
मित्रांनो आपण आपल्या मित्रपरिवारात विचारणा केली कि तुमचं शिक्षण काय? तर ते BSC करत आहे असे सांगतात. पण आपल्याला BSC म्हणजे काय? हे माहिती असणे फार गरजेचे असते.
आज आपण या लेखात जाणून घेऊया BSC Full Form In Marathi काय होतो? BSC काय आहे? BSC कसे करावे? BSC मध्ये असणारे प्रसिद्ध कोर्सेस कोणते? BSC नंतर नोकरीच्या संधी कुठे कुठे असतात? तसेच BSC करण्यासाठी लागणारी पात्रता.
तर मित्रांनो ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याकरिता हा लेख पूर्णपणे शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला काही शंका- प्रश्न राहणार नाही. तसेच हा लेख इतरांबरोबर सहारे करायला विसरू नका.
चला तर मित्रांनो जाणून घेऊयात BSC Meaning In Marathi
Table of Contents
BSC म्हणजे काय? BSC काय आहे?
मित्रांनो BSC हि एक पदवी आहे. हि पदवी घेण्याकरिता तुम्हाला १२वी उत्तीर्ण करावी लागते. १२ झालेल्या विद्यार्थ्यांचा जास्त कल हा याच पदवीकडे असतो. हा पदवी कोर्स ३ ते ४ वर्ष्यापर्यंत असतो.
BSC ची पदवी हि जगात सर्वात जास्त केल्या जाणाऱ्या पदवीपैकी एक आहे. BSC मध्ये सर्वात जास्त हे विज्ञानाचे विषय शिकवले जातात. BSC मध्ये गणित, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, जीवशास्त्र, जीवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, जैव तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान, कृषी, नर्सिंग इत्यादी विषय शिकवले जातात.
BSC मध्ये दोन प्रकारच्या पदव्या असतात. एक म्हणजे BSC (Hons) आणि दुसरी म्हणजे BSC (General). या दोघांमध्ये जास्त फरक नाही. परंतु BSC मध्ये थेअरी आणि त्याचे प्रॅक्टिकल तसेच कोणत्याही एका विषयावर जास्त भर दिला जात असतो.
BSC Full Form In Marathi- BSC Long Form In Marathi
वरील दिलेल्या माहितीतून तुमच्या लक्ष्यात तर आले असेल कि BSC हि ग्रॅजुएशन ची एक पदवी आहे.
चला आता आपण BSC चा Long Form In Marathi जाणून घेऊ.
मित्रांनो BSC चा इंग्लिश लॉन्ग फॉर्म हा “Bachelor Of Science” असा होतो
तर मराठीमध्ये BSC फुल फॉर्म हा “विज्ञान स्नातक” असा होतो.
BSC हा कोर्स पूर्ण झाल्यावर आपल्याला अनेक ठिकाणी नोकरीच्या संधी या उपलब्ध होत असतात. आता या नोकरीच्या संधी कोणत्या आणि कुठे उपलब्ध होतात ते आपण या लेखात शेवटी जाणून घेऊया.
हे पण जरूर वाचा : ATM Full Form in Marathi: ATM म्हणजे काय?
BSC मध्ये प्रवेशासाठी पात्रता काय?
आता आपण जाणून घेणार आहोत कि BSC ला प्रवेश घेताना कोणती पात्रता लागते.
- BSC ला प्रवेश घेण्यास इच्छुक असलेला विद्यार्थी १२वी उत्तीर्ण असला पाहिजे.
- १२ वी मध्ये विद्यार्थ्याने विज्ञान विषय घेतलेला असावा.
- १२वी मध्ये विद्यार्थ्याचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित ह्या विषयांमध्ये किमान ५०% मार्क्स हे असायला हवे.
- तसेच एकूण १२वी मध्ये विद्यार्थी हा ६०% गुणांनी उत्तीर्ण असला पाहिजे. जेणेकरून चांगले विद्यालय मिळायला अडचण येणार नाही.
- जर १०वी नंतर ३ वर्षीय डिप्लोमा केला असेल तरी सुद्धा BSC ला प्रवेश मिळू शकतो.
- तसेच BSC करण्याकरिता वयोमर्यादेचा विचार केला तर यासाठी फक्त किमान वय हे १८ वर्ष पूर्ण असले पाहिजे.
- तुम्हाला आवडीनुसार विद्यालय निवडण्याकरिता काही विद्द्यालयांकडून वेगळी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत जितके चांगले मार्क्स मिळतील तितकेच चांगले विद्यालय निवडता येते.
तर मित्रांनो जर तुमचीसुद्धा BSC करण्याची इच्छा असेल आणि तुम्ही वर दिलेली पात्रता पूर्ण करत असाल तर तुम्ही BSC ला प्रवेश घेऊ शकता.
BSC मध्ये असलेले प्रसिद्ध कोर्सेज
आपण जसे ITI मध्ये बघतो कि तेथे वेगवेगळ्या शाखा असतात जसे स्थापत्य, इलेकट्रीशियन तसल्याच प्रकारच्या शाखा ह्या BSC मध्ये आहेत.
BSC मध्ये असलेल्या शाखा ह्या खालीलप्रमाणे आहेत.
- Bachelor Of Science In Mathematics: गणित विषयातील विज्ञान पदवी
- Bachelor Of Science In Botany: वनस्पती विज्ञान शाखेत पदवी
- Bachelor Of Science In Computer Science: संगणक विज्ञान विषयातील पदवी.
- Bachelor Of Science In Physics: भौतिकशास्त्रातील विज्ञान पदवी
- Bachelor Of Science In Chemistry: रसायनशास्त्रातील विज्ञान पदवी
- Bachelor Of Science In Microbiology: मायक्रोबायोलॉजी मध्ये विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Zoology: प्राणीशास्त्रातील विज्ञान पदवी
- Bachelor Of Science In Animation: अॅनिमेशन मध्ये विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Genetics: अनुवंशशास्त्र विषयात विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Information Technology: विज्ञान तंत्रज्ञान विषयातील तंत्रज्ञान
- Bachelor Of Science In Physical Science: भौतिक विज्ञानात विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Electronics: इलेक्ट्रॉनिक्स मध्ये विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Multimedia: मल्टीमीडिया मध्ये विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Nursing: नर्सिंग मध्ये विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Agriculture: कृषी क्षेत्रातील विज्ञान पदवी.
- Bachelor Of Science In Food Technology: फूड टेक्नॉलॉजी मध्ये विज्ञान पदवी.
BSC मध्ये जास्त घेतले जाणारे विषय
आपण आताच वर BSC च्या शाखा बघितल्या. वरील दिलेल्या शाखांपैकी तुम्ही एक शाखा निवडू शकता तसेच या शाखेत विशिष्ट विषय असतात त्या विषयांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो.
ते विषय कोणते हे आता आपण जाणून घेऊयात. BSC मध्ये जास्त घेतले जाणारे विषय खालीलप्रमाणे आहेत.
- Biology: जीवशास्त्र
- Computer Science: संगणक शास्त्र
- Biochemistry: बायोकेमिस्ट्री
- Physics: भौतिकशास्त्र
- Chemistry: रसायनशास्त्र
- Electronics: इलेक्ट्रॉनिक्स
- Mathematics: गणित
- Environmental Science: पर्यावरण विज्ञान
- Zoology: प्राणीशास्त्र
- Botany: वनस्पतीशास्त्र
BSC करण्याकरिता किती खर्च येतो?
BSC करण्याकरिता खर्च हा प्रत्येक क्षेत्रासाठी वेगळा वेगळा असू शकतो. BSC मध्ये परीक्षा फी, प्रवेश फी, एनरोलमेंट फी इत्यादी भरावी लागते. याचा पूर्ण खर्च हा शासकीय विद्यालयामध्ये तीन वर्ष्यासाठी २५ हजार रुपयांपर्यंत जातो. तसेच खासगी विद्यालयांमध्ये हा खर्च प्रत्येक विद्यलयाचा वेगळा वेगळा असतो.
BSC नंतर नोकरीच्या संधी कुठे कुठे असतात?
BSC पूर्ण केल्यानंतर तुम्ही पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकता जसे कि MBA, MCA इत्त्यादी. तसेच जर तुमची इच्छा हि नोकरी करण्याची असेल तर तुम्ही खालील विभागामध्ये नोकरी शोधू शकता.
- Research Labs: संशोधन प्रयोगशाळा
- Agriculture: शेती विभाग
- Medical industry: वैद्यकीय उद्योग
- Private Sector Electronics Manufacturers: खाजगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादक
- Academic and Educational Institutions: शैक्षणिक संस्था
- Research and Development: संशोधन आणि विकास
- Banking Industry: बँकिंग उद्योग
- Financial Services: आर्थिक सेवा
- Broadcasting: प्रसारण विभाग
- Education Industry: शिक्षण उद्योग
- Accounting and Finance: लेखा आणि वित्त विभाग
- Entertainment: करमणूक विभाग
- Broking Industries: ब्रोकिंग इंडस्ट्रीज
- Pharmaceutical companies: औषध कंपन्या
- Data communication: डेटा संप्रेषण
या वरील क्षेत्रांमध्ये तुम्ही तुमचे भविष्य शोधू शकता. तसेच या सर्व क्षेत्रात तुम्हाला चांगल्या नोकरीच्या संधी प्राप्त होतात.
निष्कर्ष
आपण या लेखात बघितले कि BSC Long Form काय? BSC म्हणजे काय? BSC मध्ये प्रवेशासाठी पात्रता काय? BSC मध्ये असलेले प्रसिद्ध कोर्सेज कोणते? BSC मध्ये जास्त घेतले जाणारे विषय कोणते? BSC करण्याकरिता किती खर्च येतो? BSC नंतर नोकरीच्या संधी कुठे कुठे असतात? BSC साठी लागणारी पात्रता काय?
मित्रांनो आशा करतो मी दिलेली माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल. जर या लेखात मी कोणती माहिती देऊ शकलो नसेल किंवा तुमच्या काही शंका शिल्लक असेल तर तुम्ही खाली Comment करून आम्हाला नक्की कळवा.
तसेच हा लेख इतरांपर्यंत Share करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आपणास नक्की प्रतिसाद देऊ.
धन्यवाद…
आमचे प्रसिद्ध लेख
- Patent Meaning In Marathi: पेटंट म्हणजे काय?
- KYC Full Form In Marathi: KYC म्हणजे काय?
- 9+ Benefits of Chia Seeds In Marathi | Chia Seeds Meaning In Marathi | Chia Seeds In Marathi Name
- Auto, Truck and Motorcycle Accident Lawyer
- Oilfield Accident Lawyer
BSC साठी काय पात्रता लागते?
उत्तर: BSC साठी तुमची १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
BSC म्हणजे काय?
उत्तर: BSC हि एक पदवी आहे जी १२वी नंतर करता येऊ शकते.
BSC साठी काय पात्रता लागते?
उत्तर: BSC साठी तुमची १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक असते.
BSC साठी प्रवेश प्रक्रिया कशी असते?
उत्तर: BSC ला प्रवेश घेण्याकरिता तुमचे १२वी चे मार्क्स महत्वाचे असतात आणि त्यानुसार तुम्हाला विदयालयाची निवड करावी लागते. यामध्ये तुम्हाला जितके जास्त मार्क्स तितके चांगले विद्यालय मिळत असते.
Thank you sir very helpful information
बॅंकिंग पगार काय आहे
पगार हा प्रत्येक पदानुसार वेगवेगळा असतो.
Sir bsc kelyanntr aapl graduation complete hot ka???
हो, BSC केल्यानंतर तुम्ही पदवीधर म्हणजेच ग्रॅज्युएट होता.
Very Important Information 👍
Thank You, Sneha
Sir thank you tumi sagalich mahiti saghitlya badhal pn si maza yek questions ahe ki aapan jar biochemistry vishay nivadhala tr aapn konti job karu shakto v tya madhe kay shikavle jate
Thank you so much sir very helpfully