IPS Full Form In Marathi: IPS म्हणजे काय?

IPS Full Form In Marathi
IPS Full Form In Marathi: IPS म्हणजे काय?

मित्रांनो तुम्ही बरेचदा IPS बद्दल एकल असेल, परंतु तुम्हाला माहित आहे का IPS म्हणजे काय? नाही तर मग आज आपण या लेखात IPS बद्दल बरीच माहिती जाणून घेणार आहोत.

आपण मागील लेखात बघितले कि IAS Full Form काय होतो? आणि आता या लेखात आपण जाणून घेऊयात IPS Full Form In Marathi काय होतो?, IPS म्हणजे काय?, IPS साठी लागणारी पात्रता?, IPS कोणत्या पदासाठी नियुक्त होतो?, IPS परीक्षा कशी द्यावी?, IPS परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?, IPS अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कसे असते?, IPS Meaning In Marathi.

तर मित्रांनो अश्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखात बघणार आहोत.

आपण माहिती बघण्यास सुरवात करू त्याअगोदर माझी तुम्हाला एक विनंती आहे कि तुम्हाला हा लेख फक्त शेवटपर्यंत वाचावा लागेल जेणेकरून तुमची सर्व प्रश्न दूर होतील.

तसेच अजून तुमच्या IPS बद्दल असणाऱ्या सर्व शंका तुम्ही आम्हाला खाली कंमेंट करून विचारू शकता.

चला तर मित्रांनो मग आता वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात IPS Information In Marathi.

IPS म्हणजे काय? IPS kay aahe?

IPS हे एक खूप मोठी जिम्मेदारी असणारे सरकारी पद आहे. IPS ला समाजात खूप मान आणि प्रतिष्ठा असते. दरवर्षी लाखो लोक हे IPS च्या पदासाठी परीक्षा व भरती प्रक्रियेत भाग घेतात परंतु यामध्ये काहीच लीक उत्तीर्ण होऊन या पदासाठी पात्र ठरतात.

मित्रांनो सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास IPS म्हणजे “भारतीय पोलीस सेवा” होय. या पदावर नियुक्त होण्याकरिता फार मेहनत घ्यावी लागते. दिवस रात्र एक करून अभ्यास करावा लागतो.

एका IPS कडे त्यांच्या प्रदेशाची सुरक्षा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी प्रवृत्तींपासून लोकांचे संरक्षण करणे इत्यादी कामे बघावी लागतात.

IPS या पदासाठी असणारी परीक्षा हि UPSC म्हणजेच संघ लोकसेवा आयोगाकडून करण्यात येते.

IPS Full Form In Marathi-IPS फुल फॉर्म मराठीमध्ये

मित्रांनो तुमच्या लक्ष्यात आलेच असेल कि IPS म्हणजे काय होते. आता आपण IPS Full Form In Marathi जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो IPS चा मराठी फुल फॉर्म हा “भारतीय पोलीस सेवा” असा होतो.

आणि याचा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Indian Police Service” असा होतो.

एका IPS अधिकाऱ्यांकडे खूप मोठी जिम्मेदारी असते. प्रदेशात शांतता आणि सुव्यवस्था राखणे, विविध गुन्ह्यांची तपासणी करणे इत्यादी कडे लक्ष देणे हे एका IPS अधिकाऱ्याचे काम असते.

IPS परीक्षेसाठी पात्रता काय असते?

आजच्या काळात कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांस आपण एका उच्च पदावर नियुक्त व्हावे असे वाटत असते, परंतु यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

तसेच एक IPS अधिकारी होण्याकरिता काही पात्रता हे आवश्यक असते, ती कोणती ते आता आपण बघणार आहोत.

१) नागरिकत्व:

मित्रांनो आय पी एस (IPS) परीक्षेकरिता पात्र होण्याकरिता उमेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा.

२) शैक्षणिक पात्रता:

IPS ची परीक्षा UPSC द्वारे घेतली जाते आणि या परीक्षेसाठी तुमच्याकडे कोणत्याही अभ्यासक्रमाची पदवी सरकारमान्यता प्राप्त विश्वविद्यालयातून असणे आवश्यक आहे.

जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षात शिकत असाल आणि IPS ची परीक्षा देऊ इच्छित असाल तर तुम्ही ती देऊ शकता. परंतु तुम्हाला प्रमाणपत्र पडताळणी करते वेळी तुमच्याकडे पदवी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असायला पाहिजे.

३) वयोमर्यादा:

IPS च्या परीक्षेकरिता वयोमर्यादा हि खालील प्रमाणे आहे. 

सर्व श्रेणी (Category) मधील उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे असणे आवश्यक आहे आणि कमाल वय हे वेगवेगळ्या श्रेणीप्रमाणे खालील प्रमाणे आहे.

  • सामान्य वर्ग (General)  – ३२ वर्षे
  • अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) – ३७ वर्षे 
  • इतर मागास वर्ग (OBC) – ३५ वर्षे

४) परीक्षा कितीदा देऊ शकतो:

हि परीक्षा देण्याकरिता काही मर्यादा आहेत. या मर्यादा श्रेणीनुसार वेगळ्या वेगळ्या आहेत.

  • सामान्य वर्ग (General)  – ६ वेळा  
  • अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) – उमेदवाराच्या ३७ वर्षे वयापर्यंत अमर्यादित.
  • इतर मागास वर्ग (OBC) – ९ वेळा

५) शारीरिक मूल्यमापन:

IPS परीक्षेसाठी काही शारीरिक दृष्ट्या मूल्यमापन केले गेले आहे ते खालीलप्रमाणे.

  • उंची (Height)  – IPS या पदासाठी पुरुषांसाठी उंची हि १६५ सेंमी (५ फूट ५ इंच) असायला हवी तसेच स्त्रियांसाठी उंची हि १५० सेंमी (४ फूट १२ इंच) असायला हवी. 
  • छाती (Chest) – IPS पुरुष उम्मेदवाराची छाती हि ८४ सेंमी तर महिला उम्मेदवाराची ७९ सेंमी असायला हवी.
  • नेत्र दृष्टी (Eye Vision) – स्वस्थ डोळ्यांसाठी दृष्टी ६/६ किंवा ६/९ आशयाला हवी. तसेच कमजोर डोळ्यांसाठी दृष्टी हे ६/१२ किंवा ६/९ असायला हवी.  तसेच डोळ्यांचा नंबर दुर दृष्टीसाठी -४.००डी पेक्षा जास्त नसायला हवा आणि जवळील दृष्टीसाठी +४.००डी  पेक्षा जास्त नसायला हवा.

IPS परीक्षेद्वारे कोणत्या कोणत्या पदांवर नियुक्ती होते?

IPS या पदासाठी नियुक्ती करतांना खालील पदावर नियुक्ती केली जाते.

  • सहायक पोलिस अधीक्षक- Assistant Superintendent of Police
  • पोलिस महानिरीक्षक (आयजीपी)- Inspector-General of Police (IGP)
  • पोलिस उपअधीक्षक (डीएसपी)- Deputy Superintendent of Police (DSP)
  • पोलिस महासंचालक (डीजीपी)- Director-General of Police (DGP)
  • अतिरिक्त पोलिस अधीक्षक (एएसपी)- Additional Superintendent of Police (ASP)
  • पोलिस अधीक्षक (एसपी)- Superintendent of Police (SP)
  • पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी)- Deputy Inspector General of Police (DIG)

IPS परीक्षा कशी द्यावी? How to Apply For IPS Exam

मित्रांनो IPS ची परीक्षा हि UPSC द्वारा आयोजित केली जाते त्यालाच संघ लोकसेवा आयोग परीक्षा म्हटले जाते.

UPSC दरवर्षी परीक्षा आयोजित करत असते. हि परीक्षा देण्याकरिता तुम्हाला UPSC च्या संकेतस्थाळावर अर्ज करायचा असतो. तिथे तुम्हाला योग्य माहिती देऊन आवश्यक कागदपत्रे उपलोड करावे लागतात. जसे कि तुमचा पासपोर्ट फोटो, तुमची स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र इत्यादी.

हे पण जरूर वाचा :  BSC Full Form in Marathi: BSC म्हणजे काय?

IPS परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

आय पी एस ची परीक्षा हि UPSC (Union Public Service Commission) कडून घेतली जाते. UPSC परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया हि ३ टप्प्यामध्ये होत असते.

  1. पूर्व परीक्षा (Prelims Exam)
  2. मुख्य परीक्षा (Mains Exam)
  3. मुलाखत (Interview)

पूर्व परीक्षेमध्ये उमेदवार उत्तीर्ण झाल्यावर तो मुख्य परीक्षेस पात्र होतो. नंतर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झ्याल्यास मुलाखतीस बोलावले जाते आणि मुलाखत घेऊन त्याला योग्य पदासाठी नियुक्त केले जाते.

तुम्हाला UPSC परीक्षेबद्दल अधिक माहिती जाणून घ्याची असेल तर वाचा UPSC म्हणजे काय?

IPS अधिकाऱ्ऱ्यांचे प्रशिक्षण कसे असते?

UPSC च्या तीनही टप्प्यांमधल्या परीक्षा उत्तीर्ण केल्यावर तुमचे ट्रेनिंग होत असते. हे ट्रेनिंग सामान्यतः चार टप्प्यांमध्ये होत असते.

१) फाउंडेशन कोर्स:

हा कोर्स उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वत प्रथम केला जातो. यासाठी तुम्हाला मसुरी येथे LBSNAA या अकॅडमीमध्ये बोलावले जाते. या कोर्सचा कालावधी हा तीन महिन्याचा असतो.

२) फेज १ प्रशिक्षण:

फाउंडेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढील ११ महिने हैद्राबाद मध्ये सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी (SVPNPA) येथे ट्रेनिंग पूर्ण केले जाते. 

३) जिल्हा स्तरीय प्रशिक्षण:

या प्रशिक्षणामध्ये IPS अधिकाऱ्यांना विविध जिल्ह्यांमध्ये इतर IPS अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले जाते. 

४) फेज २ प्रशिक्षण:

या प्रशिक्षणासाठी अधिकाऱ्यांना परत SVPNPA मध्ये बोलावून प्रशिक्षण दिले जाते. 

हि सर्व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उम्मेदवाराला पदावर नियुक्त केले जाते.

निष्कर्ष

आपण या लेखामध्ये बघितले कि IPS म्हणजे काय?, IPS साठी लागणारी पात्रताकाय?, IPS Meaning In Marathi, IPS परीक्षेद्वारे कोणत्या कोणत्या पदांवर नियुक्ती होते?, IPS साठी अर्ज कसा करावा? IPS परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते? IPS अधिकाऱ्ऱ्यांचे प्रशिक्षण कसे असते? तसेच IPS Long Form In Marathi.

तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल आणि तुमचे असणारे प्रश्न दूर झाले असेलच.

जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असल्यास आपण खाली Comment करून विचारू शकता.

तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. IPS साठी शैक्षणिक पात्रता काय?

    उत्तर: IPS साठी उम्मेदवार हा पदवीधारक असायला हवा.

  2. IPS परीक्षा कोणता भाषेत होत असते?

    उत्तर: IPS परीक्षा हि मराठी, हिंदी, इंग्लिश आणि अजून बऱ्याच भाषेत होत असते.

  3. IPS साठी पात्र होण्याकरिता वय मर्यादा किती पाहिजे?

    उत्तर: IPS साठी पात्र होण्याकरिता किमान वय मर्यादा हि २१ वर्षे आयला हवी.

  4. IPS कशी घेतली जाते?

    उत्तर: IPS ची परीक्षा हि “संघ लोकसेवा अयोग” म्हणजेच UPSC कडून घेतल्या जाते.

5 thoughts on “IPS Full Form In Marathi: IPS म्हणजे काय?”

Leave a Comment