MBBS Full Form In Marathi: MBBS म्हणजे काय?

MBBS Full Form In Marathi
MBBS Full Form In Marathi: MBBS म्हणजे काय?

मित्रांनो नमस्कार, 

आपण लहान असतांना बरेचदा मोठे झाल्यावर डॉक्टर, इंजिनिअर, सैनिक किंवा IAS आणि IPS होण्याची इच्छा असते. मग आजच्या या लेखात आपण डॉक्टर बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आजच्या या लेखात आपण MBBS म्हणजे काय? MBBS Full Form In Marathi, MBBS साठी लागणारी पात्रता, MBBS ची प्रवेश प्रक्रिया, NEET काय आहे? MBBS कोर्स चा कालावधी, MBBS ला लागणारा खर्च इत्यादी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हि सर्व माहिती जाणून घेण्यास सुरवात करण्यापूर्वी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे ती म्हणजे जर तुम्हाला MBBS बद्दल पूर्णपणे माहिती जाणून घ्यायची असेल आणि सर्व शंकांचे निराकरण करायचे असेल तर ह्या लेखातील शब्द न शब्द खूप मन लावून वाचावा लागेल.

तसेच या लेखाबद्दल जर तुमच्या काही शंका आणि मार्गदर्शन द्यायचे असल्यास तुम्ही खाली कमेंट करून आम्हाला सांगू शकता.

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात MBBS Long Form In Marathi.

MBBS म्हणजे काय? MBBS Kay Aahe?

मित्रांनो आपल्या देशात बहुतेक लोक इंजिनियर आणि डॉक्टर या क्षेत्रात आपले भविष्य बनवण्याच्या दृष्टीने तयारी करत असतात. आज आपण या लेखात डॉक्टर क्षेत्रातील माहिती जाणून घेणार आहोत. 

मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कि MBBS काय आहे? MBBS म्हणजे काय?

तर मित्रांनो MBBS हि डॉक्टर क्षेत्रातली एक मोठी पदवी आहे. हि पदवी केल्यावर तुम्ही  एक डॉक्टर होऊ शकता. या पदवीला जगात कोठेही खूप मान्यता असते. 

आताच्या काळात वाद्यकीय सेवा हि खूप महत्वाची झाली आहे आणि या विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत असतो त्यामुळे या क्षेत्रात आपल्या भविष्यासाठी फार चांगली संधी उपलब्ध आहे. 

ज्या लोकांचे स्वप्न वैद्यकीय क्षेत्राकडे जाण्याचे आहे त्यांच्यासाठी MBBS हि पदवी खूप चांगली पदवी आहे आणि यावर तुम्ही विचार करू शकता.

हि पदवी झाल्यावर तुम्हाला सरकारी, खासगी रुग्णालयात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच तुम्ही काही वर्ष अनुभव घेऊन स्वतः चे क्लीनिक/रुग्णालय सुरु करू शकता.

MBBS Full Form In Marathi – MBBS Long Form In Marathi

वरील दिलेल्या माहितीत आपण जाणून घेतले कि MBBS हि एक वाद्यकीय क्षेत्रातील खूप गरजेची आणि महत्वाची पदवी आहे. 

आणि आता आपण MBBS Full Form In Marathi जाणून घेणार आहोत.  

मित्रांनो MBBS चा मराठी फुल फॉर्म हा “बॅचलर ऑफ मेडिसिन आणि बॅचलर ऑफ सर्जरी” असा होतो. 

तसेच MBBS चा इंग्लिश मध्ये लॉन्ग फॉर्म सुद्धा हा “Bachelor of Medicine and Bachelor of Surgery” असाच होतो 

जसे कि मी वर सांगितले आहे MBBS हा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी या उपलब्ध होत असतात. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला भारतातच नाही तर विदेशात सुद्धा खूप मागणी आहे.

हे पण जरूर वाचा : ICU Full Form in Marathi: ICU म्हणजे काय?

MBBS साठी लागणारी पात्रता:MBBS Eligibility

मित्रांनो कोणत्याही क्षेत्रात जाण्याकरिता काही पात्रता हवी असते. MBBS साठी सुद्धा काही साधारण पात्रतेची गरज असते. ती पात्रता कोणती? त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.

MBBS साठी खालील पात्रता आवश्यक असते:

 • MBBS करण्यासाठी विद्यार्थी हा १२ वी उत्तीर्ण असायला हवा. 
 • विद्यार्थ्यास १२वी विज्ञान शाखेमधून करणे आवश्यक आहे आणि यामध्ये त्याने १२वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र ह्या विषयातून केली असावी. 
 • MBBS साठी पात्र होण्याकरिता विद्यार्थ्याला सर्व विषयात कमीत कमी ५०% गुण असणे बंधनकारक आहे. तसेच Reserve Catagery मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना  कमीत कमी ४५% गुण असणे आवश्यक आहे. 
 • MBBS करण्याकरिता विद्यार्थ्यांचे वय हे कमीत कमी १७ वर्ष आणि जास्तीत जास्त २५ वर्ष असणे आवश्यक आहे. 
 • १२वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला चांगले कॉलेज मिळण्यासाठी NEET ची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेमध्ये तुम्हाला जितके चांगले गुण तितके चांगले कॉलेज मिळवण्याची संधी मिळते.

MBBS ची प्रवेश प्रक्रिया

मित्रांनो फक्त १२वी केल्यानंतर आपण MBBS कडे जाऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्याला काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. 

आपल्याला MBBS कडे जाण्याकरीता सर्वप्रथम NEET ची परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेच्या आधारावर भारतातील सर्व सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेज मध्ये आपल्याला प्रवेश मिळतो. 

या परीक्षेत आपल्याला जितके जास्त गुण तितक्याच चांगल्या, आवडत्या आणि नावाजलेल्या कॉलेज ला प्रवेश मिळतो. 

काही कॉलेज MBBS च्या प्रवेशासाठी वेगळ्या परीक्षांचे आयोजन करतात. या परीक्षा आयोजन AIIMS, JIPMER आणि AFMC द्वारा केले जाते.

NEET काय आहे? NEET म्हणजे काय?

बऱ्याच विभागात प्रवेश घेण्यासाठी NEET ची परीक्षा घेतली जाते. मग हे NEET म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

तर मित्रांनो NEET हे एक प्रवेश परीक्षा आहे. NEET ला आपण नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट (National Eligibility Entrance Test)असे म्हणतो. हि परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्याला चांगल्या कॉलेज ला प्रवेश  मिळत असतो.

NEET मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा समावेश असतो. NEET मध्ये भौतिकशास्त्र हे १८० गुणांना, रसायनशास्त्र हे १८० गुणांना आणि जीवशास्त्र हे ३६० गुणांना असे हे सर्व ७२० गुणांकरिता विचारले जाते. 

तसेच NEET हि परीक्षा बहुपर्यायी पद्धतीची असते ज्यामध्ये सर्व विषय धरून १८० प्रश्न विचारले जातात आणि यामध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता १ गुण वजा केला जातो.

MBBS कोर्स चा कालावधी

MBBS करण्यासाठी लागणारा कालावधी हा ५.५ वर्षाचा असतो. यामध्ये ४.५ वर्ष आपल्याला शैक्षणिक शिक्षण घ्यावे लागते आणि नंतर १ वर्ष इंटर्नशिप करावी लागते. 

१ वर्षाची इंटर्नशिप करणे हे फार महत्वाचे आणि अनिवार्य झाले आहे. त्याशिवाय तुम्हाला पदवी मिळत नाही.

MBBS ला लागणारा खर्च

MBBS करण्यासाठी सरकारी आणि खासगी कॉलेज उपलब्ध आहेत. आपण जर या कॉलेज मध्ये लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर सरकारी कॉलेज मध्ये खासगी कॉलेज पेक्षा खूप कमी खर्च लागतो. 

सरकारी कॉलेज मध्ये सुद्धा खूप कॉलेज आहेत. जसे कि AIIMS आणि आर्मी मेडिकल कॉलेज. परंतु AIIMS मेडिकल कॉलेज मध्ये MBBS करण्याकरिता सर्वात कमी लागतो. 

AIIMS मध्ये MBBS करण्यासाठी प्रति वर्ष फक्त १३९० रुपये खर्च येतो आणि आर्मी मेडिकल कॉलेज मध्ये MBBS साठी प्रति वर्ष ५६५०० रुपये इतका खर्च लागतो. 

हे तर झाले सरकारी कॉलेज बद्दल याउलट आता खासगी कॉलेजमधून MBBS करण्यासाठी सर्वात जास्त खर्च लागतो. यामध्ये सुद्धा कॉलेज च्या प्रसिद्धी आणि शैक्षणिक गुणवतेच्या आधारानुसार कॉलेज ची फी निश्चित केलेली असते. 

जर तुम्ही खासगी कॉलेज मधून MBBS करणार असाल तर याचा खर्च अंदाजे ७ लाख रुपये ते १२ लाख रुपये प्रति वर्ष असू शकतो.

MBBS मधील नोकरी पेशा

MBBS मध्ये अनेक पदे आहेत ती खालील प्रमाणे. 

 • वैद्य
 • मुख्य वैद्यकीय अधिकारी
 • वैद्यकीय प्रवेश अधिकारी
 • निवासी वैद्यकीय अधिकारी
 • सामान्य चिकित्सक
 • शरीरशास्त्रज्ञ
 • मानसोपचारतज्ज्ञ
 • न्यूरोलॉजिस्ट
 • जनरल सर्जन
 • बालरोगतज्ञ
 • त्वचारोगतज्ज्ञ
 • एंटरोलॉजिस्ट
 • स्त्रीरोगतज्ज्ञ
 • अस्थिरोग तज्ञ
 • प्रसूतिशास्त्रज्ञ
 • हृदयरोग तज्ञ
 • पॅथॉलॉजिस्ट
 • ऍनेस्थेटिस्ट किंवा ऍनेस्थेसियोलॉजिस्ट
 • आहार तज्ञ्
 • N.T तज्ञ
 • कायरोपोडिस्ट
 • क्लिनिकल प्रयोगशाळा शास्त्रज्ञ
 • गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट
 • रेडिओलॉजिस्ट
 • बॅक्टेरियोलॉजिस्ट
 • हॉस्पिटल प्रशासक

MBBS मध्ये नोकरी च्या संधी कुठे असतात?

MBBS पूर्ण केल्यानंतर अनेक वैद्यकीय क्षेत्रात नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत. त्या खालील प्रमाणे:

 • आरोग्य केंद्रे
 • रुग्णालये
 • नर्सिंग होम
 • पॉलीक्लिनिक्स
 • संशोधन संस्था
 • प्रयोगशाळा
 • वैद्यकीय महाविद्यालये
 • बायोमेडिकल कंपन्या
 • फार्मास्युटिकल आणि बायोटेक्नॉलॉजी कंपन्या
 • सामाजिक संस्था
 • खाजगी क्लिनिक 
 • मेडिकल फाउंडेशन

भारतातील प्रमुख MBBS कॉलेज

भारतात अनेक मेडिकल कॉलेज आहेत त्यापैकी मुख्य कॉलेज खालील प्रमाणे आहेत:

 • Armed Forces Medical College  (AFMC), Pune
 • Grant Medical College (GMC), Mumbai
 • University College of Medical Sciences (UCMS), New Delhi
 • King George’s Medical University (KGMU), Lucknow, Uttar Pradesh
 • All India Institute of Medical Sciences, Delhi
 • Christian Medical College (CMC), Vellore
 • Jawaharlal Nehru Institute of Postgraduate Education and Research (JIMPER), Pondicherry
 • Lady Hardinge Medical College (LHMC), New Delhi
 • Maulana Azad Medical College (MAMC), Delhi
 • Kasturba Medical College, Manipal

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि MBBS म्हणजे काय? MBBS Long Form In Marathi काय?, MBBS साठी लागणारी पात्रता, MBBS ची प्रवेश प्रक्रिया कशी असते?, NEET काय आहे? MBBS कोर्स चा कालावधी, MBBS ला लागणारा खर्च, MBBS मधील नोकरी पेशा, भारतातील प्रमुख MBBS कॉलेज कोणते? 

मित्रांनो मी आशा करतो कि मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल. जर या लेखात मी कोणती माहिती देऊ शकलो नसेल किंवा तुमच्या काही शंका शिल्लक असेल तर तुम्ही खाली Comment करून आम्हाला नक्की कळवा. 

तसेच हा लेख इतरांपर्यंत Share करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आपणास नक्की प्रतिसाद देऊ. 

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

 1. MBBS करण्यासाठी किती वर्ष लागतात?

  उत्तर: MBBS करण्यासाठी ५.५ वर्ष लागतात. यापैकी १ वर्ष इंटर्नशिप करावी लागते.

 2. MBBS साठी कमीत कमी किती शिक्षण पात्रता आहे?

  उत्तर: MBBS साठी कमीत कमी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 3. MBBS साठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?

  उत्तर: MBBS साठी NEET ची प्रवेश परीक्षा द्यावी लागते.

 4. NEET म्हणजे काय?

  उत्तर: NEET म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट आहे जी MBBS ची प्रवेश परीक्षा असते.

Leave a Comment