CRPF Full Form In Marathi: CRPF म्हणजे काय?

CRPF Full Form In Marathi
CRPF Full Form In Marathi: CRPF म्हणजे काय?

मित्रांनो आपण CRPF बद्दल बातम्यांमध्ये ऐकतच असतो. परंतु आपल्याला CRPF बद्दल पूर्ण माहिती नसते त्यामुळे आजच्या या लेखात आपण CRPF बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत CRPF Full Form In Marathi, CRPF म्हणजे काय? CRPF चा इतिहास आणि घोषवाक्य, CRPF साठी लागणारी पात्रता काय? CRPF मध्ये भरती प्रक्रिया कशी असते? CRPF चे काम काय असते? CRPF मध्ये किती वेतन मिळते?

तर मित्रांनो वरील सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत. 

आपण माहिती जाणून घेण्यास सुरवात करू त्याअगोदर मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. ती म्हणजे जर तुम्हाला CRPF ची संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही आमचा हा लेख शेवटपर्यंत वाचावा. 

तसेच जर या लेखात कोठेही काही अडचण असल्यास किंवा तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही खाली कंमेंट करून आम्हाला नक्की विचारू शकता. 

चला तर मग मित्रांनो वेळ वाया न घालवता जाणून घेऊयात CRPF Information In Marathi

CRPF म्हणजे काय? CRPF Kay Aahe?

मित्रांनो आपण बातम्यांमध्ये ऐकतच असतो कि CRPF च्या जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे. मग आपल्याला CRPF काय आहे? हे ठाऊक असणे फार गरजेचे आहे. 

मित्रांनो CRPF हि एक सर्वात मोठी केंद्रीय पोलिस दलाची तुकडी आहे. CRPF हि केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली राहून काम करते असते. 

CRPF चा मुख्य उद्देश हा देशात आणि राज्यात सुरक्षा आणि कायदे व्यवस्था सांभाळणे असतो. तसेच CRPF हे देशाच्या आतील संकटनासोबत बाहेरील देशविरोधी गतिविधींवर लक्ष ठेवण्याचे काम करत असते. 

इतकेच नव्हे तर CRPF हे दंगल च्या ठिकाणी, उग्रवाद आणि नक्षलवादी हालचाली असलेल्या ठिकाणी तैनात केल्या जातात आणि म्हणूनच CRPF मुळे आपला देश आणि भारतीय लोक शांततेने राहू शकतात.

CRPF Full Form In Marathi-CRPF Long Form In Marathi

मित्रांनो आपण वर बघितले कि CRPF काय आहे? आता आपण CRPF Full Form In Marathi जाणून घेणार आहोत 

मित्रांनो CRPF चा मराठी फुल फॉर्म हा “केंद्रीय राखीव पोलिस दल” असा होतो. 

आणि CRPF चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा “Central Reserve Police Force” असा होतो. 

तसेच, CRPF फुल फॉर्म हिंदी मध्ये “सेंट्रल रिजर्व पोलिस दल” असा होतो. 

CRPF हे भारतात अति दंगलीच्या भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात केल्या जातात आणि परिस्थिती सामान्य आणि शांत करण्यासाठी मेहनत घेत असतात.

हे पण जरूर वाचा : NDRF Full Form in Marathi: NDRF म्हणजे काय?

CRPF चा इतिहास आणि घोषवाक्य

आता आपण CRPF चा इतिहास जाणून घेणार आहो.

CRPF ची स्थापना

  • स्वतंत्र पूर्व काळामध्ये २७ जुलै १९३९ मध्ये ब्रिटिशांनी CRP (Crown Representatives Police) या दलाची स्थापना केली. याची स्थापना हे अति संवेदनशील राज्यामध्ये राहणाऱ्या ब्रिटिश लोकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आली होती. 
  • नंतर १९४९ मध्ये ‘CRPF अधिनियम १९४९’ नुसार CRP चे नाव बदलून CRPF करण्यात आले.

CRPF ची कामगिरी

  • भारताचा हॉट स्प्रिंग म्हटल्या जाणाऱ्या लद्दाख मधील एका भागावर २१ ऑक्टोबर १९५९ मध्ये चीनने CRPF वर हल्ला केला. हा हल्ला CRPF ने नाकाम केला परंतु यामध्ये २० CRPF जवानांच्या तुकडीमधील १० CRPF जवानांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. 
  • आणि म्हणूनच २१ ऑक्टोबर हा दिवस या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी ‘पोलिस स्मरणोत्सव दिवस’ (Police Commemoration Day) म्हणून साजरा केला जातो.
  • तसेच नंतर १९६२ मध्ये पुन्हा एकदा चीनने आक्रमण केले आणि यामध्ये सुद्धा CRPF ने अरुणाचल प्रदेश मध्ये भारतीय सेनेला खूप मदत केली. या मध्ये CRPF चे ८ जवान शाहिद झाले. 
  • १९६५ पर्यंत CRPF चे जवान भारत आणि पाकिस्तान सीमेवर पहारा दयायचे. 
  • १९६५ आणि १९७१ पश्चिमी आणि पूर्व सीमेवर भारत आणि पाकिस्तान युद्धात भारतीय सेनेबरोबर युद्धात महत्वाची भूमिका पार पडली. 
  • भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय अर्ध सैनिक दलातील महिलांची १ तुकडी आणि CRPF च्या १३ कंपन्याना आतंकवाद्यां विरोधात युद्धासाठी श्रीलंकेमध्ये पाठवल्या गेले होते. 
  • तसेच संयुक्त राष्ट्र शांती सेना चा एक अंग म्हणून CRPF जवानांना नामिबिया, हैती, मालदीव आणि सोमालिया मध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तैनात केल्या गेले होते. 
  • १९८० मध्ये पंजाब मधील आतंकवादी गतिविधी रोखणे आणि १९९० मध्ये त्रिपुरा येथील उग्रवादी गतिविधी वर नियंत्रण आणण्यामागे CRPF ने मोलाची कामगिरी केली होती. 
  • २००१ साली भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पराक्रम CRPF ने केला होता. 
  • नंतर २००८ मध्ये CRPF च्या विशेष तुकडीची स्थापना करण्यात आली होती. त्या तुकडीला COBRA (Commando Battalion for Resolute Action) असे म्हटले जाते. या तुकडीचा मुख्य उद्देश म्हणजे नक्षलवादी गतिविधी चा सामना करणे होय.

CRPF चे घोषवाक्य काय?

CRPF चे घोषवाक्य “सेवा आणि निष्ठा ” असे आहे.

CRPF साठी लागणारी पात्रता काय?

CRPF मध्ये काम करून देशसेवा करण्याची बहुतेक लोकांची इच्छा असते. परंतु CRPF मध्ये जाण्यासाठी काही पात्रता लागते त्याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

  • CRPF मध्ये भर्ती होण्याकरिता उमेदवाराचे किमान वय हे २० वर्ष असायला हवे आणि कमाल वय हे २५ वर्ष असायला हवे. 
  • SC/ST वर्गासाठी ५ वर्षाची, OBC वर्गासाठी ३ वर्षची आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी ५ वर्षाची सूट हि वयामध्ये देण्यात आली आहे. 
  • तसेच शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर उमेदवार हा १०वी किंवा १२वी पास असणे आवश्यक आहे. 

या शिवाय CRPF मध्ये जाण्याकरिता काही शारीरिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे ती खालीलप्रमाणे 

  • पुरुषांची उंची हि १७० सें मी पेक्षा जास्त असायला हवी. 
  • महिलांची उंची हि १५७ सें मी पेक्षा जास्त असायला हवी. 
  • पुरुषांमध्ये छाती हि  सामान्य स्थितीमध्ये ८०सें मी आणि फुगवून ८५ सें मी असायला हवी.

CRPF मध्ये भरती प्रक्रिया कशी असते?

मित्रांनो जर तुम्ही वर सांगितलेली पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही CRPF मध्ये भर्ती होऊ शकता. पण त्याअगोदर आपण भर्ती प्रक्रिया कशी असते ते समजून घेऊया. 

CRPF मध्ये भर्ती होण्याकरिता तुम्हाला सर्वात अगोदर CRPF साठी आवेदन करावे लागते. दरवर्षी हे आवेदन करता येते. आवेदन केल्यानंतर भर्ती प्रक्रिया प्रारंभ होते. 

हि भर्ती प्रक्रिया मुख्यातः ३ टप्यांमध्ये घेतली जाते. 

१) लेखी परीक्षा 

२) शारीरिक दक्षता परीक्षा आणि मेडिकल 

३) मुलाखत 

१) लेखी परीक्षा:

लेखी परीक्षा हि दोन टप्यांमध्ये होत असते. दोन्ही टप्पे मिळून एकूण ३०० गुणांची हि परीक्षा असते. मुख्यातः यामध्ये प्रथम प्रश्नपत्रिका हि २०० गुणांची आणि दुसरी प्रश्नपत्रिक हि १०० गुणांची होत असते. 

प्रथम प्रश्नपत्रिकेमध्ये सामान्य ज्ञान, रिजनिंग, जनरल अवेरर्नेस यावर आधारित प्रश्न विचारले जातात. 

तर दुसऱ्या प्रश्न पत्रिकेत हिंदी आणि इंग्लिश मध्ये निबंध लिखाण यावर प्रश्न विचारले जातात. 

या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला नंतरच्या परीक्षेसाठी बोलावण्यात येते. 

२) शारीरिक दक्षता परीक्षा आणि मेडिकल:

शारीरिक दक्षता परीक्षेमध्ये उमेदवारांना १०० मीटर ची धाव स्पर्धा, ५ मीटर आणि ३ मीटर ची लांब उडी, तसेच ०.५ आणि ०.९ मीटर ची उंच उडी अश्या परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात. 

या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांची मेडिकल चाचणी केली जाते आणि नंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. 

३) मुलाखत 

वरील सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्यात येते. मुलाखतीमध्ये उमेदवाराला महत्वाचे प्रश्न विचारून त्याची विचार करण्याची क्षमता, आत्मविश्वास आणि अजून बारीक सारीक गोष्टी तपासल्या जातात.

जर उमेदवार त्यांच्या अपेक्षेवर खरा उतरला कि मग त्याला उत्तीर्ण करून CRPF मध्ये नियुक्त केले जाते.

CRPF चे काम काय असते?

CRPF चे कार्य खालीलप्रमाणे आहे

  • दंगल असणाऱ्या विभागामध्ये नियंत्रण मिळवणे आणि शांती प्रस्तापित करणे. 
  • उग्रवादी गतिविधींवर लक्ष ठेवणे. 
  • मुख्य किंवा महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा प्रस्थापित करणे. 
  • प्राकृतिक आपत्तीच्या वेळी राहत आणि बचाव कार्य राबवणे

CRPF मध्ये किती वेतन मिळते?

CRPF मध्ये निवड झाल्यानंतर प्रत्येक पदासाठी वेगळा वेगळा पगार मिळत असतो. 

जसे कि 

  • असिस्टेंट कमांडेंट या पदासाठी ४६,८०० ते १,१७,३०० रु/महिना 
  • सब इंस्पेक्टर  या पदासाठी २७,९०० ते १,०४,४०० रु/महिना 
  • तर कांस्टेबल या पदासाठी १५,६०० ते ६०,६०० रु/महिना इतका पगार मिळतो.

निष्कर्ष

आपण आजच्या या लेखामध्ये बघितले कि CRPF म्हणजे काय? CRPF चा इतिहास आणि घोषवाक्य, CRPF साठी लागणारी पात्रता काय? CRPF मध्ये भरती प्रक्रिया कशी असते? CRPF चे काम काय असते? CRPF मध्ये किती वेतन मिळते? CRPF Long Form In Marathi, 

तर मित्रांनो मला खात्री आहे कि मी दिलेली CRPF बद्दलची माहिती तुमच्या उपयोगी पडली असेल आणि तुमचे असणारे सर्व प्रश्न/शंका दूर झाल्या असेलच.  

जर तुम्हाला काही अडचण किंवा शंका शिल्लक असल्यास आपण खाली Comment करून विचारू शकता.

तसेच हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर Share करायला विसरू नका.

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. CRPF साठी शैक्षणिक पात्रता काय?

    उत्तर: CRPF साठी १०वी किंवा १२वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

  2. CRPF ची स्थापना कधी करण्यात आली?

    उत्तर: CRPF ची स्थापना २७ जुलै १९३९ मध्ये ब्रिटिशांनी केली होती परंतु त्याचे नाव Crown Representatives Police असे ठेवण्यात आले होते.

  3. CRPF चे जुने नाव काय होते?

    उत्तर: CRPF जुने नाव हे CAP (Crown Representatives Police) असे होते.

2 thoughts on “CRPF Full Form In Marathi: CRPF म्हणजे काय?”

  1. माझी ह्राईट १५५ आहे. तर मी त्यासाठी पात्र नाही होऊ शकत का?

    Reply
    • सांगितल्याप्रमाणे महिलांची उंची हि १५७ से.मी. पेक्षा जास्त असायला हवी आणि पुरुषांनी उंची १७० सें मी पेक्षा जास्त असायला हवी.

      Reply

Leave a Comment