
मित्रांनो आपण आज या लेखामध्ये MPSC बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आपण या लेखामध्ये MPSC Full Form in Marathi, MPSC म्हणजे काय?, MPSC साठी असणारी पात्रता अशी सर्व माहिती जाणून घेऊया.
आपण बरेचदा MPSC बद्दल वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये कधी ना कधी ऐकलं असेलच परंतु बऱ्याच लोकांना MPSC काय आहे याची सविस्तर माहिती नसेल.
तर मित्रांनो तुम्ही आता काही काळजी करण्याचे कारण नाही. आज तुम्हाला या लेखामध्ये MPSC बद्दल सर्व शंकांचे उत्तर मिळणार आहे.
मित्रांनो मग आता वेळ वाया न घालवता चला जाणून घेऊयात MPSC बद्दल. मित्रांनो आपण हा लेख पूर्ण शेवट पर्यंत वाचाल अशी आशा बाळगतो आणि जर हा लेख तुम्हला आवडला तर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की Comment करून सांगा. तसेच आपल्या मित्रांबरोबर हि माहिती नक्की Share करा.
MPSC Full Form in Marathi: MPSC म्हणजे काय?
TweetTable of Contents
MPSC म्हणजे काय? MPSC Kay aahe?
मित्रांनो MPSC हे राज्य सरकार कडून सांभाळल्या जाणारी एक सरकारी संस्था आहे. MPSC म्हणजेचं “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” आहे.
MPSC द्वारे दरवर्षी विविध प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविल्या जातात. यामध्ये उपजिल्हाधिकारी, पोलीस उप-अधीक्षक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३ इत्यादी पदे भरली जातात.
आपण UPSC बद्दल पण जरूर काही ऐकलं असेलच, तर ह्या MPSC आणि UPSC मध्ये बहुतेक प्रमाणात साम्यता आहे. या दोघांमध्ये फक्त फरक इतका कि UPSC हे केंद्र सरकारची संस्था आहे आणि MPSC हे राज्य सरकारची संस्था आहे.
UPSC ला आपण “Union Public Service Commission” असे म्हणतो.
हे महत्वाचे लेख वाचायला विसरू नका:
- Patent Meaning In Marathi: पेटंट काय असते?
- Siblings Meaning In Marathi: Sibling म्हणजे काय?
- Marathi Barakhadi In English: मराठी बाराखडी
- Information of Salmon Fish In Marathi
MPSC Full Form In Marathi Mpsc फुल फॉर्म मराठीमध्ये
आपण MPSC म्हणजे काय आहे हे जाणून घेतलं. आता MPSC चा फुल फॉर्म काय होतो ते जाणून घेणार आहोत.
मित्रांनो MPSC ला मराठी मध्ये “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” असे म्हणतात.
तसेच MPSC ला इंग्लिश मध्ये “Maharashtra Public Service Commission” असे म्हणतात.
हे पण जरूर वाचा : UPSC Full Form in Marathi: UPSC म्हणजे काय?
MPSC परीक्षेसाठी पात्रता काय असते?
मित्रांनो तुम्ही कधी तरी तुमच्या मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून ऐकलं असेलच कि आमचा मुलगा, भाऊ, ताई, दादा MPSC परीक्षेची तयारी करत आहे.
बहुतेक लोक हे MPSC परीक्षेसाठी तयारी करत असतात आणि आपण त्याबद्दल सर्वत्र चर्चा पण ऐकतो. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि MPSC साठी आपण पात्र आहोत का? आपण हि परीक्षा देऊ शकतो का? तर मित्रांनो इथे आपण त्याबद्दल चर्चा करणार आहोत.
MPSC साठी आवश्यक असलेली पात्रता.
- या परीक्षेस पात्र उम्मेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा.
- या परीक्षेसाठी किमान वय १९ वर्षे असायला हवे. तसेच खुल्या गटातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे ३८ वर्षे आणि राखीव गटातील उमेदवारांचे जास्तीत जास्त वय हे ४३ वर्षेपेक्षा जास्त नसावे.
- परीक्षेस पात्र होण्याकरिता उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा महाराष्ट्राचा मूळ निवासी असायला हवा व त्याच्याकडे महाराष्ट्राचे मूळ निवासी प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे गरजेचे आहे.
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वरील सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही MPSC परीक्षेस पात्र आहात.
MPSC द्वारे कोणत्या कोणत्या परीक्षा घेतल्या जातात?
MPSC द्वारे अनेक विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात. आता आपण त्या परीक्षा कोणत्या त्याबद्दल जाणून घेऊया.
- राज्य सेवा परीक्षा – Maharashtra State Service Examination
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-अ परीक्षा – Maharashtra Engineering Services Group A Examination
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट-ब परीक्षा – Maharashtra Engineering Services Group B Examination
- सहाय्यक अभियंता (विद्युत) श्रेणी-2, महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब – Assistant Engineer (Electrical) Gr-2, Maharashtra Electrical Engineer Service Gr-B
- महाराष्ट्र वन सेवा परीक्षा – Maharashtra Forest Service Examination
- राज्य कर निरीक्षक परीक्षा – State Tax Inspector Examination
- कर सहाय्यक गट-क परीक्षा – Tax Assistant Examination
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा – Maharashtra Agriculture Service Examination
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा – Police Sub Inspector Examination
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा – Civil Judge (Jr.Div), Judicial Magistrate (1st class) Competitive Exam
- सहाय्यक परीक्षा – Assistant Examination
- लिपिक टंकलेखक परीक्षा – Clerk Typist Examination
- सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा – Assistant Motor Vehicle Inspector Exam
MPSC परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?
MPSC मध्ये निवड प्रक्रिया हे ३ टप्प्यामध्ये होत असते त्यामध्ये
- पूर्व परीक्षा (Prelims Exam)
- मुख्य परीक्षा (Mains Exam)
- मुलाखत (Interview)
या परीक्षा बद्दल आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ:
१) पूर्व परीक्षा (Prelims Exam)
MPSC मध्ये सर्वप्रथम पूर्व परीक्षा द्यायची असते. या परीक्षेमध्ये तुम्हाला दोन पेपर द्यावे लागतात. पहिल्या परीक्षेत २०० बहुपर्यायी प्रश्न आणि दुसऱ्या परीक्षेत ८० प्रश्न विचारले जातात आणि पूर्ण परीक्षा हि ४०० गुणांसाठी होत असते.
तुम्हाला प्रत्येक पेपर सोडवण्याकरिता २ तासाचा वेळ दिल्या जातो. त्यामुळे तुम्हाला वेळ वाया न घालवता पेपर सोडवावा लागतो.
तसेच यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ इतके गुण कमी केले जातात. दोन्ही परीक्षा या इंग्रजी आणि मराठी भाषेत होत असतात.
२) मुख्य परीक्षा (Mains Exam)
पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षेकरिता जावे लागते.
या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण ६ पेपर द्यावे लागतात. ६ पेपरचे एकूण ८०० गुण होतात.
पेपर-१ मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी मध्ये तुम्हाला निबंध लेखन व त्यासंबंधित १०० गुणांकरिता दीर्घोत्तरी प्रश्न विचारले जातात. तसेच ह्या पेपर साठी ३ तासांचा वेळ असतो.
पेपर-२ मध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये व्याकरणावर १०० गुणांकरिता बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. त्यासाठी तुम्हाला १ तास वेळ दिला जातो.
पेपर-३ मध्ये तुम्हाला इतिहास आणि भूगोल मधील १५० गुणांकरिता बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात आणि पेपर साठी २ तास दिले जातात.
पेपर-४ हा २ तासांचा १५० गुणांचा पेपर असतो. या पेपर मध्ये तुम्हाला भारतीय संविधान आणि भारतीय राजनिती याविषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
पेपर-५ हा पेपरसुद्धा २ तासांचा १५० गुणांकरिता विचारला जातो. यामध्ये तुम्हाला मानवाधिकार आणि मानव संसाधन विकास या विषयावर बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
पेपर-६ हा पेपर १५० गुणांकरिता २ तासाचा असतो. या पेपरमध्ये तुम्हाला अर्थशास्त्र, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी विषयांचे बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात.
३) मुलाखत (Interview)
मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुलाखत हि यामध्ये शेवटची परीक्षा आहे.
इथे तुमचे व्यक्तिमत्व, विचार करण्याची क्षमता, निर्णय घेण्याची क्षमता इत्यादी तपासल्या जाते आणि त्यानुसार तुम्हाला गुण दिल्या जातात. मुलाखतीसाठी १०० गुण असतात.
या तीनही परीक्षा उत्तीर्ण केल्यास उमेदवारास डॉक्युमेंट वेरिफिकेशन (Document Verification) साठी बोलावल्या जाते आणि नंतर त्याप्रमाणे त्यांची निवड करून नोकरीवर रुजू केल्या जाते.
MPSC साठी अर्ज कसा करावा? MPSC Apply Online.
MPSC साठी आपल्याला बहुतेकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. त्यासाठी आपल्याला MPSC च्या अधिकारीक संकेतस्थाळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो. तिथे सुरवातीला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि नंतर योग्य त्या पदासाठी अर्ज सादर करावा लागतो.
मी इथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगची अधिकारीक संकेतस्थळ (Website) सांगत आहे. तिथे जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून अर्ज सादर करू शकता.
Apply Online For MPSC Exam / महाराष्ट्र लोकसेवा आयोग
निष्कर्ष
आपण या लेखामध्ये बघितले कि MPSC म्हणजे काय?, MPSC Full Form In Marathi, MPSC परीक्षेसाठी लागणारी पात्रता, MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा, MPSC परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?, MPSC साठी अर्ज कसा करावा लागतो?
मला खात्री आहे कि या माहिती मधून तुमच्या शंका दूर झाल्या असणारच. जर तुम्हाला MPSC बद्दल अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कंमेंट करून विचारू शकता. आम्ही तुम्हाला नक्की प्रतिसाद देऊ.
आम्ही MPSC बद्दल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की आम्हाला सांगा तसेच हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांनसोबत शेअर करायला विसरू नका.
आमचे प्रसिद्ध लेख
- Patent Meaning In Marathi: पेटंट म्हणजे काय?
- KYC Full Form In Marathi: KYC म्हणजे काय?
- 9+ Benefits of Chia Seeds In Marathi | Chia Seeds Meaning In Marathi | Chia Seeds In Marathi Name
- Auto, Truck and Motorcycle Accident Lawyer
- Oilfield Accident Lawyer
- Auto and Motorcycle Accidents
FAQ’s
MPSC परीक्षा कोणता भाषेत होत असते?
उत्तर: MPSC परीक्षा हि मराठी आणि इंग्लिश भाषेत होत असते.
MPSC साठी मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे का?
उत्तर: हो, MPSC परीक्षेकरिता तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
MPSC साठी उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असायला हवा का?
उत्तर: हो, MPSC साठी उमेदवार हा महाराष्ट्राचा नागरिक असायला हवा.
MPSC साठी पात्र होण्याकरिता वय मर्यादा किती पाहिजे?
उत्तर: MPSC साठी पात्र होण्याकरिता किमान वय मर्यादा हि १९ वर्षे आयला हवी.
MPSC म्हणजे काय?
उत्तर: MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
डिग्री कम्प्लीट नसेल तर म्हणजेच डिग्री चालू असेल तर. ग्रॅज्युएशन ॲपियर असलं तर एमपीएससीची परीक्षा देता येते का?
नाही, यासाठी तुमच्याकडे डिग्री असणे आवश्यक आहे.
BSC IT kelay tr chalel na
हो चालेल, तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
Naahi
Aapli degree appear ahe tr chalat nahi ka
Nahi Degree purn pahije
For Religeon NT-C which Document required for MPSC. And Give list of other documents
याकरिता तुम्ही MPSC ची Official वेबसाईट चेक करा.
BSW chi degree asel tr hi exam deta yete ka?
तुम्ही BSW केल्यानंतर MPSC ची परीक्षा अवश्य देऊ शकता. Best of Luck
MPSC साठी डिग्री व्यत्यारिक्त दुसरा कोणता डिप्लोमा किंव्हा कोर्स करायला हवा का
नाही, दुसरा कोणताही डिप्लोमा नसला तरी चालेल. परंतु तुमच्याकडे पदवी (डिग्री) असणे फार महत्वाचे आहे.
12th nanter exam dili tar chlate ka
नाही, MPSC साठी कमीत कमी तुमच्याकडे पदवी असणे आवश्यक आहे आणि हि पदवी कोणत्याही शाखेची असेल तरी चालते.
Mazhi b. Com chi open university madhun degree zhali ahe mala deta yeil ka MPSC chi exam
हो, माझ्या माहितीनुसार तुम्ही जर YCMOU मधून किंवा अन्य Open University मधून Degree घेतली असेल तर तुम्ही MPSC साठी पात्र आहात.
YCMOU chi degree zli asel tr mpsc sathi eligible hotya ka
हो, मला मिळालेल्या माहितीनुसार YCMOU ची पदवी हि MPSC साठी पात्र आहे.
खुप छान माहीती.
Sir मला 2nd year ला ahe मी पण mpsc ची तयारी करतोय .sir documents कोणते available पाहिजेत.
तुम्हाला डिग्री, जात प्रमाणपत्र इत्यादींसारखे आणखी काही डॉक्युमेंट लागतील. याबद्दल तुम्ही MPSC च्या वेबसाइटवर सविस्तर माहिती घेऊ शकता.
मला MPSC द्वारा कोण कोणत्या परीक्षा देता येतील
MPSC हिच एक परीक्षा आहे.
Recently, I completed my graduation in B. Pharm…..which r the posts? For that i can apply through MPSC
diploma Complete zalyanantr mpsc chi exam deta yete ka
नाही, आपल्याकडे पदवी असणे आवश्यक आहे.
MPSC exam dene Sathi graduation complete pahije ka sir
Hoy