ED Full Form In Marathi: ED म्हणजे काय?

ED Full Form In Marathi
ED Full Form In Marathi: ED म्हणजे काय?

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो आपण बातम्यांमध्ये बघत असतो कि ED ने अमुक अमुक ठिकाणी छापेमारी केली आणि करोडो रुपयांची रोख रक्कम जप्त केली. अश्या बातम्या आपण बरेचदा एकत असतो. मग आता तुम्हाला ED बद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा असेल. तर आपण या लेखामध्ये ED Full Form In Marathi, ED म्हणजे काय?, ED Meaning In Marathi? ED चा मुख्य उद्देश काय? ED चे मुख्य कार्यालय कुठे आहे? इत्यादी माहिती बघणार आहोत.

मित्रांनो सोप्प्या भाषेत सांगायचे झाल्यास ED म्हणजे एक शासकीय संस्था आहे. हे संस्था आर्थिक घोटाळे, पैशांचे गैरव्यवहार, भ्रष्टाचार इत्यादींची चौकशी करून गुन्हेगारांना समोर आणण्याचे आणि शिक्षा देण्याचे काम करते.

तर मग आता आपण या लेखामध्ये ED बद्दल अजून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मला अपेक्षा आहे कि तुमच्या ED बद्दल असणाऱ्या सर्व शंका/प्रश्न या लेखामुळे दूर होतील.

परंतु त्याअगोदर मला तुम्हाला काही सूचना द्यायच्या आहेत त्या म्हणजे, तुम्ही हा लेख पूर्णपणे शब्ध न शब्द वाचावा आणि जर ह्या लेखातील माहितीचा तुम्हाला कोठेही उपयोग झाला तर आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा.

चला तर मित्रांनो आता क्षणभरही विलंब न करता जाणून घेऊयात ED Meaning In Marathi बद्दल?

ED Full Form In Marathi: ED म्हणजे काय?

Tweet

ED म्हणजे काय? ED Meaning In Marathi?

ED हे एक केंद्रीय तपास यंत्रणा आहे जे आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचार, पैशांचा गैरव्यवहार, बेहिशेबी मालमत्ता यांच्यावर लक्ष ठेवते आणि अश्या गैरव्यवहार करणाऱ्या लोकांवर योग्य ती कार्यवाही करते. ED ची स्थापना हि १ मे १९५६ रोजी करण्यात आली.

ED चे मुख्यालय हे दिल्ली येथे आहे असून मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि चंदीगढ येथे ED चे प्रादेशिक कार्यालय आहेत.

ED हा अर्थमंत्रालयाचा एक भाग आहे. त्यात भारतीय पोलीस अधिकारी, महसूल सेवा अधिकारी, प्रशासकीय सेवा अधिकारी हे कार्यरत असतात.

ED Full Form In Marathi-ED Long Form In Marathi

मित्रांनो, आपण वर बघितलेल्या माहितीतून तुम्हाला ED म्हणजे काय? हे तर समजलेच असेल. आता आपण ED Long Form In Marathi काय? हे जाणून घेणार आहोत.

मराठीमध्ये ED चा फुल फॉर्म हा “अंबलबजावणी संचालनालय” असा होतो.

आणि इंग्लिश मध्ये ED चा Full Form हा “Enforcement Directorate” असा होतो.

ED हि एक अशी संघटना आहे कि ज्याचे नाव ऐकूनच गैरव्यवहार करणाऱ्यांना घाम फुटतो तसेच या संघटनेमध्ये काम करणारे अधिकारीसुद्धा त्याचप्रमाणे बुद्धिवान आणि सामर्थ्यवान असतात.

हे पण जरूर वाचा :  ITI Full Form In Marathi: ITI म्हणजे काय?

ED चा मुख्य उद्देश काय?

आता आपण वर बघितले कि ED ची स्थापना हि १ मे १९५६ रोजी करण्यात आली. परंतु तुम्हाला माहित आहे का ED चा मुख्य उद्देश काय असतो?

तर मित्रांनो, ED ची स्थापना हे दोन कायद्यांची अंबलबजावणी करण्याकरिता करण्यात आली आहे.

ज्यामध्ये फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट १९९९ (Foreign Exchange Management Act 1999) आणि मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ (Prevention of Money Laundering Act 2002)

फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट १९९९ (Foreign Exchange Management Act 1999) ला FEMA असे सुद्धा म्हटले जाते.

तसेच मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ (Prevention of Money Laundering Act 2002) ला PMLA असे म्हटले जाते.

मग आता हे FEMA आणि PMLA म्हणजे नेमके काय? ते आपण जाणून घेऊ.

  • फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट १९९९ (FEMA): फेमाद्वारे परदेशात होणाऱ्या पैशांच्या व्यवहारावर लक्ष ठेवले जाते आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लोकांवर या काद्यानुसार कार्यवाही केली जाते.
  • मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा २००२ (PMLA): भ्रष्टाचार आणि गुन्हे करून जमवलेल्या संपत्तीवर लक्ष ठेवणे, त्यावर जप्ती आणणे आणि योग्य ती कार्यवाही करणे हे या काद्यानुसार करण्यात येते.

ED च्या सुरु असलेल्या कार्यवाह्या 

मित्रांनो जसे कि आपण वर बघितले कि ED हि वित्तीय भ्रष्टाचार आणि होणाऱ्या घोटाळ्यांवर लक्ष ठेवून योग्य ती कार्यवाही करते. 

परंतु सध्य स्थितीत काही मोठ्या व्यापाऱ्यांनी असाच भ्रष्टाचार केला आणि बँकेचे कर्ज बुडवण्याचा काम केले आहे. त्यांचा तपास घेणे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करणे हेच ED चे काम असते. 

मग आता आपण ED च्या सुरु असलेल्या कार्यवाया थोडक्यात जाणून घेऊया. 

मित्रांनो, आपल्या देशात बऱ्याच उद्योगपतींनी उद्योग करण्याच्या उद्देशातून बँकेकडून खूप मोठ्या प्रमाणात लोन घेतले होते आणि ते जेव्हा परत करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पळ काढून दुसऱ्या देशात शरण घेतली. त्यांचा शोध आणि त्यांच्यावर कार्यवाही सध्या ED करत आहे. 

तसेच जम्मू-कश्मीर क्रिकेट असोसिएशन घोटाळा असो , PMC बँकेची मनी लॉन्ड्रिंग केस असो किंवा PFI संघटन मधील घोटाळा असो या सर्व घोटाळ्यामध्ये किंवा जेथे पैशांची हेरा फेरी होते अश्या ठिकाणी कार्यवाही करण्याचे काम ED सध्या करत आहे. 

ED अश्या प्रकरणांवर योग्य ती कार्यवाही करून देशाची संपत्ती परत मिळवण्याचा प्रयत्न करते.

हे पण जरूर वाचा : Most Useful Information About Drowning Accident Lawyer

ED चे कार्यालय आणि संचालन 

ED म्हणजेच अंबलबजावणी संचालनालय चे मुख्य कार्यालय हे दिल्ली येथे आहे. ED चे प्रादेशिक कार्यालय हे मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि चंदीगढ येथे आहेत.

अहमदाबाद, बेंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, कोची, दिल्ली, पणजी, गुवाहाटी, हैद्राबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पाटणा, श्रीनगर या शहरात ED चे क्षेत्रीय कार्यालये आहेत.

त्याचप्रमाणे भुवनेश्वर, कोझिकोडे, इंदूर, मुदुरै, नागपूर, इलाहाबाद, रायपूर, डेहरादून, रांची, सुरत, शिमला, विशाखापट्टणम आणि जम्मू या शहरात ED चे उपक्षेत्रीय कार्यालय आहे.

दिल्ली येथे संचालक काम पाहत असतात तर प्रादेशिक कार्यालयामध्ये विशेष संचालक काम पाहत असतात.

त्याचप्रमाणे क्षेत्रीय कार्यालयामध्ये हे संयुक्त संचालक आणि उपक्षेत्रीय कार्यालयामध्ये उपसंचालक कार्यरत असतात.

सध्या ED चे मुख्य अधिकारी हे संजय कुमार मिश्रा आहेत. ते ED ला निर्देश आणि मार्गदर्शन देण्याचे काम करतात. संजय कुमार मिश्रा हे १९८४ साली IRS होते.

ED मध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक

ED मध्ये काम करणाऱ्यांची इच्छा हि बहुतेक लोकांना असते. परंतु यामध्ये काम करणे हे एक मोठी जिम्मेदारी आहे.

ED मध्ये मुख्यतः पोलीस, प्राप्तिकर विभाग, कस्टम विभाग, राज्य सेवा विभाग अश्या विभागामधून विशेष व्यक्तींना निवडून काम करण्याची संधी मिळत असते.

ED मध्ये जाण्यासाठी तुम्हाला विविध स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. यामध्ये MPSC, UPSC सारख्या अति अवघड परीक्षा द्याव्या लागतात आणि नंतर तुम्हाला योग्य ते प्रशिक्षण देऊन तुमच्या विविध चाचण्या घेऊन तुम्ही योग्य असल्यास तुम्हाला ED मध्ये अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळते.

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि ED म्हणजे काय?, ED चे कार्यालय कोठे आहे?, ED चा मराठीमध्ये फुल फॉर्म काय?, ED चा मुख्य उद्देश काय?, ED चे कार्यालय आणि संचालन, ED मध्ये अधिकाऱ्यांची नेमणूक कुठून होते?

मित्रांनो या लेखात मी दिलेली ED बद्दल माहिती तुम्हाला नक्की आवडली असणारच. तसेच या लेखाद्वारे मी ED बद्दल जास्तीत जास्त माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी आणखी माहिती हवी असेल जे मी इथे देऊ शकलो नाही त्याबद्दल तुम्ही कंमेंट मध्ये जरूर सांगा.

या लेखात दिलेल्या माहितीमध्ये तुम्हाला काही चूक किंवा दुरुस्ती करायची असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता.

तसेच हा लेख तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल Comment करून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा लेख तुम्ही मित्रांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर आणि इतरांबरोबर नक्की Share करा.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. ED चे मुख्य कार्यालय कुठे आहे?

    उत्तर: ED चे मुख्य कार्यालय हे दिल्ली येथे आहे.

  2. ED ची स्थापना कधी करण्यात आली?

    उत्तर: ED ची स्थापना हे १ मे १९५६ रोजी करण्यात आली.

  3. ED चा फुल फॉर्म काय?

    उत्तर: ED चा फुल फॉर्म हा “Enforcement Directorate” असा होतो. तसेच मराठीमध्ये ED ला “अंबलबजावणी संचालनालय” असे म्हटले जाते.

2 thoughts on “ED Full Form In Marathi: ED म्हणजे काय?”

  1. तुम्ही चांगला प्रयत्न केला.असेच आम्हाच्या साठी प्रयत्न करत रहा. डोक्यात भर टाकनारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.

    Reply

Leave a Comment