
मित्रांनो तुम्ही NDRF बद्दल नक्कीच बातम्यांमध्ये किंवा वर्तमानपत्रांमध्ये ऐकलं असेलच मग तुम्हाला NDRF म्हणजे काय हे माहित आहे का?
तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण जाऊन घेणार आहोत NDRF Full Form In Marathi, NDRF म्हणजे काय? NDRF ची स्थापना आणि घोषवाक्य, NDRF साठी पात्रता काय? NDRF मध्ये भरती प्रक्रिया कशी असते? NDRF मध्ये कोणत्या बटालियन असतात? NDRF चे काही अतुलनीय कार्य
या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
NDRF बद्दल माहिती जाणून घेण्यास सुरवात करू त्याअगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे कि तुम्हाला NDRF बद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल.
तसेच जर या लेखात काही अडचण असल्यास किंवा तुमच्या प्रतिक्रिया कळवण्यासाठी तुम्ही खाली कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.
चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात NDRF Information In Marathi
Table of Contents
NDRF म्हणजे काय? NDRF kay Aahe?
मित्रांनो आपण बरेचदा बातम्यांमध्ये ऐकत असतो कि NDRF च्या बटालियन तैनात केल्या आहेत. परंतु हे NDRF म्हणजे नेमकं आहे काय? असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो.
तर आता आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत.
मित्रांनो आपल्या देशात मान्सून च्या काळात बऱ्याच ठिकाणी जास्त पाऊस झाल्याने पूर येतात. तसेच काही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती सुद्धा येतच असतात. अश्या वेळेस सामान्य माणसाचे जीवन हे विस्कळीत होत असते.
मग अश्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात लोकांना सुरक्षित जागी पोहचवणे, त्यांना अन्न पुरवठा करणे इत्यादी बचाव कार्य करण्यासाठी शासनाने एक दल तयार केला आहे त्याला NDRF असे म्हटले जाते.
NDRF मध्ये कार्यरत असलेल्या जवानांना आपत्ती सारख्या परिस्थिती साठी विशेष प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येत असते. तसेच हे NDRF चे जवान आपल्या जीवाची पर्वा न करता सामान्य जनतेला आपत्तीमधून सुखरूप बाहेर काढण्यासाठी तत्पर असतात.
NDRF ची स्थापना आणि घोषवाक्य
आपण वर जाणून घेतले कि NDRF काय आहे आता आपण NDRF ची स्थापना कधी झाली हे जाणून घेणार आहोत.
NDRF ची स्थापना हि २००५ च्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदया नुसार २००६ साली करण्यात आली होती. NDRF हे केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येते.
NDRF चे घोषवाक्य हे “आपदा सेवा सदैव” असे आहे. या घोषवाक्याचा अर्थ आपत्तीच्या वेळी सदैव सेवा हीच प्राथमिकता असा होतो. NDRF मध्ये १२ बटालियन कार्यरत आहेत.
NDRF Full Form In Marathi-NDRF Long Form In Marathi
मित्रांनो वर बघितले कि NDRF काय आहे. आता आपण जाणून घेणार आहोत NDRF Full Form In Marathi.
मित्रांनो NDRF चा मराठी फुल फॉर्म हा “राष्ट्रीय आपत्ती निवारण दल” असा होतो.
आणि NDRF चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “National Disaster Response Force” असा होतो.
NDRF मध्ये डॉक्टर, इंजिनीअर, श्वानपथक अश्या विशेष लोकांचा समावेश असतो. हे सर्व लोक आपत्तीच्या काळात राहत आणि बचाव कार्यासोबत परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी खूप मेहनत घेतात.
हे पण जरूर वाचा : ICU Full Form in Marathi: ICU म्हणजे काय?
NDRF मध्ये भरती प्रक्रिया कशी असते?
मित्रांनो बऱ्याच लोकांचे स्वप्न हे राष्ट्राची सेवा करण्याचे असते. NDRF सुद्धा एक महत्वाच्या काळी सेवा देण्याचे काम करत असते.
मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि NDRF मध्ये आपण कसे सेवा देऊ शकतो? तर मित्रांनो NDRF मध्ये आपण थेट भरती होऊ शकत नाही. यामध्ये भरती प्रक्रिया हे थोडी वेगळी असते.
NDRF मध्ये भरती होण्याकरिता १२ वी पास असणे आवश्यक असते. जर उमेदवार १२ वी पास असेल तर त्यांना BSF, SSB, CISF, CRPF आणि ITBP यापैकी एका दलात भरती व्हावे लागते.
नंतर या दलामध्ये राहून आपल्याला ३-४ वर्षे सेवा द्यावी लागते. नंतर आपण NDRF मध्ये जाण्यासाठी अर्ज करू शकतो. जर आपण NDRF साठी पात्र ठरलो तर NDRF साठी विशेष प्रशिक्षण दिले जाते आणि नंतर आपण NDRF मध्ये सेवा देऊ शकतो.
NDRF मध्ये कोणत्या बटालियन असतात?
आता आपण NDRF मध्ये असणाऱ्या बटालियन बद्दल माहिती घेणार आहोत.
NDRF मध्ये १२ बटालियन असतात त्यामध्येच वेगवेगळ्या अर्धसैनिक दलाच्या बटालियनचा समावेश असतो. प्रत्येक बटालियन मध्ये ११४९ जवान असतात. त्या बटालियन खालीलप्रमाणे आहेत.
१) सशस्त्र सीमा दल (SSB) – दोन बटालियन
२) सीमा सुरक्षा फोर्स (BSF) – तीन बटालियन
३) इंडो-तिब्बत सीमा पुलिस (ITBP) – दोन बटालियन
४) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स (CISF) – दोन बटालियन
५) केंद्रीय रिजर्व पुलिस फोर्स (CRPF) – तीन बटालियन
आता या १२ बटालियन देशात विविध १२ सर्वाधिक आपत्तीच्या ठिकाणी तैनात करण्यात आल्या आहेत. त्या बटालियन खालीलप्रमाणे आहेत.
१) बीएन एनडीआरएफ, गुवाहाटी, आसाम – बीएसएफ (BN NDRF, Guwahati, Assam – BSF)
२) बीएन एनडीआरएफ, कोलकाता, पश्चिम बंगाल – बीएसएफ (BN NDRF, Kolkata, West Bengal – BSF)
३) बीएन एनडीआरएफ, मुंडाली, ओडिशा – सीआईएसएफ (BN NDRF, Mundali, Odisha – CISF)
४) बीएन एनडीआरएफ, अरक्कोनम, तमिलनाडु – सीआईएसएफ (BN NDRF, Arakkonam, Tamil Nadu – CISF)
५)बीएन एनडीआरएफ, पुणे, महाराष्ट्र – सीआरपीएफ (Bn NDRF, Pune, Maharashtra – CRPF)
६) बीएन एनडीआरएफ, गांधीनगर, गुजरात – सीआरपीएफ (Bn NDRF, Gandhinagar, Gujarat – CRPF)
७) बीएन एनडीआरएफ, गाजियाबाद, उत्तर प्रदेश – आईटीबीपी (BN NDRF, Ghaziabad, Uttar Pradesh – ITBP)
८) बीएन एनडीआरएफ, भटिंडा, पंजाब – आईटीबीपी (BN NDRF, Bhatinda, Punjab – ITBP)
९)बीएन एनडीआरएफ, पटना, बिहार – बीएसएफ (BN NDRF, Patna, Bihar – BSF)
१०) बीएन एनडीआरएफ, विजयवाड़ा, आंध्र प्रदेश – सीआरपीएफ (Bn NDRF, Vijayawada, Andhra Pradesh – CRPF)
११) बीएन एनडीआरएफ, वाराणसी, उत्तर प्रदेश – एसएसबी (BN NDRF, Varanasi, Uttar Pradesh – SSB)
१२) बीएन एनडीआरएफ, ईटानगर, अरुणाचल प्रदेश – एसएसबी (BN NDRF, Itanagar, Arunachal Pradesh – SSB)
NDRF चे काही अतुलनीय कार्य
आता आपण NDRF च्या काही मोठ्या आणि अतुलनीय कार्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
NDRF ने त्यांच्या स्थापनेपासून काही विशेष आपत्तीमध्ये महत्वाचे कार्य केले आहे ते खालीलप्रमाणे आहे.
- जुलै 2007 – भावनगर, गुजरात मध्ये पूर
- जुलै 2007 – राजकोट, गुजरात मध्ये पूर
- फेब्रुवारी 2008 – अहमदाबाद, गुजरातमधील इमारत कोसळली
- जून-जुलै 2008 – लखीमपूर, आसाममध्ये पूर
- जून-जुलै 2008 – धेमाजी, आसाममध्ये पूर
- जुलै-ऑगस्ट 2008 – लखीमपूर, आसाममध्ये पूर
- ऑगस्ट 2008 – कोसी ब्रीच, बिहारमध्ये
- ऑगस्ट-सप्टेंबर 2008 – लखीमपूर, आसाममध्ये पूर
- सप्टेंबर 2008 – पुरी, कटक, केंद्रपारा आणि जगतसिंहपूर, ओडिशा मध्ये पूर
- सप्टेंबर 2008 – कामरूप, आसाममध्ये पूर
- नोव्हेंबर 2008 – तिरुवरूर, तामिळनाडू मध्ये पूर
- नोव्हेंबर-डिसेंबर 2008 – चेन्नई, तामिळनाडू मध्ये पूर
- मे-जून 2009 – चक्रीवादळ आईला पश्चिम बंगाल
- मे 2009 – बारपेटा, आसाममध्ये पूर
- जुलै 2009 – जुनागढ आणि पोरबंदर, गुजरात मधील पूर
- जुलै 2009 – कासारकोड, कन्नूर आणि एर्नाकुलम, केरळमधील पूर
- ऑगस्ट 2009 – सीतामढी, बिहार (बागमती भंग) मध्ये पूर
- सप्टेंबर 2009 – हावडा आणि हुगली, पश्चिम बंगालमध्ये पूर
- ऑक्टोबर 2009 – आंध्र प्रदेश व कर्नाटक पूर
- जानेवारी 2010 – बेल्लारी, कर्नाटक येथे इमारत कोसळली
- एप्रिल 2010 – आसाममध्ये गुवाहाटी येथे पूर
- मे 2010 – आंध्र प्रदेश आणि कर्नाटक मध्ये लैला नावाचे चक्रीवादळ
NDRF ने या सर्व संकटाच्या काळी लक्षणीय कामगिरी करून हजारो लोकांचे जीव वाचवण्याचे काम केले.
निष्कर्ष
आपण आजच्या या लेखामध्ये बघितले कि NDRF म्हणजे काय? NDRF ची स्थापना आणि घोषवाक्य, NDRF साठी पात्रता काय? NDRF मध्ये भरती प्रक्रिया कशी असते? NDRF मध्ये कोणत्या बटालियन असतात? NDRF चे काही अतुलनीय कार्य, NDRF Long Form In Marathi.
तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली NDRF बद्दलची माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल आणि तुमचे असणारे सर्व प्रश्न/शंका दूर झाल्या असेलच.
जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असल्यास आपण खाली Comment करून विचारू शकता.
तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.
धन्यवाद…
आमचे प्रसिद्ध लेख
- Patent Meaning In Marathi: पेटंट म्हणजे काय?
- KYC Full Form In Marathi: KYC म्हणजे काय?
- 9+ Benefits of Chia Seeds In Marathi | Chia Seeds Meaning In Marathi | Chia Seeds In Marathi Name
- Auto, Truck and Motorcycle Accident Lawyer
- Oilfield Accident Lawyer
FAQ’s
NDRF मध्ये किती बटालियन असतात?
उत्तर: NDRF मध्ये एकूण १२ बटालियन असतात.
NDRF मध्ये असलेल्या जवानाला किती वेतन मिळते?
उत्तर: NDRF मध्ये असलेल्या जवानाला १ लाख ते १२ लाख रुपये यांच्या मध्ये त्याच्या अनुभवावर अवलंबून असते.
NDRF चे कार्य काय?
उत्तर: NDRF हे नैसर्गिक आपत्तीच्या काळी सामान्य जनतेला सुरक्षित ठिकाणी पोहचवणे, त्यांना अन्नाचा पुरवठा करणे तसेच परिस्थिती पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करणे इत्त्यादी कामे करण्यास तत्पर असतात.
very important information thx