ICU Full Form In Marathi: ICU म्हणजे काय?

ICU Full Form In Marathi
ICU Full Form In Marathi: ICU म्हणजे काय?

मित्रांनो आपण ICU बद्दल नक्कीच कुठे ना कुठे ऐकलं असेलच परंतु तुम्हाला ICU म्हणजे काय हे माहित आहे का?

तर मित्रांनो आजच्या या लेखात आपण जाऊन घेणार आहोत ICU Full Form In Marathi, ICU म्हणजे काय? ICU मध्ये कोणते उपकरणे असतात? रुग्णाला ICU मध्ये केव्हा भर्ती केल्या जाते? ICU च्या प्रकार/विशेषता काय आहे? ICU साठी खर्च किती येतो?

या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

हि माहिती जाणून घेण्यास सुरवात करू त्याअगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे कि तुम्हाला ICU बद्दल पूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल.

तसेच जर या लेखात काही अडचण असल्यास तुम्ही खाली कंमेंट करून आम्हाला नक्की विचारा.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात ICU Meaning In Marathi

ICU म्हणजे काय? ICU kay aahe?

मित्रांनो आपण बरेचदा ऐकतो कि एखादा रुग्णाला ICU मध्ये भर्ती करण्यात आले आहे. मग हे ICU नक्की असते काय?

तर मित्रांनो ICU म्हणजे एक वैद्यकीय क्षेत्रातील अति महत्वाचे कक्ष आहे. या कक्षामध्ये फक्त जे रुग्ण गंभीर आहेत त्यांनाच  उपचारासाठी ठेवले जाते.

आपण बरेचदा डॉक्टरांकडून ऐकतो कि त्यांनी रुग्णांना ICU मध्ये भर्ती करण्यास सांगितले आहे आणि हे एकूण बऱ्याच लोकांना चिंता वाटत असते.

वाटणार सुद्धा का नाही,

कारण ज्या वेळेस रुग्णाची तब्येत गंभीर असते आणि त्याला अत्यावश्यक सेवेची गरज असते त्याच वेळेस त्याला ICU मध्ये ठेवले जाते.

ICU मध्ये अत्याधुनिक आणि अत्यावश्यक यंत्र असतात. या यंत्रांद्वारे रुग्णांवर जातात तसेच या यंत्रांच्या साहाय्याने रुग्नांवर उपचार करणे सहज आणि सोपे होते.

ICU मध्ये रुग्णांवर विशेष लक्ष देऊन उपचार केल्या जातो आणि त्याला पूर्ण पणे बरे करण्याचा प्रयत्न केला जातो.

ICU Full Form In Marathi-ICU Meaning In Marathi

मित्रांनो वर दिलेल्या माहितीमधून तुमच्या लक्ष्यात आलेच असेल कि ICU म्हणजे काय होते. चला तर मग आता आपण ICU Full Form In Marathi जाणून घेऊयात.

मित्रांनो ICU चा मराठी फुल फॉर्म हा “अतिदक्षता विभाग” असा होतो. 

आणि याचा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Intensive Care Unit” असा होतो. 

ICU ला मराठीमध्ये “गहन चिकित्सा विभाग” असे सुद्धा म्हटले जाते.

ICU मध्ये रुग्णाला दाखल केल्यानंतर त्याची पूर्ण काळजी हि तेथील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडन घेतली जाते. तसेच एकदा रुग्णस ICU मध्ये दाखल केल्यानंतर त्याला त्याच्या परिवाराला किंवा परिवारातील कोणत्याही सदस्याला डॉक्टरच्या परवानगीशिवाय भेटण्यास सक्त मनाई असते.

रुग्णाला ICU मध्ये केव्हा भर्ती केल्या जाते?

रुग्णाला ICU मध्ये भर्ती करण्यासाठी सर्वात अगोदर काही चेकअप केल्या जातो. जेव्हा एखादा रुग्ण हा दवाखान्यात येतो त्याला डॉक्टरांकडून तपासण्यात येते आणि जर रुग्ण गंभीर नसेल तर त्याला साध्या उपचारपद्धतीने बरे केले जाते.

तसेच जर रुग्णाची स्थिती फारच गंभीर असेल अश्या वेळेस रुग्णास वेळ वाया न घालवता अति दक्षता विभाग म्हणजेच ICU मध्ये भर्ती केल्या जाते.

तसेच एखाद्या रुग्णाला कधी हार्ट अट्याक आला असेल, रुग्ण कोमा मध्ये गेला असेल, रुग्णाचा एखादा अवयव बंद पडला असेल, रुग्णाचा अति गंभीर अपघात झाला असेल या सर्व स्स्थितींमध्ये रुग्णास ताबडतोब ICU ला भर्ती केले जाते.

ICU मध्ये कोणते महत्वाचे उपकरण असतात?

मित्रांनो जसे कि आपण बघितले कि ICU मध्ये रुग्णाला आवश्यक यंत्रांद्वारे उपचार केला जातो. मग आता आपण जाणून घेणार आहोत त्या उपकरणांबाबत.

ICU मध्ये विविध उपकरण असतात त्यांच्या साहाय्याने रुग्नांवर उपचार करणे सोपे आणि आवश्यक असते. हे उपकरणे खालीलप्रमाणे आहेत.

१) व्हेंटिलेटर (Ventilator)

व्हेंटिलेटर चा उपयोग हा त्याच रुग्णांसाठी केला जातो ज्या रुग्णाला स्वास घेण्यास त्रास होत असतो. व्हेंटिलेटर मधून रुग्णास आवश्यकतेनुसार प्राणवायू दिल्या जातो.

२) फीडिंग ट्यूब (Feeding Tube)

फीडिंग ट्यूब हि एक नळी असते ज्याद्वारे रुग्णाला अन्न पुरवठा केला जातो. ज्या वेळेस रुग्णास जेवण घेण्यास त्रास होत असतो किंवा तो स्वतः अन्न घेऊ शकत नाही त्या वेळेस त्याच्या तोंडाद्वारे किंवा नाकाद्वारे हि फीडिंग ट्यूब टाकली जाते आणि त्याला अन्नाचा पुरवठा केला जातो.

३) हार्ट मॉनिटर (Heart Moniter)

हार्ट मॉनिटर हे एक आपल्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी असलेले मशीन आहे. या मशीन मध्ये एक डिजिटल स्क्रीन असते यावर वेगवेगळ्या रंगांच्या रेषा दिसत असतात आणि हे उपकरण बीप आवाज करत असते ज्यावरून येथील डॉक्टरांना रुग्णाची परिस्तिथी कशी आहे हे समजते.

४) पल्स ऑक्सिमीटर (Pulse Oximeter)

पल्स ऑक्सिमीटर हे एक लहानशे उपकरण आहे. हे उपकरण रुग्णाच्या बोटांवर लावले जाते. या उपकरणाद्वारे रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण मोजल्या जाते.

५) डायलिसिस (Dialysis)

डायलिसिस हे मशीन रुग्णाच्या शरीरातून अशुद्ध रक्त काढून त्याला शुद्ध करून पुन्हा रुग्णाच्या शरीरात घालण्यासाठी उपयोगी असते.

तसेच ICU मध्ये अजून बरेच लहान मोठे उपकरणे असतात परंतु वर सांगितलेले उपकरणे हे खूप महत्वाचे आणि आवश्यक असतात.

हे पण जरूर वाचा :  IPS Full Form in Marathi: IPS म्हणजे काय?

ICU मध्ये कोणती काळजी घ्यावी?

ICU हे एक अतिदक्षता विभाग असल्यामुळे येथे काळजी घेणे फार महत्वाचे असते. आता आपण त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

१) स्वच्छता:

आता ICU म्हटल्यावर स्वच्छता हे फार महत्वाची असते. ICU मध्ये रुग्णावर उपचार सुरु असतो आणि एखाद्यावेळेस कोणी परिवारातील सदस्य रुग्णाच्या भेटीसाठी जाणार असेल तर त्यांना सर्वात अगोदर हात हे स्वच्छ पाण्याने साफ करावे लागतात. जेणेकरून रुग्णाला कोणत्याही प्रकारचे संक्रमण होणार नाही.

२) मोबाईल फोन: 

ICU मध्ये रुग्णांना भेटण्यासाठी जायचे असेल तर आपण मोबाईल बंद किंवा नेण्याचे टाळावे लागते. यामागचे कारण असे कि ICU मध्ये असलेल्या उपकरणांमध्ये मोबाईलच्या वापराने बिघाड होऊ शकतो.

३) उपहार:

बरेचदा परिवारातील सदस्य रुग्णांच्या भेटीला येतात आणि ते काही उपहार सुद्धा सोबत आणत असतात. परंतु हे उपहार रुग्णांना देण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे असते कारण डॉक्टर रुग्णाच्या परिस्थितीनुसार रुग्णांना उपहार घेणास सांगत असतात.

४) तसेच ICU कक्षामध्ये गेल्यानंतर तेथे शांतता राखणे फार महत्वाचे असते जेणेकरून रुग्णाला कोणत्याहीप्रकारचा त्रास होणार नाही. एवढेच नाही तर आपल्यामुळे रुग्णाला मानसिक तणाव होणार नाही याची सुद्धा काळजी घेणे आवश्यक असते.

ICU चे प्रकार/विशेषता कोणत्या?

ICU चे वेगवेगळे प्रकार किंवा विशेषता खालील प्रमाणे आहेत.

१) Neonatal Intensive Care Unit (NICU):

या विभागामध्ये नवजात जन्मलेल्या बाळांना जर काही उपचाराची गरज असेल तर म्हणजे जर नवजात बाळाला काही आजार किंवा प्रकृती नाजूक असेल तर त्याचा उपचार हा या भागात केला जातो.

२) Pendiatric Intensive Care Unit (PICU):

या विभागामध्ये ज्या रुग्णांना इन्फ्लुएंजा, अस्थमा, ट्रॉमेटिक ब्रेन, डायबिटिक केटोएसिडोसी यासंबंधी आजार असेल तर त्यांचा उपचार केला जातो.

३) Psychiatric Intensive Care Unit (PICU):

या विभागामध्ये मानसिक दृष्ट्या कमजोर असलेल्या रुग्णांचा उपचार केला जातो. सविस्तर सांगायचे झाल्यास जे रुग्ण स्वतःला स्वतःच्या हाताने नुकसान पोहचवतात त्यांचा इलाज या विभागामध्ये केला जातो.

४) Coronary Care Unit (CCU):

या विभागामध्ये हृदयरोगाशी संबंधित असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात.

५) Mobile Intensive Care Unit (MICU):

हे एक रुग्णवाहिका आहे. यामध्ये ICU चे सर्व उपकरणे उपलब्ध असतात. एखाद्या आपातकालीन परिस्तिथीमध्ये रुग्णाला त्वरित उपचार मिळण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

ICU साठी खर्च किती येतो?

मित्रांनो ICU मध्ये लागणारा खर्च हा रुग्णाला लागलेल्या आवश्यक उपकरणांवर आणि ICU मध्ये भर्ती असलेल्या कालावधीवर अवलंबून असतो. 

जर रुग्णाचा उपचार हा खासगी रुग्णालयात होत असेल तर त्याला प्रति दिवस २० हजार ते ५० हजार खर्च येऊ शकतो. तसेच शासकीय रुग्णालयात हा खर्च यापेक्षा फार कमी लागत असतो. 

जर भर्ती केलेल्या रुग्णाचा विमा केलेला असेल तर त्याला या परिस्थिती मध्ये फार चांगली मदत मिळू शकते.

निष्कर्ष

आपण आजच्या या लेखामध्ये बघितले कि ICU म्हणजे काय?,  ICU म्हणजे काय? ICU मध्ये कोणते उपकरणे असतात? रुग्णाला ICU मध्ये केव्हा भर्ती केल्या जाते? ICU मध्ये कोणती काळजी घ्यावी? ICU च्या प्रकार/विशेषता काय आहे? ICU साठी खर्च किती येतो? तसेच ICU Long Form In Marathi.

तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली ICU बद्दलची माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल आणि तुमचे असणारे सर्व प्रश्न दूर झाले असेलच.

जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असल्यास आपण खाली Comment करून विचारू शकता.

तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. ICU मध्ये कोणत्या प्रकारचे रुग्ण भर्ती केल्या जातात?

    उत्तर: ICU मध्ये ज्या रुग्णांची परिस्थिती फार गंभीर असते त्यांना ICU मध्ये भर्ती केल्या जाते.

  2. ICU मध्ये सामान्य व्यक्तीला प्रवेश मिळतो का?

    उत्तर: ICU मध्ये डॉक्टरांच्या परवानगीशिवाय कोणत्याही सामान्य व्यक्तीला प्रवेश वर्जित असतो.

  3. ICU मध्ये कोणते उपकरणे असतात?

    उत्तर: ICU मध्ये व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, डायलिसिस, हार्ट मॉनिटर इत्यादी उपकरणे उपलब्ध असतात.

3 thoughts on “ICU Full Form In Marathi: ICU म्हणजे काय?”

  1. हो, खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद!…..

    Reply
  2. हो, खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद!…..

    Reply
  3. हो, खूप छान माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद!…..

    Reply

Leave a Comment