फी आकारत असते. आपण अर्ज केल्यापासून ते पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत एकूण खर्च हा ४० हजार रुपये ते ८० हजार रुपयांपर्यंत येऊ शकतो. यामध्ये सर्व एजेंट चा खर्च, विविध प्रक्रियेला लागणारी फी याचा समावेश आहे.

हा व्हिडीओ नक्कीच बघा

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण जाणून घेतले कि पेटंट म्हणजे काय असते? पेटंट केल्याने कोणते अधिकार प्राप्त होतात? पेटंट करण्यास किती खर्च लागतो? पेटंट चे प्रकार कोणते? पेटंट करण्याची प्रक्रिया काय? तसेच Petent Meaning In Marathi काय?

या लेखात दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा या लेखात तुम्हाला काही शंका शिल्लक असेल तर तुम्ही खाली कंमेंट करून नक्की विचारा आम्ही तुम्हाला नक्कीच प्रतिसाद देऊ. 

तसेच हा लेख तुमचा इतर मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. 

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

 1. पेटंट करण्यासाठी किती खर्च येतो?

  उत्तर: पेटंट करण्याकरिता संपूर्ण खर्च हा ४० हजार ते ८० हजारापर्यंत येऊ शकतो.

 2. पेटंट केल्याने काय होते?

  उत्तर: पेटंट केल्याने तुम्ही निर्माण केलेली एखादी वस्तू, तंत्रज्ञान आणि संकल्पना इतर कोणी तुमच्या परवानगीशिवाय वापरू शकत नाही.

 3. पेटंट केल्याने कोणता अधिकार प्राप्त होतो?

  उत्तर: पेटंट केल्याने तुमचे तंत्रज्ञान इतर कोणी वापरू शकत नाही तसेच तुमची इच्छा असेल तर तुमचे तंत्रज्ञान वापरण्याची परवानगी देऊन तुम्ही यावर रॉयल्टी च्या रूपाने पैसे मिळवू शकता.

1 thought on “Patent Meaning In Marathi: पेटंट म्हणजे काय?”

 1. पेटेन्ट सदर करण्यासाठी कोणती कागदपत्रे सदर करावी

  Reply

Leave a Comment