HDFC Full Form In Marathi: HDFC म्हणजे काय?

HDFC Full Form In Marathi
HDFC Full Form In Marathi: HDFC म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो, आपण बरेचदा HDFC बद्दल नक्कीच एकल असणार. परंतु तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती नसेल. तर मित्रांनो आपण या लेखात जाणून घेऊयात HDFC Full Form In Marathi, HDFC म्हणजे काय? HDFC चा इतिहास काय? HDFC आपल्या ग्राहकांना कोणत्या सुविधा देते? HDFC चे संस्थापक कोण? HDFC च्या सहाय्यक कंपन्या कोणत्या? तसेच मोबाईल बँकिंग खाते कसे उघडावे?

HDFC हि एक खासगी बँक आहे आणि हि बँक खासगी क्षेत्रामध्ये खुप नावाजलेली आणि चांगली बँक आहे.

HDFC बद्दल पूर्ण जाणून घेण्यासाठी तुम्ही हा लेख मानलावून शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला HDFC बद्दल कोणतीही शंका राहणार नाही.

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात HDFC Information In Marathi.

HDFC Full Form In Marathi: HDFC म्हणजे काय?

Tweet

HDFC म्हणजे काय? HDFC काय आहे?

HDFC हि एक भारतातील मुख्य बँकांपैकी एक बँक आहे. HDFC हि खासगी क्षेत्रातील एक महत्वाची आणि प्रसिद्ध बँक आहे. या बँकेमध्ये बऱ्याच लोकांचे व्यवहार आहेत. हि बँक व्यावसायिक, गुंतवणुक, इंटरनेट बँकिंग अश्या सर्व प्रकारच्या सेवा प्रदान करते.

HDFC बँकेच्या भारतात बऱ्याच ठिकाणी शाखा आहेत. तसेच HDFC चे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. HDFC बँक हे गृहकर्जे खूप कमी व्याज दरावर देणारी बँक आहे.

HDFC Full Form In Marathi-HDFC फुल फॉर्म मराठीमध्ये

आपण वर बघितले कि HDFC काय आहे? आता आपण जाणून घेणार आहोत कि HDFC चा फुल फॉर्म काय होतो.

HDFC चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Housing Development Financial Corporation” असा होतो.

तसेच HDFC ला मराठीमध्ये “गृहनिर्माण विकास वित्तीय निगम” असे म्हणतात.

तर मित्रांनो आता तुमच्या लक्ष्यात आलेच असेल कि HDFC चा फुल फॉर्म काय आहे.

हे पण जरूर वाचा :  PHD Full Form In Marathi: PHD म्हणजे काय?

HDFC चा इतिहास- History of HDFC

आता आपण HDFC बँकेचा इतिहास जाणून घेणार आहोत.

HDFC बँकेला १७ ऑक्टोबर १९७७ पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थापना केली होती. नंतर HDFC बँकेने बऱ्याच प्रकारच्या गृहकर्ज योजना राबविल्या आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला.

नंतर ऑगस्ट १९९४ मध्ये HDFC ची स्थापना हि खासगी बँक म्हणून करण्यास RBI (Reserve Bank Of India) ने मान्यता दिली आणि नंतर जानेवारी १९९५ मध्ये HDFC ला बँकेचा परवाना देण्यात आला.

सर्वप्रथम HDFC चे कार्यालय हे मुंबई येथे होते. HDFC बँकेचे कार्यकाळी संचालक हे आदित्य पुरी आहे.

१९९९ साली HDFC ने आपली पहिली वेबसाईट www.hdfcindia.com या नावाने सुरु केली होती जी आता www.hdfcbank.com या नावाने उपलब्ध आहे.

HDFC बँक आपल्या ग्राहकांना कोणत्या सुविधा देते?

मित्रांनो जर तुम्ही HDFC मध्ये खाते उघडले कि बँक तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या सुविधा देते. तुम्ही तुम्हाला लागणाऱ्या आवश्यक सुविधा अर्ज करून घेऊ शकता.

बँक हे तुम्हाला खालील सुविधा देत असते.

  • क्रेडिट कार्ड – Credit Card
  • कंझुमर बँकिंग – Consumer Banking
  • तारण कर्ज – Mortgage Loan
  • बँकिंग – Banking
  • खाजगी बँकिंग – Private Banking
  • खाजगी इक्विटी – Private Equity
  • संपत्ती व्यवस्थापन – Wealth Management
  • वित्त आणि विमा – Finance and Insurance 
  • गुंतवणूक बँकिंग – Investment Banking
  • गृह कर्जे – Home Loan
  • इंटरनेट बँकिंग – Net Banking
  • फिक्स डिपोसिट सेवा – Fixed Deposit

HDFC बँकेचे संस्थापक कोण आहेत?

HDFC बँकेची स्थापना हि “हसमुख पारेख” यांनी केली होती. यांचा जन्म हा गुजरातमध्ये सुरत येथे १० मार्च १९११ ला झाला होता.

हसमुख पारेख यांचा मृत्यू १८ नोव्हेंबर १९९४ ला झाला. आदित्य पुरी यांना या बँकेचा पदभार हा सप्टेंबर १९९४ लाच देण्यात आला होता.

HDFC बँकेच्या अन्य काही सहाय्यक कंपन्या

HDFC बँक हि केवळ एकच कंपनी नसून त्याच्या सहाय्यक कंपन्यासुद्धा आहेत. ज्या खालीलप्रमाणे आहेत.

  • एचडीएफसी बैंक लिमिटेड- HDFC Bank Ltd
  • एचडीएफसी वेंचर कैपिटल लिमिटेड- HDFC Venture Capital Ltd
  • एचडीएफसी एर्गो जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड- HDFC Ergo General Insurance Company Ltd
  • एचडीएफसी रियल्टी लिमिटेड- HDFC Realty Ltd
  • एचडीएफसी प्रॉपर्टी वेंचर्स लिमिटेड- HDFC Property Ventures Ltd
  • एचडीएफसी स्टैंडर्ड लाइफ इंश्योरेंस कंपनी लिमिटेड- HDFC Standard Life Insurance Company Ltd
  • एचडीएफसी होल्डिंग्स लिमिटेड- HDFC Holdings Ltd
  • एचडीएफसी ट्रस्टी कंपनी लिमिटेड- HDFC Trustee Company Ltd
  • एचडीएफसी इन्वेस्टमेंट्स लिमिटेड- HDFC Investments Ltd
  • एचडीएफसी डेवलपर्स लिमिटेड- HDFC Developers Ltd

HDFC बँकेमध्ये मोबाईल बँकिंगसाठी खाते कसे उघडावे लागते?

सध्या मोबाईल बँकिंग खूप महत्वाचे झाले आहे आणि HDFC मोबाईल बँकिंग बरेच लोक वापरू इच्छितात. परंतु यात खाते कसे उघडायचे हेच माहित नसल्याने ते या सेवेपासून वंचित राहतात.

तर मित्रांनो आता आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

  • सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store किंवा App Store वरून HDFC नेटबँकिंग अँप डाउनलोड करावे लागेल. 
  • त्यानंतर अँप उघडल्यावर तुम्हाला लॉगिन करायचे आहे. 
  • त्यासाठी तुम्हाला आपला ग्राहक क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. 
  • लक्ष्यात आसू द्या कि जो मोबाईल नंबर बँकेमध्ये दिला आहे तोच इथे टाकावा. 
  • आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP (One Time Password) येईल. 
  • तो OTP विचारलेल्या जागेत टाकून Continue बटनावर क्लिक करा. 
  • आता नंतर तुम्हाला ते कार्ड वर असणारी माहिती टाकायला सांगेल ते माहिती टाकून Continue वर क्लिक करा. 
  • आता आपले मोबाईल बँकिंग वर खाते उघडण्यात आले आहे आणि आता तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

HDFC बँकेची काही रोचक माहिती

  • HDFC बँक हि भारतातली सर्वात मोठी खासगी बँक आहे. 
  • HDFC बँकेचे पूर्ण भारतात १२ हजाराहून अधिक ATM हे कार्यरत आहेत. 
  • HDFC च्या बऱ्याच शाखा या मुंबई आणि दिल्ली येथे आहेत. 
  • HDFC बँकमध्ये सद्या १ लाख १७ हजार पेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. 
  • HDFC बँकेच्या शाखा या २६६४ शहरांमध्ये उपलब्ध आहेत. 
  • भारतात मोबाईल बँकिंग सेवा देणारे बरेच बँक आहेत परंतु सर्वात आधी मोबाईल बँकिंग सेवा देणारी बँक म्हणजे HDFC होय. 
  • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे HDFC बँकेने ६ डिसेम्बर २०१३ ला ७०९ ठिकाणी १११५ कॅम्पचे आयोजन केले होते ज्यामध्ये ६१९०२ लोकांनी रक्तदान केले होते आणि त्यामुळे HDFC बँकेचे नाव हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये दर्ज केल्या गेले आहे.

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि HDFC Full Form In Marathi काय होतो? HDFC म्हणजे काय?  HDFC चा इतिहास काय? HDFC आपल्या ग्राहकांना कोणत्या सुविधा देते? HDFC चे संस्थापक कोण? HDFC च्या सहाय्यक कंपन्या कोणत्या? तसेच मोबाईल बँकिंग खाते कसे उघडावे?

तसेच आपण या लेखात HDFC बद्दल काही रोचक तथ्य सुद्धा बघितले.

मित्रांनो मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि जर तुम्हाला या लेखामध्ये काही अडचण किंवा अजून माहिती हवी असल्यास तुम्ही खाली कंमेंट करू शकता.

तसेच दिलेल्या माहितीबद्दल मला आपल्या प्रतिक्रिया खाली Comment नक्की कळवा आणि हा लेख इतरांपर्यंत Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

हे पण जरूर वाचा

FAQ’s

  1. HDFC हे खासगी बँक आहे कि सरकारी?

    उत्तर: HDFC हे एक भारतातली सर्वात मोठी खासगी बँक आहे.

  2. HDFC बँकेची स्थापना कधी झाली?

    उत्तर: HDFC बँकेची स्थापना हि ऑगस्ट १९९४ मध्ये करण्यात आली.

  3. HDFC बँकेची स्थापना कोणी केली?

    उत्तर: HDFC बँकेची स्थापना हे “हसमुख पारेख” यांनी केली.

Leave a Comment