Mutual Fund Information In Marathi: Mutual Fund म्हणजे काय?

Mutual Fund Information In Marathi
Mutual Fund Information In Marathi: Mutual Fund म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो,

Mutual Fund बद्दल विविध बातम्या, वर्तमानपत्रातील जाहिराती, टीव्ही वर येणाऱ्या जाहिराती आणि विविध समाज माध्यमांद्वारे आपण ऐकत असतो. परंतु याबद्दल आपल्याकडे संपूर्ण किंवा अर्धवट माहिती असते. 

म्हणूनच आजच्या या लेखात आपण Mutual Fund Information In Marathi, Mutual Fund चे प्रकार कोणते? Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी करावी? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे? What is Mutual Fund In Marathi? याबद्दल माहिती जाणून घेऊयात. 

याशिवाय मित्रांनो मागच्या काही लेखांमध्ये आपण Abandoned Meaning In Marathi, Vibes Meaning, RIP Long Form In Marathi, Legend म्हणजे काय? Meaning of Obsessed In Marathi या महत्वपूर्ण विषयावर सविस्तर माहिती बघितली, तुम्ही सुद्धा हे लेख अवश्य वाचा आणि यांचा फायदा घ्या.

असो,

आम्ही या लेखात Mutual Fund बद्दल जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करू तरी आपण सुद्धा हा लेख शेवटपर्यंत वाचावा आणि याबद्दल काही शंका शिल्लक असल्यास आम्हाला कंमेंट करून विचारा. 

चला तर मग वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात Mutual Fund Meaning In Marathi.

What is Mutual Fund in Marathi? Mutual Fund Information In Marathi

आपण भरपूर ठिकाणी Mutual Fund बद्दल जाहिराती बघत असतो पण याबद्दल पूर्ण माहिती नसल्यामुळे आपल्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात. जसे यामध्ये गुंतवणूक कशी करावी गुंतवणूक केल्यास ती सुरक्षित राहणार का इत्यादी 

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून तर घेऊच त्याअगोदर Mutual Fund काय आहे? त्याबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे.

मित्रांनो म्युच्युअल फंड हा एक गुंतवणूक करण्याचा प्रकार आहे. तुम्ही हि गुंतवणूक वेगवेगळ्या स्वरूपात करू शकता. जसे मनी मार्केट, शेअर मार्केट, बॉण्ड इत्यादी. 

याला सोप्प्या भाषेत समजायचे म्हटल्यास एखादी कंपनी आहे त्या कंपनीला व्यापार वाढवण्यासाठी पैशांची गरज आहे मग त्या कंपनीला आपल्यासारख्या ज्या लोकांनी म्युच्युअल फंड मध्ये केलेल्या गुंतवणुकीतून पैशे मिळतात.

याचा उद्देश असा कि कंपनी आणि गुंतवणूकदार या दोघांना याचा फायदा होतो. पण लक्ष्यात असू द्या जर कंपनीला उत्तम नफा झाला तर गुंतवणूकदाराला सुद्धा नफा होतो आणि जर कंपनीला तोटा झाला तर गुंतवणूकदाराला सुद्धा तोटा होत असतो. 

यावर तोटा न होण्याकरिता आपण एकच करू शकतो कि गुंतवणुकीसाठी चांगली कंपनी निवडू शकतो. तसेच आपण गुंतवणूक कुठे करावी आणि किती करावी यासाठी प्रत्येक Mutual Fund मध्ये काही एजंट लोक असतात त्यांच्या सल्ल्यानुसार आपण गुंतवणूक करू शकतो.

हे पण जरूर वाचा :  UGC Full Form in Marathi: UGC म्हणजे काय?

Mutual Fund चा इतिहास

भारतातील Mutual Fund चा इतिहास हा खूप जुना आहे. भारतातील पहिला Mutual Fund हा १९६३ साली सुरु करण्यात आला. हा म्युच्युअल फंड भारत सरकार आणि भारतीय रिजर्व बँक यांनी एकत्र येऊन सुरु केला.

त्यांनतर भारतातील बऱ्याच सार्वजनिक बँकांनी Mutual Fund मध्ये प्रवेश केला आणि म्हणून भारत सरकारने १९९३ साली यासांबांधीत नियम तयार केले. 

तसेच देशातील छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांना प्रोत्सहन देणे आणि त्यांचे हित जपण्यासाठी खासगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात आली. 

यांनतर देशातील सर्व Mutual Fund एकत्र आले आणि त्यांनी २२ ऑगस्ट १९९५ साली The Association of Mutual Fund In India या संस्थेची स्थापना केली.

Mutual Fund चे प्रकार 

म्युच्युअल फंड चे अनेक प्रकार आहेत. हे सर्व प्रकार मुख्यतः दोन श्रेणीमध्ये विभाजित केले आहेत त्यांची माहिती आता आपण खाली जाणून घेणार आहोत. 

Mutual Fund च्या मुख्यातः दोन श्रेण्या आहेत. पहिली म्हणजे संरचनेच्या आधारावर आणि दुसरी म्हणजे मालमत्तेच्या आधारावर. 

चला तर मग आता या प्रकारांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अ) संरचनेच्या आधारावर असणारे म्युच्युअल फंड:

१) ओपन एंडेड म्युच्युअल फंड (Open Ended Mutual Fund)

या फंड मध्ये गुंतवणूकदाराला फार मोकळीक दिली जाते. यामध्ये गुंतवणूकदार हा कधीपण गुंतवणूक करून फंड विकत घेऊ शकतो आणि विकत घेतलेले फंड हे विक्री करू शकतो.

२) क्लोस एंडेड म्युच्युअल फंड (Close Ended Mutual Fund)

आपण वर जाणून घेतलेल्या फंड मध्ये असे होते कि गुंतवणूकदार वाटेल तेव्हा गुंतवणूक करू शकतो आणि वाटेल तेव्हा गुंतवणूक काढून घेऊ शकतो. परंतु या फंड मध्ये याउलट आहे. 

क्लोस एंडेड म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणुकीचा अवधी दिलेला असतो. हा अवधी वेगवेगळा असू शकतो. हा देण्यात आलेला अवधी संपेपर्यंत तुम्हाला गुंतवणूक केलेले पैसे काढणे आणि आणखी गुंतवणूक करण्यावर प्रतिबंध असतात.

३) इंटरवल म्युच्युअल फंड (Interval Mutual Fund)

या फंड मध्ये ओपन आणि क्लोस एंडेड म्युच्युअल फंड च्या सुविधांचा समावेश असतो. सध्या सोप्प्या भाषेत सांगायचे म्हटल्यास या फंड मध्ये एक विशिष्ट कालावधीमध्ये आपण पैसे गुंतवणूक करू शकत नाही आणि केलेली गुंतवणूक काढू सुद्धा शकत नाही. 

४) सेक्टर म्युच्युअल फंड (Sector Mutual Fund)

या फंड च्या नावावरून समजते कि हा फंड कोणत्यातरी सेक्टर च्या संबंधित आहे. या फंडमार्फत आपण विविध क्षेत्रात गुंतवणूक करू शकतो. जसे कि फार्मा सेक्टर, पावर सेक्टर, फूड सेक्टर इत्यादी. 

५) इंडेक्स म्युच्युअल फंड (Index Mutual Fund)

या फंड बद्दल तुम्ही नक्कीच ऐकले असणार. हा फंड शेअर मार्केट संबंधित आहे. या मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे तुमची गुंतवणूक हि फंड मॅनेजरद्वारे शेअर मार्केटच्या स्वस्तात स्वस्त आणि भरपूर परतावा देणाऱ्या कंपनीचे शेअर घेतले जातात.

यामध्ये तुमचे पैसे हे शेअर मार्केटच्या BSE, NSE मध्ये गुंतवले जातात.

ब) मालमत्तेच्या आधारावर असणारे म्युच्युअल फंड:

१) डेब्ट म्युच्युअल फंड (Debt Mutual Fund) 

या फंड मध्ये जोखीम हा फारच कमी असतो. या फंड मध्ये तुम्हाला निश्चित स्वरूपाचा परतावा मिळत असतो. यामध्ये शेअर मार्केट ऐवजी सरकारी बॉण्ड, हमीपत्र, आणि कर्जामध्ये गुंतवणूक केली जाते जी सुरक्षित असते. 

२) लिक्विड म्युच्युअल फंड (Liquid Mutual Funds)

दुसऱ्या सुरक्षित फंड म्हणजे लिक्विड म्युचुअल फंड आहे. यामध्ये गुंतवणूकदार पाहिजे त्या वेळी पैसे काढू शकतात आणि म्हणूनच याला लिक्विड म्युच्युअल फंड म्हटले जाते.

२) इक्विटी म्युच्युअल फंड (Equity Mutual Funds)

इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये प्रामुख्याने शेअर बाजारात गुंतवणूक केल्या जाते. जर तुम्हाला मोठा परतावा पाहिजे असेल तर हे फंड तुम्हाला तो देऊ शकतात. तसेच यामध्ये जोखीम सुद्धा फार जास्त असतो त्यामुळे सर्व शहानिशा करूनच गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते. 

३) ब्यालन्स म्युच्युअल फंड (Balanced Mutual Funds)

या फंड मध्ये इक्विटी आणि डेब्ट फंड या दोघांचा मिळून फायदा होत असतो. आणि म्हणूनच याला ब्यालन्स म्युच्युअल फंड असे म्हटले जाते. कधी कधी याला हायब्रीड म्युच्युअल फंड सुद्धा म्हटले जाते.

साध्या सोप्प्या भाषेत सांगायचे म्हटल्यास ज्या लोकांना वाटते आपले काही पैसे शेअर मार्केट मध्ये आणि काही पैसे सरकारी विभागामध्ये गुंतवावे तर मग हा फंड तुमच्यासाठी आहे.

इथे वाचा: Marathi Barakhadi In English

Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी करावी?

आजच्या काळात Mutual Fund मध्ये इन्व्हेस्ट करणे खूप सोप्पी आहे. यासाठी भरपूर अँप्स सुद्धा उपलब्ध आहेत ज्यांच्या साहाय्याने आपण सहजरित्या गुंतवणूक करू शकतो. शिवाय हे अँप्स वापरणे खूप सोपे असते. 

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग सर्वात चांगले अँप कोणते? तर इथे मी काही अँप्स सांगत आहे त्यातून तुम्ही गुंतवणूक करू शकता.

यामध्ये Groww App, InvesTap, KTrack Mobile App, MyCams इत्यादी अँप्स चांगले आहेत.

Note: हे अँप्स वापरण्याच्या आगोदर आणि गुंतवणूक करण्याअगोदर तुम्ही तुमच्या कडून या अँप्ससंबंधित खात्री करून घ्या आणि खात्री पटल्यानंतरच या अँप्सद्वारे गुंतवणूक करा.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे?

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत:

 • म्युच्युअल फंड मध्ये पैशांची गुणवणूक करण्यासाठी फंड एजंट ची मदत घेतली जाते. म्हणजेच एजंट लोकांना त्या क्षेत्रांतील अनुभव आणि संपूर्ण ज्ञान असते. त्यामुळे ते आपले पैशे त्याच ठिकाणी गुंतवतात जिथे तुम्हाला चांगला परतावा मिळेल. 
 • म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे हे एकच ठिकाणी गुंतवले जात नाही तर ते विविध ठिकाणी गुंतवले जातात त्यामुळे तिथे आपल्याला चांगला परतावा मिळण्यास मदत होते. 
 • म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला जर तुमची आवडीनुसार निवेश करता येतो म्हणजेच जर तुम्ही जास्त जोखीम घेऊ शकता तर तुम्हाला त्याप्रमाणे निवड करता येते तसेच जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल तर त्याप्रमाणे विकल्प निवडता येतो. 
 • तसेच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यावर तुम्हाला Tax मध्ये काही प्रमाणात सूट मिळत असते.
 • म्युच्युअल फंड मध्ये निवेश करणे खूप सोप्पे आहे तसेच हे तुम्ही कधी आणि कोठेही करू शकता.

Mutual Funds बद्दल जाणून घ्या या मराठी व्हिडिओमध्ये

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि Mutual Fund काय आहे? Mutual Fund चे प्रकार कोणते? Mutual Fund मध्ये गुंतवणूक कशी करावी? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे? Mutual Fund Information In Marathi 

मित्रांनो मी आशा करतो कि या लेखात दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या उपयोगी पडली असेलच. तसेच Mutual Fund तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर खाली Comment करून सांगायला विसरू नका

तसेच हा लेख तुमच्या मित्रांबरोबर Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

 1. Mutual Fund वर Tax द्यावा लागतो का?

  उत्तर:हो, Mutual Fund वर Tax द्यावा लागतो.

 2. Mutual Fund मुळे आपण अमीर होऊ शकतो का?

  उत्तर:हो, Mutual Fund मुळे तुम्ही अमीर होऊ शकता परंतु त्यासाठी तुम्हाला चांगल्या फंड मध्ये गुंतवणूक करावी लगेल.

 3. कोणते Mutual Fund चांगले आहेत?

  उत्तर: Axis Bluechip Fund, Kotak Standard Multicap Fund, Axis Midcap Fund, Axis Small Cap Fund, SBI Small Cap Fund इत्यादी फंड गुंतवणूक करण्यासाठी चान्गले आहेत.

2 thoughts on “Mutual Fund Information In Marathi: Mutual Fund म्हणजे काय?”

 1. आपण दिलेली माहिती उत्तम प्रकारची आहे.खरच याचा नक्कीच उपयोग होईल

  Reply

Leave a Comment