KYC Full Form In Marathi: KYC म्हणजे काय?

KYC Full Form In Marathi
KYC Full Form In Marathi

मागच्या लेखात आपण जाणून घेतले कि Patent म्हणजे काय? आजच्या या लेखात आपण KYC बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, आपण रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये KYC बद्दल जरूर ऐकलं असेलच. तसेच आजच्या काळात सर्वसामान्य व्यक्तीचे सुद्धा बँक,पोस्टऑफिस आणि इतर ठिकाणी खाते असते तर तेथे सुद्धा आपल्याला KYC करून घ्याला सांगतात.

मग आता नेमकं हे KYC म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर मित्रानो आपण आज या लेखामध्ये KYC Full Form In Marathi, KYC चे प्रकार कोणते?, KYC पूर्ण करण्यासाठी डॉक्युमेंट कोणते?, KYC Meaning In Marathi, KYC चे महत्व काय? या सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत.

मित्रांनो चला तर मग आपण वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात KYC बद्दल सर्व माहिती मराठीमध्ये. तर मित्रांनो हा लेख आपण शेवटपर्यंत जरूर वाचा आणि तुमच्या KYC बद्दल असणाऱ्या सर्व शंका दूर करा.

KYC Full Form In Marathi: KYC म्हणजे काय?

Tweet

KYC म्हणजे काय? KYC काय आहे?

रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) द्वारा जाहीर सूचनेनुसार प्रत्येक वित्तीय संस्थाना त्यांच्या ग्राहकांकडून KYC करून घेणे बंधनकारक आहे. आपण ज्या संस्थांची सेवा वापरतो त्या संस्थांना आपली ओळख करून घेण्यासाठी KYC ची प्रक्रिया राबविली जाते.

आता आपण रोज ऑनलाईन पैसे पाठवतो किंवा ऑनलाईन पैश्यांचा व्यवहार करतो त्यासाठी आपण GooglePay, PhonePay, AmazonPay अश्या सेवांचा वापर करत असतो. या सर्व कंपन्यासुद्धा आपल्याला KYC करायला सांगत असतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे KYC इतकी आवश्यक का आहे. तर मित्रांनो KYC हे अशी प्रक्रिया आहे कि ज्यामुळे ग्राहक हा आपली खरी ओळख देतोय कि नाही हे समजण्यास मदत होते. जेणेकरून जर कोणी धोखाधडी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सापडणे लवकर शक्य होते.

KYC Full Form In Marathi-KYC फुल फॉर्म मराठीमध्ये

आपण वर जाणून घेतले कि KYC काय आहे? आता आपण जाणून घेऊया KYC फुल फॉर्म मराठीमध्ये . आपण आताच वर जाणून घेतले कि आपली खरी ओळख आणि आपल्या बद्दल प्रस्तुत केलेली माहिती हि खरी आहे का नाही हे ओळखण्यासाठी KYC प्रक्रिया केली जाते.

मग आता त्याच प्रमाणे KYC चा अर्थ होतो.

इंग्लिश मध्ये KYC चा फुल फॉर्म हा “Know Your Customer” असा होतो. मराठीमध्ये याचाच अर्थ “आपल्या ग्राहकास जाणून घ्या” असा होतो.

म्हणजेच जेव्हांकधी आपली बँक किंवा कोणतीही संस्था आपल्याकडून KYC फॉर्म भरून घेते तेव्हा ते आपली सर्व वयक्तिक माहिती गोळा करून साठवून ठेवत असते आणि जर कधी भविष्यात काही अडचण आली तर त्या माहितीच्या आधारे ते आपल्यापर्यंत सहजरित्या पोहचू शकते.

Hanuman Chalisa PDF Download

KYC चे प्रकार कोणते? – Types Of KYC 

आता आपण जाणून घेणार आहोत कि KYC चे किती आणि कोणते प्रकार असतात.

KYC चे दोनच प्रकार असतात.

१)ई-के वाय सी (EKYC) 

२)सी-के वाय सी (CKYC)

१) ई-के वाय सी (EKYC) काय आहे?

मित्रांनो, ई-के वाय सी (EKYC) चा फुल फॉर्म “Electronically Know Your Customer” असा होतो. या प्रक्रियेमध्ये आपली माहिती हे Digitally गोळा केली जाते. यामध्ये आपले आधार कार्ड हे महत्वाचे असते आणि यामध्ये आपल्याला कोणताही कागदपत्र देण्याची गरज नसते.

EKYC मध्ये आपल्याला आपला अंगठयाचा ठसा हा बायोमेट्रिक पद्धतीने द्यायचा असतो आणि आपली सर्व माहिती हि आपोआपच गोळा केली जाते.

२) सी-के वाय सी (CKYC) काय आहे?

सी-के वाय सी (CKYC) चा फुल फॉर्म “Central Know Your Customer” असा होतो. हि KYC भारतातील प्रत्येक बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये करून घेतली जाते. मुख्यतः हे KYC आपल्याला विमा घेतांना, Share Market, इन्शुरन्स करताना या कामात केली जाते.

हे पण जरूर वाचा :  IAS Full Form in Marathi: IAS म्हणजे काय?

KYC करताना लागणारे कागदपत्रे – Document Required For KYC

KYC करतांना काही आवश्यक कागदपत्रे लागतात ती खालीलप्रमाणे आहेत.

१)आधार कार्ड

२)पॅन कार्ड

३)पासपोर्ट

४)वाहन परवाना

५)मतदान ओळखपत्र

या सर्व कागदपत्रांच्या साहाय्याने तुम्ही KYC सोप्प्या पद्धतीने करू शकता.

KYC कसे कारावे?

मित्रांनो KYC करणे हि खूप सोप्पी गोष्ट आहे. ज्या संस्थेमध्ये तुम्हला KYC करण्यास सांगितले जाते तिथे तुम्हाला एक KYC चा फॉर्म उपलब्ध करून दिला जातो.

या फॉर्म वर आपली वयक्तिक आणि आधार कार्ड, पॅन कार्ड वर असणारी माहिती भरावी लागते. तसेच आपल्याला या फॉर्म सोबत आधार कार्ड आणि पॅन कार्ड ची झेरॉक्स जोडून त्या संस्थेमध्ये द्यावी लागते आणि मग तुमची KYC पूर्ण होते.

KYC चे महत्व काय?

जसे कि आपण बघितले KYC चा अर्थ हा आपल्या ग्राहकास जाणून घ्या असा होतो. म्हणजेच उदाहरणार्थ एखाद्या बँकेकडे कोणी ग्राहक म्हणून जात असेल तर तो ग्राहक हा खरा किंवा फ्रॉड आहे हे जाणून घेण्यासाठी KYC केली जाते.

KYC द्वारे बँकेला आपली खरी ओळख होत असते. जसे कि आपले नाव, आपल्या घराचा पत्ता, आपली इतर वयक्तिक माहिती. आता हि माहिती जर कोणत्या बँकेला मिळाली आणि ती सत्य असली तर मग आपली KYC पूर्ण होते.

तसेच जर एखादा व्यक्ती चोरी किंवा फ्रॉड करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला त्वरित पकडल्या जाण्याकरिता KYC खूप उपयोगी पडते.

KYC साठी माहिती देतांना हे लक्षात ठेवा

मित्रांनो आपल्यापैकी बहुतांश लोक हे स्मार्टफोन वापरतात आणि आपण त्यावर बरेच अँप वापरत आसतो. सद्याच्या काळात तर ऑनलाइन पेमेंट करण्याचे चलन झाले आहे.

मग आता ऑनलाइन पेमेंट साठी आपण विविध अँप वापरतो आणि यासाठी बरेच काही अँप उपलब्ध आहेत. या चांगल्या आणि मोठया कंपनीच्या अँपच्या नावाने काही चोर लोक KYC करण्याच्या नावाने आपली फसवणूक करतात.

आता तुम्हाला यात फसवणूक कशी होते? असा प्रश्न पडला असेल.

तर मित्रांनो मी सांगतो, ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोप्पे आहे आणि याचाच फायदा हे चोर लोक घेतात. हे लोक तुम्हाला समोरून फोन करतात आणि मी या कंपनीमधून बोलत आहे असे सांगतात. वास्तविक पाहता ते एक हॅकर (चोर) असतात आणि त्यांचा कोणत्याही कंपनीबरोबर कुठलाच संपर्क नसतो.

ते तुम्हाला म्हणतात कि सर तुमचे KYC पूर्ण झालेले नाही आणि तुम्ही आता KYC पूर्ण केले नाही तर तुमचे बँक खाते/ अँप बंद पडेल KYC कण्याच्या नावाने ते तुमची वयक्तिक माहिती मागतात यात बरेचदा ते तुमच्या बँक खात्याचा तपशील आणि ATM कार्ड बद्दल माहिती मागतात. एवढेच नाही तर ते तुमचा पासवर्ड सुद्धा मागतात.

आणि यामध्ये जे सामान्य लोक असतात ते या फसव्या लोकांच्या जाळ्यात अडकतात आणि मग नंतर ते बँक मध्ये असलेले पैसे काढून घेतात.

यापासून बचाव करण्यासाठी या लोकांना फोनवर कधीच माहिती देऊ नये त्यांनी कितीही हट्ट केला तरी त्यांना कोणत्याही परिस्तितीत आपली वयक्तिक माहिती देऊ नये. तसेच बँकेचा तपशील तर मुळीच देऊ नये.

KYC करण्यासाठी तुम्ही थेट बँकेमध्ये जाऊन KYC बद्दल माहिती घेऊ शकता.

हे देखील वाचा:

निष्कर्ष

या लेखमध्ये आपण बघितले कि KYC म्हणजे काय? KYC Meaning Marathi, KYC कसे कारावे?, KYC करताना लागणारे कागदपत्रे, KYC चे प्रकार कोणते? KYC चे महत्व काय?

तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली KYC बद्दलची सर्व माहिती तुम्हाला आवडली असेलच आणि या लेखामधून तुमच्या सर्व शंका / प्रश्न दूर झाले असणारच. जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असल्यास आपण खाली Comment करून विचारू शकता.

तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट करून कळवा आणि हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. KYC कुठे मागितली जाते?

    उत्तर: KYC हे मुख्यतः बँक आणि वित्तीय संस्थांमध्ये मागितली जाते.

  2. KYC साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत?

    उत्तर: KYC साठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, वाहन परवाना, पासपोर्ट इत्यादी आवश्यक असते.

  3. KYC कसे केले जाते?

    उत्तर: ज्या संस्थेमध्ये KYC करायचे असते तेथे KYC चा फॉर्म घेऊन त्यावर योग्य माहिती भरून KYC पूर्ण केले जाते.

  4. KYC चा फुल फॉर्म काय?

    उत्तर: KYC म्हणजे “Know Your Customer” असा होतो.

4 thoughts on “KYC Full Form In Marathi: KYC म्हणजे काय?”

  1. मला माझे के वाय सी चेक करायची आहे

    Reply
    • तुम्हाला ज्या संस्थेमध्ये KYC करायचे आहे तेथे जाऊन KYC फॉर्म भरून त्या संस्थेला द्या.

      Reply
  2. कुठल्याही बँक डिटेल्स ची माहिती न देता फक्त के वाय सी केल्याने फसवणूक शक्य आहे का?

    Reply
    • माहिती मागणारे हे खूप हुशार असतात. त्यामुळे कोणतीही माहिती देताना सतर्क राहणे फार महत्वाचे असते.

      Reply

Leave a Comment