IAS Full Form in Marathi: IAS म्हणजे काय?

IAS Full Form In Marathi
IAS-Full-Form-In-Marathi

नमस्कार मित्रांनो, कधी ना कधी IAS हा शब्द तुमच्या कानावर आलाच असेल. परंतु तुम्हाला त्याबद्दल पूर्ण माहिती नसेल.

तुम्हाला माहित आहे का कि IAS म्हणजे काय?, IAS चा इतिहास, IAS साठी लागणारी पात्रता, IAS अधिकाऱ्यांचे काम आणि जिम्मेदारी, IAS Meaning In Marathi, IAS Full Form In Marathi काय होतो. 

तर मित्रांनो तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तरे आज आपण या लेखात बघणार आहोत. 

तुम्हाला फक्त हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल जेणेकरून तुमची सर्व प्रश्न/शंका दूर होतील. तसेच IAS बद्दल अजून काही शंका असल्यास आम्हाला खाली Comment करून विचारा. 

मग आता वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात IAS Information In Marathi.

IAS Full Form in Marathi: IAS म्हणजे काय?

Tweet

IAS म्हणजे काय? IAS kay aahe?

IAS म्हणजे “भारतीय प्रशासकीय सेवा” होय. आय ए एस ला समजामध्ये आणि सरकारी विभागामध्ये खूप मान असतो. म्हणूनच IAS हि एक खूप जास्त जिम्मेदारी असणारे सरकारी पद आहे. दरवर्षी बरेच लोक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात आणि त्यामधील बहुतेक लोकांना IAS होण्याची इच्छा असते. 

परंतु, IAS होणे इतके सोप्पे नाही. IAS होण्याकरिता दिवस-रात्र एक करून अभ्यास करावा लागतो. आपण खाली जाणून घेणारच आहोत कि आय ए एस होण्यासाठी काय पात्रता लागते? 

IAS होण्याकरिता परीक्षा द्यावी लागते, ती परीक्षा “संघ लोकसेवा आयोग” (UPSC- Union Public Service Commission) या विभागाकडून घेतली जाते. हि परीक्षा अशा प्रकारे आयोजित केली जाते कि योग्य आणि जिम्मेदार अधिकारी निवडल्या जातो.

IAS या पदासाठी जिम्मेदार अधिकारी निवडणे फार गरजेचे असते. कारण, हेच एकुलते एक पद असे आहे कि या पदाकडे सर्व सरकारी पदाचे नियंत्रण असते. कधी कधी आय ए एस (IAS) हे जिल्हाधिकारी (District Magistrate) म्हणून कार्यरत असतात.

IAS Full Form In Marathi-IAS फुल फॉर्म मराठीमध्ये

आतापर्यंत आपण बघितले कि IAS म्हणजे काय? आणि आता आपण बघणार आहोत IAS Full Form In Marathi

मित्रांनो IAS चा मराठीमध्ये अर्थ “भारतीय प्रशासकीय सेवा” असा होतो. तसेच IAS ला English मध्ये “Indian Administrative Service” असे म्हणतात.

आय ए एस ची परीक्षा हि “संघ लोकसेवा अयोगाकडून” घेतली जाते. “संघ लोकसेवा अयोगाला” इंग्लिश मध्ये “UPSC” असे म्हटले जाते. जाणून घ्या UPSC काय आहे?

IAS चा इतिहास-History of IAS

IAS चा हा खूप जुना आणि स्वातंत्र्यच्या काळातील आहे. वर्ष १९४७ मध्ये भारताचे विभाजन झाले. त्यामुळे भारतात असलेल्या सिव्हिल सर्विस ला भारत आणि पाकिस्तान यामध्ये विभाजित केले गेले. 

जो भाग भारतात राहिला त्याला ‘भारतीय प्रशासकीय सेवा’ असे नाव दिले गेले आणि जो भाग पाकिस्तान ला देण्यात आला त्याला ‘केंद्रीय सुपीरियर सेवा’ असे नाव देण्यात आले. 

भारतीय संविधानानुसार १५ अनुच्छेद ३१२ (२) च्या अंतर्गत आधुनिक भारतीय प्रशासनिक सेवा ची स्थापना केली गेली होती.

IAS परीक्षेसाठी पात्रता काय असते?

बऱ्याच स्पर्धा परीक्षा देत असलेल्या उमेदवारांचे स्वप्न असते कि आपण IAS अधिकारी व्हावे. परंतु, त्या परीक्षेसाठी साठी काही पात्रता असते. ती पात्रता आपण आता जाणून घेणार आहोत.

नागरिकत्व

आय ए एस (IAS) आणि आय पी एस (IPS) परीक्षेकरिता पात्र होण्याकरिता उमेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा. 

जर उमेदवार हा भूतान, नेपाळ, तिब्बत या क्षेत्रामधून येत असेल तर तो IAS आणि IPS या परीक्षा सोडून अन्य परीक्षा देऊ शकतो.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर उमेदवाराकडे कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे आणि ज्या महाविद्यालयातून हि पदवी प्राप्त झाली आहे ते महाविद्यालय हे सरकार मान्य असायला हवे. 

तसेच जर उमेदवार हा पदवीच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकत असेल तर तो सुद्धा या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो. परंतु, यामध्ये एक अट आहे ती म्हणजे अशी कि शेवटच्या वर्ष्यात शिकणारा उमेदवार हा प्रमाणपत्र पडताळणी च्या वेळेस आपली पदवी हि त्या विभाकडे सादर करेल.

वयोमर्यादा

या परीक्षेकरिता वयोमर्यादा हि खालील प्रमाणे आहे. 

सर्व श्रेणी (Category) मधील उमेदवाराचे किमान वय हे २१ वर्षे असणे आवश्यक आहे आणि जास्तीत जास्त वय हे खालील प्रमाणे आहे.

 • इतर मागास वर्ग (OBC) – ३५ वर्षे 
 • अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) – ३७ वर्षे 
 • सामान्य वर्ग (General)  – ३२ वर्षे

परीक्षा कितीदा देऊ शकतो

हि परीक्षा देण्याकरिता काही मर्यादा आहेत. या मर्यादा श्रेणीनुसार वेगळ्या वेगळ्या आहेत. 

 • इतर मागास वर्ग (OBC) – ९ वेळा  
 • अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) – उमेदवाराच्या ३७ वर्षे वयापर्यंत अमर्यादित.  
 • सामान्य वर्ग (General)  – ६ वेळा

IAS परीक्षेद्वारे कोणत्या कोणत्या पदांवर नियुक्ती होते?

IAS परीक्षा पास केल्या नंतर IAS अधिकाऱ्याला वेग-वेगळ्या पदावर नियुक्त केले जाऊ शकते ते पदे कोणती ते आपण जाणून घेणार आहोत.

IAS अधिकाऱ्यांची पदे खालीलप्रमाणे आहेत:

 • जिल्हा अधिकारी (DM)
 • आयुक्त 
 • मुख्य सचिव 
 • निवडणूक  आयुक्त 
 • कॅबिनेट सचिव 
 • सार्वजनिक क्षेत्र सचिव इत्यादी.

IAS परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते?

आय ए एस परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया हि UPSC परीक्षेद्वारे ३ टप्प्यामध्येच होत असते.

 • पूर्व परीक्षा (Prelims Exam)
 • मुख्य परीक्षा (Mains Exam)
 • मुलाखत (Interview)

पूर्व परीक्षेमध्ये उमेदवार उत्तीर्ण झाल्यावर त्याला मुख्य परीक्षा द्यावी लागते आणि नंतर मुख्य परीक्षा उत्तीर्ण झ्याल्यास मुलाखत घेऊन त्याला योग्य पदासाठी नियुक्त केले जाते.

IAS अधिकाऱ्यांचे काम आणि जिम्मेदारी

IAS अधिकाऱ्यांवर त्यांच्या असलेल्या क्षेत्राची खूप मोठी जिम्मेदारी असते. ते खालील प्रमाणे आहे. 

ज्या ठिकाणी IAS अधिकारी कार्यरत असतात तेथे त्यांना कलेक्टर, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, आयुक्त अश्या मोठ्या पदांवर नियुक्त केले जाते. मग त्याठिकाणी उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण करणे, सुरक्षा व सुव्यवस्था राखणे. 

तसेच केंद्र आणि राज्य सरकार चे धोरण लागू करणे. तसेच आपात्कालीन स्थितीमध्ये योग्य तो निर्णय घेणे. इत्यादी सर्व महत्वाचे कामे आणि निर्णय घेण्याचे काम हे IAS अधिकाऱ्यांकडे असते.

IAS परीक्षा कशी द्यावी? How to Apply For IAS Exam?

IAS परीक्षा हि “संघ लोकसेवा आयोगाकडून घेतली जाते. हि परीक्षा देण्याकरिता उमेदवारास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागतो.

त्यासाठी उमेदवारास संघ लोकसेवा आयोगाच्या” संकेतस्थळावर जाऊन आपले Regestration करावे लागते. नंतर तिथे योग्य माहिती देऊन आणि आपला फोटो व स्वाक्षरी उपलोड करून या पदासाठी अर्ज सादर करावा लागतो.

निष्कर्ष

आपण या लेखामध्ये बघितले कि IAS म्हणजे काय?, IAS साठी लागणारी पात्रता, IAS चा इतिहास, IAS Meaning In Marathi, IAS कोणत्या पदासाठी नियुक्त होतो?, IAS अधिकाऱ्यांचे काम आणि जिम्मेदारी, IAS परीक्षा कशी द्यावी? IAS साठी अर्ज कसा करावा? IAS परीक्षेमध्ये निवड प्रक्रिया कशी असते? तसेच IAS Full Form In Marathi.

तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली हि सर्व माहिती तुम्हाला आवडली असेलच आणि या लेखामधून तुमच्या सर्व शंका / प्रश्न दूर झाले असणार. जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असल्यास आपण खाली Comment करून विचारू शकता.

तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कंमेंट करून कळवा आणि हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.

FAQ’s

 1. IAS परीक्षा कोणत्या भाषेत होत असते?

  उत्तर: IAS परीक्षा हि मराठी, हिंदी, इंग्लिश आणि अजून बऱ्याच भाषेत होत असते.

 2. IAS साठी उमेदवार भारताचा नागरिक असायला हवा का?

  उत्तर: हो, IAS/IPS साठी उमेदवार हा भारताचा नागरिक असायला हवा आणि जर उमेदवार हा भूतान, नेपाळ, तिब्बत या क्षेत्रामधून येत असेल तर तो IAS आणि IPS या परीक्षा सोडून अन्य परीक्षा देऊ शकतो.

 3. IAS साठी पात्र होण्याकरिता वय मर्यादा किती पाहिजे?

  उत्तर: IAS साठी पात्र होण्याकरिता किमान वय मर्यादा हि २१ वर्षे आयला हवी.

 4. IAS परीक्षा कितीदा देता येते?

  उत्तर: IAS परीक्षा हि इतर मागासवर्गीय मधील (OBC) – ९, सामान्य वर्गामधील (General) – ६ आणि अनुसूचित जाती (SC ) /अनुसूचित जमाती (ST) मधील उमेदवारांना ३७ वर्षापर्यंत देता येते.

 5. IAS म्हणजे काय?

  उत्तर: IAS म्हणजे “भारतीय प्रशासकीय सेवा” होय.

12 thoughts on “IAS Full Form in Marathi: IAS म्हणजे काय?”

 1. जर आपण IAS ही परीक्षा मराठी मधून द्यायची असे ठरवले तर Interview मराठी मधूनच घेतात का अन्य वेगळ्या भाषेत?
  Please send me your answer sir🙇‍♀️

  Reply
  • आम्ही लवकरचं या लेखमध्ये अभ्यासक्रम आणि मागील प्रश्नपत्रिका सादर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही आमच्या साईट ला भेट देत रहा. धन्यवाद…

   Reply
 2. Sir या परिक्षा साठी अभायासक्रम कोणता आणि कधी पासुन सुरू करावा लागतो।

  Reply
  • या परीक्षेकरिता असलेला अभ्यासक्रम आम्ही इथे शक्य तितक्या लवकर आपल्यासमोर प्रदर्शित करू आणि या परीक्षेसाठी तयारी हि लवकरात लवकर सुरु केलेली चांगली.

   Reply

Leave a Comment