ITI Full Form In Marathi: ITI म्हणजे काय?

ITI Full Form In Marathi
ITI Full Form In Marathi: ITI म्हणजे काय?

मित्रांनो मला माहित आहे कि तुम्ही ITI बद्दल जाणून घेण्यास फार उत्साहित आहात. तर मित्रांनो आज आपण या लेखामध्ये जाणून घेऊयात ITI Full Form In Marathi, ITI म्हणजे काय? ITI कोण करू शकते? ITI केल्यानंतर काय पुढे करू शकतो? अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेऊयात.

मित्रांनो साध्या सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास ITI हे एक प्रकारचे प्रशिक्षण आहे. जे करून आपल्याला चांगली नोकरी मिळू शकते.

तर मग आता तुमच्या मनामध्ये आय टी आय बद्दल खूप शंका असतील तर मित्रानो मी तुमच्या सर्व शंका या लेखामध्ये दूर करणार आहे त्यासाठी तुम्ही हा लेख शेवटपर्यंत मन लावून वाचावा अशी माझी इच्छा आहे.

चला तर मग जाणून घेऊयात ITI Meaning In Marathi.

ITI Full Form In Marathi: ITI म्हणजे काय?

Tweet

ITI म्हणजे काय? ITI काय आहे?

मित्रांनो आपण १०वी किंवा १२वी नंतर आपल्याला कोणत्या शाखेत Career करायचे आहे हे निवडणे अतिशय महत्वाचे असते. तसेच याची निवड करताना खुप बाजूंनी विचार करावा लागतो कारण हाच आपल्या आयुष्याचा Turning Point असतो.

मग आता ITI म्हणजे काय? तर मित्रांनो ITI हि एक शैक्षणिक शाखा आहे. या शाखेतून शिक्षण घेऊन नोकरी सहज मिळत असते आणि म्हणूनच बरेच लोक या शाखेकडे वळतात. ITI कोर्सचा कालावधी हा ६ महिने, १ वर्ष, २ वर्ष असा शाखेनुसार अवलंबून असतो.

आता ITI मध्ये सुद्धा बऱ्याच प्रकारच्या शाखा आहेत आणि आपण त्या आपल्या पसंतीनुसार घेऊ शकतो. तसेच ITI मध्ये आपल्याला प्रात्यक्षिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी एक चांगली आणि आजच्या काळातील महत्वाची शैक्षणिक शाखा बनली आहे.

ITI Full Form In Marathi-ITI फुल फॉर्म मराठीमध्ये

मित्रांनो आता तुम्हाला ITI काय आहे हे समजलं असेल. आता आपण ITI Full Form In Marathi बघणार आहोत.

ITI चा इंग्लिश मध्ये फुल्ल फॉर्म हा “Industrial Training Institute” असा होतो.

तसेच मराठीमध्ये ITI ला आपण “औद्योगिक प्रशिक्षण संस्था” असे म्हणतो.

महाराष्ट्रामध्ये भरपूर औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार या संस्थेमध्ये प्रवेश घेऊ शकता.

ITI कोण करू शकते?

मित्रांनो ITI कोणी पण करू शकते. ITI करण्यासाठी इच्छुक विद्यार्थी हा १०वी किंवा १२वी पास झालेला असावा.

तसेच यामध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्याचे वय हे १४ वर्ष्यापेक्षा कमी नसावे. बरेच विद्यार्थी हे १०वी नंतरच ITI ला प्रवेश घेतात. या मागे कारण असे कि ITI करून नोकरी हि लवकर लागते.

मित्रांनो ITI हे आपल्याला खासगी किंवा सरकारी महाविद्यालयातून करता येते.

ITI ला प्रवेश कसा घ्यावा? ITI ला प्रवेश प्रक्रिया कशी असते?

मित्रांनो जस कि आपलं बघितले कि १०वी – १२वी नंतर ITI ला प्रवेश घेता येतो. मग आता प्रवेश घेण्यासाठी १०वी – १२वी चा निकाल आल्यावर या प्रवेश प्रक्रियेला सुरवात होत असते.

साधारणतः ITI च्या प्रवेश प्रक्रियेला जून-जुलै महिन्यामध्ये सुरवात होते.

ITI ला प्रवेश घेण्याकरिता मी खाली संपूर्ण प्रवेश प्रक्रिया सांगत आहे.

 • तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही आय टी आय च्या अधिकारीक वेबसाईट वर जा. 
 • नंतर या वेबसाईट वर Candidate Login मध्ये New Candidate Registration वर जाऊन स्वतःला Register करावे.
 • आता तुम्ही या ठिकाणी तुमची सर्व माहिती भरा आणि मागितले जाणारे डॉक्युमेंट अपलोड करा आणि तुमचा अर्ज पाठवा.
 • नंतर काही दिवसात Merit List लागेल. 
 • हि List चेक करण्यासाठी तुम्ही वेळोवेळी वेबसाईट वर जाऊन तपासत राहा.
 • या List मध्ये तुम्हाला जे महाविद्यालय प्राप्त झाले आहे तेथे जाऊन तुमचा प्रवेश निश्चित करा.

हे पण जरूर वाचा :  MLA Full Form in Marathi: MLA म्हणजे काय?

ITI ला प्रवेशासाठी कोणते कागदपत्रे लागतात?

ITI ला प्रवेश घेण्याकरिता खालील कागदपत्रे आवश्यक असतात.

 • १०वी/१२वी ची मार्कशीट (10th/12th Marksheet)
 • १०वी/१२वी चे बोर्ड प्रमाणपत्र (10th/12th Board Certificate)
 • मेरिट लिस्ट (Merit List)
 • जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
 • डोमेसाइल प्रमाणपत्र (Domicile Certificate)
 • ओळख प्रमाणपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड) 
 • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र (TC)

तसेच या व्यतिरिक्त अजून काही कागदपत्रे लागू शकतात त्याची माहिती तुम्हाला फॉर्म भरते वेळी मिळून जाईल.

ITI मध्ये कोणत्या शाखा आहेत?

ITI मध्ये मुखतः दोनच शाखा आहेत एक म्हणजे Engineering आणि दुसरी म्हणजे Non-Engineering.

ITI Engineering शाखेमध्ये जाणाऱ्यांसाठी ८० पेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच ITI Non-Engineering शाखेमध्ये ५० पेक्षा जास्त कोर्सेस उपलब्ध आहेत.

जर तुम्हाला इंजिनिअरिंग या शाखेमध्ये आवड असेल तर तुम्ही या शाखेत जाऊ शकता तसेच जर तुम्हाला इंजिनिअरिंग शाखेव्यतिरिक्त जायचं असेल तर तुम्ही नॉन-इंजिनिअरिंग शाखेमध्ये जाऊ शकता.

मी खाली काही जास्त निवडल्या जाणाऱ्या शाखा सांगत आहे तुम्ही त्यापैकी सुद्धा आवडणारी शाखा निवडू शकता.

जास्त निवडल्या जाणाऱ्या शाखा:-

 • प्लंबर – Plumber
 • वायरमन – Wireman
 • फिटर – Fitter
 • इलेक्ट्रीशियन – Electrician
 • मेकॅनिस्ट – Machinist
 • मोल्डर – Moulder
 • टर्नर – Turner
 • कार्पेंटर – Carpenter
 • बुक बाइंडर – Book Binder
 • हेअर अँड स्किन केअर – Hair And Skin Care
 • ड्राफ्ट्समन – Draughtsman
 • पेंटर जनरल – Painter General
 • स्टेनोग्राफी इंग्रजी – Stenography English
 • इलेक्ट्रिकल मेंटेनन्स – Electrical Maintenance
 • संगणक तंत्रज्ञ – Computer Technician
 • नेटवर्क तंत्रज्ञ – Network Technician

ITI झाल्यानंतर नोकरी कुठे मिळते?

एकदा आय टी आय पूर्ण झाल्यानंतर अनेकांची नोकरी करण्याची इच्छा असते. ITI हे एक असे क्षेत्र आहे कि यामध्ये नोकरी मिळणे सहज शक्य आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रांमध्ये ITI च्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते.

जर तुम्ही एक ITI पास करून नोकरी शोधात असाल तर वर्तमान पत्रामध्ये आणि इंटरनेटवर तुम्हाला नोकरीविषयी भरपूर माहिती सहज प्राप्त होईल.

ITI करण्यासाठी किती खर्च येतो आणि पगार किती मिळतो?

मित्रांनो ITI करण्यासाठी लागणारा खर्च हा शिकणाऱ्या महाविद्यालयावर अवलंबून असतो. जसे जर तुम्ही शासकीय महाविद्यालयातून आय टी आय करत असाल तर तुम्हाला खर्च फार कमी किंवा काहीच खर्च येत नाही.

या व्यतिरिक्त जर तुम्ही खासगी महाविद्यलयातून आय टी आय करणार असाल तर तुम्हाला अंदाजे २० हजार रुपये ते ४० हजार रुपये इतका खर्च येऊ शकतो. परंतु हा खर्च सुद्धा तुम्ही निवडलेल्या शाखेनुसार कमी जास्त होत असतो.

तसेच आता नोकरी मध्ये पगार किती मिळतो यावर सांगायचे म्हटल्यास तुम्ही जर आत्ताच पास होऊन नोकरी करत असाल तर तुमचा पगार हा १५ हजार रुपयापासून ते ३० हजार रुपयापर्यंत राहू शकतो. हा पगार सुद्धा तुमच्या ITI झालेल्या क्षेत्रानुसार आणि तुम्हाला करावयाच्या कामावर अवलंबून दिला जातो.

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि ITI Full Form In Marathi काय होतो? ITI म्हणजे काय?, ITI कोण करू शकते?, ITI च्या प्रवेशासाठी कोणते कागदपत्रे लागतात?, ITI मध्ये कोणत्या शाखा आहेत?, ITI झाल्यावर नोकरी कुठे मिळते?, ITI नंतर पगार किती मिळतो?

मित्रांनो या लेखात मी दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असणार याची मला खात्री आहे. तसेच या लेखाद्वारे मी तुमचे काही महत्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी आणखी माहिती हवी असेल जे मी इथे देऊ शकलो नाही त्याबद्दल तुम्ही कंमेंट मध्ये जरूर सांगा.

तसेच हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल Comment करून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की सांगा आणि हा लेख तुमच्या ITI करणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की Share करा.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

 1. ITI करतांना वय किती आवश्यक आहे?

  उत्तर: ITI करण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय १४ वर्ष आले पाहिजे.

 2. ITI करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय?

  उत्तर: ITI करण्यासाठी विद्यार्थ्यांने १०वी किंवा १२वी पूर्ण केली असावी लागते.

 3. ITI चे प्रवेश प्रक्रिया कधी सुरु होते?

  उत्तर: ITI ची प्रवेश प्रक्रिया हे जून-जुलै महिन्यामध्ये १०वी/१२वी चा निकाल आल्यानंतर सुरु होत असते.

 4. ITI किती वर्ष्याचा कोर्स आहे?

  उत्तर: ITI मध्ये ६ महिन्यापासून ते दोन वर्ष्यापर्यंत चालणारे कोर्स आहेत.

Leave a Comment