MLA Full Form In Marathi: MLA म्हणजे काय?

MLA Full Form In Marathi
MLA Full Form In Marathi: MLA म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो,

आपण दररोज वर्तमानपत्रामध्ये किंवा बातम्यांमध्ये MLA बद्दल काही बातम्या बघत असतो कि या क्षेत्रातील MLA चा आज या ठिकाणी दौरा आहे आणि अजून बरेच काही. परंतु, मग तुम्हाला MLA म्हणजे काय? हे माहित आहे का?

नाही!! तर काळजी करू नका आजच्या या लेखात आपण MLA म्हणजे काय?, MLA Full Form In Marathi, MLA कसा निवडून येतो? MLA होण्यासाठी पात्रता काय असते? MLA चे वेतन काय असते? MLA ला इतर कोणत्या सुविधा मिळतात? MLA चे काम काय असते? इत्यादी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो आजचा हा लेख सुरु करू त्याअगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. ती म्हणजे अशी कि हा लेख तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत शब्द न शब्द वाचावा जेणेकरून तुमच्या सर्व शंका/प्रश्न दूर होतील. शिवाय या लेखात काही अडचण व शंका शिल्लक राहिल्यास खाली कंमेंट करून मला नक्की कळवा.

चला तर मित्रांनो आता आपण वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात MLA Meaning In Marathi.

MLA Full Form In Marathi: MLA म्हणजे काय?

Tweet

MLA म्हणजे काय? MLA Meaning In Marathi  

मित्रांनो जसे कि आपल्याला माहित आहे कि भारतात दर ५ वर्ष्यांनी विधानसभा निवडणूका होत असतात. प्रत्येक विभाग हा वेगवेगळ्या निवडणूक क्षेत्रामध्ये विभाजित केला जातो आणि या विभागामधून अनेक उम्मेदवार निवडणूक मैदानात उतरतात.

परंतु या सर्वांपैकी ज्या उम्मेदवारास सर्वात जास्त मत पडतात फक्त आणि फक्त तोच उम्मेदवार हा ती निवडणूक जिंकतो. याच जिंकलेल्या उम्मेदवारास MLA असे म्हटले जाते.

MLA ला “विधान सभा सदस्य” असे म्हटले जाते. तसेच आपल्या मराठी भाषेत सांगायचे म्हटल्यास MLA ला आपण “आमदार” असे सुद्धा म्हणत असतो.

MLA Full Form In Marathi-MLA Long Form In Marathi

मित्रांनो आपण वर जाणून घेतले कि MLA म्हणजे आपल्या क्षेत्राचा “आमदार” होय. आता आपण MLA चा फुल फॉर्म जाणून घेऊया.

इंग्लिश मध्ये MLA चा फुल फॉर्म हा “Member Of Legislative Assembly” असा होतो.

तसेच मराठीमध्ये MLA चा फुल फॉर्म “विधान सभा सदस्य” असा होतो.

MLA म्हणजेच “आमदार” हे थेट जनतेतून निवडून येत असतात आणि या यासाठी निवडणूक दर ५ वर्ष्यानी होत असतात. MLA झाल्यानंतर त्या क्षेत्रातील लोकांच्या समस्या समजून घेणे आणि त्या समस्या सोडवण्याचे काम एका MLA ला करावे लागत असते.

हे पण जरूर वाचा :  KYC Full Form in Marathi: KYC म्हणजे काय?

MLA साठी लागणारी पात्रता

मित्रांनो बऱ्याच लोकांना राजकारणाची आवड असते आणि त्यांनापण या क्षेत्रात जावे असे वाटत असते. परंतु राजकारणात जाण्यासाठी सुद्धा काही पात्रता लागतात. त्याची माहिती आज आपण घेणार आहोत.

MLA साठी लागणारी पात्रता हि खालील प्रमाणे आहे.

 • MLA साठी निवडणुकीत भाग घेण्याकरिता उम्मेदवार हा भारताचा नागरिक असावा. 
 • उम्मेदवाराचे वय हे २५ वर्ष पेक्षा अधिक असावे. 
 • उम्मेदवार हा त्या राज्याचा मतदार असायला हवा. 
 • उम्मेदवार हा मानसिकदृष्ट्या सक्षम/ स्वास्थ्य असायला हवा.

तर मित्रांनो हे पात्रता ज्या व्यक्तीकडे असेल ते सक्षमपणे आमदार होण्याकरिता निवडणूक मध्ये भाग घेऊ शकतात.

MLA कसे बनावे?

सध्या अस्तित्वात असलेल्या सरकारचे ५ वर्षे पूर्ण झाल्यावर विधानसभेच्या निवडणूका होत असतात. ज्या उम्मेदवारांना आमदार बनायचे आहे अश्या लोकांनी या मतदानासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करायचा असतो.

आता या मतदानासाठी उम्मेदवार हा कोणत्याही पक्ष्याचा असू शकतो.

तसेच जर उम्मेदवाराचा कोणत्याही पक्षाबरोबर संबंध नसेल तर तो सुद्धा “अपक्ष” म्हणून निवडणूक लढवू शकतो.

आता निवडणुकीत कोण विजयी होणार हे आपल्या जनतेवर अवलंबून असते. जर उम्मेदवाराची जनतेमध्ये चांगली पकड आणि ओळख असेल तर चांगल्या मताने उम्मेदवार हा विजयी होऊ शकतो.

आणि जर का विरोधी पक्ष उम्मेदवारापेक्षा मजबूत असेल तर उम्मेदवारास हार पत्कारा लागू शकते. म्हणून निवडणूक जिंकण्यासाठी जनतेसोबत राहून समाजकार्य करावं लागते आणि लोकांच्या मदतीस धावून यावे लागते.

MLA चा कार्यकाळ किती असतो?

जसा विधान सभेचा कार्यकाळ हा ५ वर्ष्याच्या असतो तसाच आमदाराचा (MLA) कार्यकाळ हा फक्त ५ वर्ष्याच्या असतो. विधान सभेचा कार्यकाळ संपुष्टात आला कि MLA चा कार्यकाळ संपतो आणि परत एकदा नव्याने निवडणूका घेतल्या जातात.

परंतु एखाद्या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून एखाद्या आमदाराचा कार्यकाळ हा राज्यपालांकडून भंग केला जाऊ शकतो. हे परिस्थिती तेव्हाच शक्य होते जेव्हा आमदाराकडून काही गुन्हा घडतो किंवा त्याच्यावर एखादा मोठा आरोप केला जातो.

तसेच आपात्कालीन परिस्तिथीमध्ये विधानसभेचा कार्यकाळ हा वाढवला जाऊ शकतो. परंतु हा वाढवून वाढवून एका वेळेस जास्तीत जास्त ६ महिन्या पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

MLA चे काम काय असते?

MLA झाल्यानंतर उम्मेदवाराच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी येत असते आणि ती पार पडणे अति महत्वाचे असते. त्या जिम्मेदाऱ्या खालील प्रमाणे आहेत.

 • नवनवीन सरकारी योजना ह्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवणे. 
 • आपल्या क्षेत्रातील महत्वाचे मुद्दे हे विधान सभेत मांडणे आणि त्यावर योग्य तो निर्णय घेणे. 
 • आपल्या क्षेत्राचा विकास घडून आणणे. 
 • जनतेला योग्य प्रतिनिधीत्व प्रदान करणे. 
 • सर्व लोकांसाठी योग्य आणि आवश्यक असणारी योजना सरकारकडे पाठवणे जेणेकरून त्यावर विचार होऊन ती योजना आमलात आणली जाईल.
 • तसेच आणखी एक महत्वाचे काम म्हणजे आपल्या राज्याचा मुख्यमंत्री निवडून देणे.

हि सर्व कामे योग्य रीतीने केल्यास आणि जनतेची सेवा करून त्याचा विश्वास संपादन केल्यास उम्मेदवार पुढल्या निवडणुकीत परत निवडणूक लढवू शकतो आणि जिंकू सुद्धा शकतो.

आमदाराचे (MLA) वेतन आणि इतर सुविधा

आमदाराला वेतनाबरोबर अन्य सुविधा आणि भत्ते हे मिळत असतात. आता आपण त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

आमदाराला खालील प्रमाणे सुविधा आणि वेतन मिळत असते.

 • मूळ वेतन – ६७ हजार
 • महागाई भत्ता – ८८,४४० (मूळ वेतनाच्या १३२ टक्के)
 • संगणक चालकाचा भत्ता – १० हजार
 • दरमहा वेतन व भत्ते – १ लाख, ८३ हजार, ४४० रुपये
 • स्टेशनरी व टपाल भत्ता – १० हजार
 • दूरध्वनी भत्ता – आठ हजार

तसेच इतकेच नव्हे तर यापेक्षा अनेक सुविधा त्यांना मिळत असतात. त्या जाणून घ्यायच्या म्हटल्या तर दैनिक भत्ता, रेल्वे प्रवास भत्ता, बस प्रवास भत्ता, विमान प्रवास, संगणक, आमदार निधी, कुटुंब, स्वास्थ्य सेवा, निवृत्ती वेतन आणि बऱ्याच सुविधा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपण या लेखात जाणून घेतले कि MLA काय असते? MLA साठी पात्रता काय? MLA ची कामे कोणती? MLA ला मिळणाऱ्या सुविधा कोणत्या? MLA चा कार्यकाळ काय? MLA कसे बनावे? MLA Full Form In Marathi

मित्रांनो जर मी दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला मिळाली असतील तर खाली कंमेंट करून मला आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा.

तसेच हा लेख आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका. जर तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका शिल्लक असतील तर निसंकोचपणे आम्हाला विचारू शकता.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

 1. MLA चा कार्यकाळ किती वर्ष्याच्या असतो?

  उत्तर: MLA चा कार्यकाळ हा ५ वर्ष्याच्या.

 2. MLA हा राजनेता असतो का?

  उत्तर: होय, MLA हा राजनेता असतो आणि थेट जनतेतून निवडून येत असतो.

 3. MLA ला मराठीत काय म्हणतात?

  उत्तर: MLA ला मराठीत “आमदार” किंवा “विधान सभा सदस्य” म्हणतात.

 4. MLA चा फुल फॉर्म काय?

  उत्तर: MLA म्हणजे “Member Of Legislative Assembly” असा होतो.

Leave a Comment