BHMS Full Form In Marathi: BHMS काय आहे?

BHMS Full Form In Marathi: BHMS काय आहे?
BHMS Full Form In Marathi: BHMS काय आहे?

मित्रांनो नमस्कार,

आपण मागच्या लेखात जाणून घेतले कि MBBS काय आहे? आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत BHMS बद्दल. 

मित्रांनो तुम्ही अनेक ठिकाणी BHMS बघितले असेल आणि वाचले सुद्धा असेल. परंतु तुम्ही आमचा हा लेख वाचत आहेत याचा अर्थ तुम्हाला हवी ती माहिती मिळाली नाही. 

तर मित्रांनो आता तुम्ही काही काळजी करण्याचं कारण नाही. आम्ही या लेखात तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करू. 

या लेखात आपण BHMS म्हणजे काय? BHMS Full Form In Marathi काय? BHMS साठी लागणारी पात्रता,  BHMS ची प्रवेश प्रक्रिया, BHMS कोर्स चा कालावधी,  BHMS ला लागणारा खर्च, BHMS मधील नोकरी पेशा, BHMS केल्यानंतर पुढे काय? इत्यादी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

आपण या लेखाला सुरवात करू त्याअगोदर मला तुम्हाला एक सूचना द्यायची आहे ती म्हणजे अशी कि तुम्हाला BHMS बद्दल पूर्ण जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुम्ही पूर्णपणे शेवटपर्यंत मन लावून शब्द नि शब्द वाचावा जेणेकरून तुमच्या काही शंका राहणार नाही. 

तसेच जर तुमच्या काही शंका किंवा प्रश्न शिल्लक राहतील तर तुम्ही आम्हाला खाली कंमेंट मध्ये विचारू शकता. 

चला तर मित्रांनो जाणून घेऊयात BHMS Information In Marathi.

BHMS म्हणजे काय? BHMS काय आहे?

मित्रांनो १० वि आणि १२वी पूर्ण केल्यानंतर आपल्याला विविध भविष्याच्या संधी उपलब्ध होत असतात आणि म्हणूनच हा काळ आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट म्हणून ओळखल्या जातो.

१०वी-१२वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोणी इंजिनिअरिंगकडे, कोणी BSC कडे तर कोणी MBBS कडे जाण्याचा आणि आपले भविष्य बनवण्याचा निर्णय घेतात. 

मग आता हे BHMS म्हणजे काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

तर मित्रांनो BHMS हि एक डॉक्टर क्षेत्रातील पदवी आहे. हि पदवी डॉक्टर क्षेत्रातील होमिओपॅथीक या विभागाची असते. ज्यामध्ये होमिओपॅथीक बद्दल शिक्षण दिले जाते. 

होमिओपॅथीक चा कोर्स केल्यानंतर किंवा या विभागातून पदवी प्राप्त केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला डॉक्टर म्हणून संबोधले जाते आणि नंतर तुम्ही स्वतः चे क्लिनिक उघडून लोकांना आजारापासून मुक्त करून आपली सेवा देऊ शकता.

BHMS Full Form In Marathi- BHMS Long Form In Marathi

उपरोक्त दिलेल्या माहितून तुमच्या लक्षात आलेच असेल कि BHMS हि एक डॉक्टर क्षेत्रातील पदवी आहे.

आता आपण BHMS चा Long Form In Marathi जाणून घेणार आहोत.

मित्रांनो BHMS चा मराठी फुल फॉर्म हा होमिओपॅथीक औषध आणि शस्त्रक्रिया पदविकाअसा होतो. 

तसेच BHMS चा इंग्लिश मध्ये फुल फॉर्म हा Bachelor of  Homeopathic Medicine and Surgery असा होतो.

तर मित्रांनो BHMS हे मेडिकल क्षेत्रातील एक असे विभाग आहे ज्यामध्ये रुग्णाचा आजार हा पूर्णपणे बरा करून रुग्णाला स्वस्थ केल्या जाते. या मध्ये औषध हे सतत घ्यावी लागते आणि उपचार पद्धत हि थोडी जास्त काळ चालणारी असते.

हे पण जरूर वाचा :  MBBS Full Form in Marathi: MBBS म्हणजे काय?

BHMS साठी लागणारी पात्रता

मित्रांनो मेडिकल च्या क्षेत्रात आपले भविष्य करण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही महत्वाची पात्रता हवी असते. ती पात्रता कोणती असते त्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात. 

BHMS साठी असलेली पात्रता हि खालील प्रमाणे आहे:

  • BHMS करण्यासाठी तुम्हाला १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • तुम्ही १२वी मध्ये विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयातून करणे आवश्यक आहे. 
  • तसेच १२वी मध्ये तुम्हाला कमीत कमी ५०% गुण असणे आवश्यक आहे आणि रिजर्व्ह असलेल्या साठी कमीत कमी ४५% गुण असणे आवश्यक आहे. 
  • वयोमर्यादेबद्दल सांगायचे झाल्यास विद्यार्थ्यांचे कमीत कमी वय हे १७ वर्ष आणि जास्तीत जास्त २५ वर्ष असणे आवश्यक आहे. 
  • तुमची १२वी झाल्यानंतर तुम्हाला चांगले कॉलेज मिळवण्यासाठी NEET ची परीक्षा देऊन चॅनल गुण प्राप्त करावे लागतात.

BHMS ची प्रवेश प्रक्रिया

मित्रांनो आपण वर BHMS साठी लागणारी पात्रता जाणून घेतली. त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे फक्त १२वी करून BHMS करता येत नाही तर त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. 

प्रवेश परीक्षेमध्ये आपल्याला NEET ची परीक्षा द्यावी लागते. या प्रवेश परीक्षेमध्ये चांगल्यात चांगले गुण प्राप्त करून मिळालेल्या गुणांनुसार आपल्याला भारतातील चांगल्या सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश मिळत असतो 

तसेच NEET शिवाय अजून काही प्रवेश परीक्षा आहेत त्यामध्ये खालील परीक्षांचा समावेश आहे.

  • NIH BHMS एंट्रेंस टेस्ट
  • PU CET (पंजाब युनिव्हर्सिटी कॉमन एंट्रेंस टेस्ट)
  • AP EAMCET (आंध्र प्रदेश इंजीनियरिंग एग्रीकल्चर एंड मेडिकल कॉमन एंट्रेंस टेस्ट)
  • TS EAMCET (तेलंगाना इंजीनियरिंग एग्रीकल्चर एंड मेडिकल कॉमन एंट्रेंस टेस्ट)
  • KEAM (केरला इंजीनियरिंग एग्रीकल्चर एंड मेडिकल)
  • UP CET (उत्तर प्रदेश कॉमन एंट्रेंस टेस्ट)

या परीक्षा देऊन सुद्धा तुम्हाला त्या विशिष्ट्य राज्यांच्या कॉलेज ला प्रवेश मिळू शकतो.

BHMS कोर्स चा कालावधी

BHMS करण्यासाठी लागणारा कालावधी हा ५ वर्ष आणि ६ महिन्याचा असतो. यामध्ये ४ वर्ष ६ महिने आपल्याला शैक्षणिक शिक्षण शिकवले जाते  आणि नंतर १ वर्षासाठी इंटर्नशिप करावी लागते. 

१ वर्षाची इंटर्नशिप करणे हे फार महत्वाचे आणि अनिवार्य झाले आहे. कारण इंटर्नशिप केल्यायानंतर तुम्हाला प्रत्यक्ष ज्ञान येते तसेच त्याशिवाय तुम्हाला पदवी सुद्धा मिळत नाही.

BHMS ला लागणारा खर्च

BHMS साठी लागणार खर्च का कॉलेज नुसार वेगळा वेगळा असू शकतो. हा खर्च सरकारी आणि खासगी कॉलेज मध्ये वेगळा असतो. 

जर तुम्हाला NEET मध्ये किंवा इतर प्रवेश परीक्षेमध्ये चांगले गुण प्राप्त झाले असेल तर तुमाला सरकारी कॉलेज ला प्रवेश मिळू शकतो आणि तुमचा सरकारी कॉलेज मध्ये लागणार खर्च हा खासगी कॉलेज पेक्षा फारच कमी असतो.

सरकारी कॉलेज मध्ये BHMS साठी लागणार खर्च हा जवळपास १० हजार ते ३० हजार यामध्ये असू शकतो. तसेच खासगी कॉलेज ला हा खर्च जवळपास २ ते ३ लाखापर्यंत जाऊ शकतो.

BHMS मधील नोकरी पेशा

BHMS मध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही विशिष्ट क्षेत्रात जात येते व ते ओढ मिळवता येते. ते पदे कोणती ते खालील प्रमाणे आहे:

  • डॉक्टर
  • शास्त्रज्ञ
  • चिकित्सक 
  • वैद्यकीय व्याख्याता
  • थेरपिस्ट
  • खाजगी सराव
  • सल्लागार
  • फार्मासिस्ट
  • सार्वजनिक आरोग्य तज्ञ
  • वैद्यकीय सहाय्यक
  • स्पा संचालक

BHMS केल्यानंतर पुढे काय?

BHMS केल्यानंतर तुम्हाला पुढे नोकरीच्या उत्तम संधी मिळतात. त्या बद्दल आता आपण जाणून घेऊयात. 

BHMS केल्यानंतर खालील क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत:

  • सरकारी / प्राइवेट हॉस्पिटल्स
  • मेडिकल कॉलेजस
  • रिसर्च इंस्टिट्यूट
  • नर्सिंग होम
  • ट्रेनिंग इंस्टिट्यूट
  • कन्सलटंसिस
  • होम्योपैथिक मेडिसिन सेंटर 
  • चेरीटेबल इंस्टिट्यूसंस
  • लाइफ साइंस इंडस्ट्रीज
  • फार्मा इंडस्ट्रीज
  • हेल्थकेयर कम्युनिटी
  • डिस्पेंसरीस

या क्षेत्रात तुम्ही नोकरी करू शकता किंवा काही काळ सराव करून तुम्ही स्वतःचे क्लीनिक उघडू शकता.

भारतातील काही प्रमुख BHMS कॉलेज

  • श्रीमती. चंदाबेन मोहनभाई पटेल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज – (CMPHMC), मुंबई
  • महाराष्ट्र विद्यापीठ आरोग्य विज्ञान – (MUHS), नाशिक
  • भारती विद्यापिठ – (BVU), पुणे
  • गुरु गोबिंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ – (GGSIPU), नवी दिल्ली
  • नेहरू होम्योपैथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल – (NHMCH), नवी दिल्ली
  • बेक्सन होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल – (BHMCH), ग्रेटर नोएडा
  • महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्स – (MIMS), विजयनगरम
  • NTR आरोग्य विज्ञान विद्यापीठ – (NTRU) विजयवाडा
  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालय / राजेंद्र रुग्णालय- (GMCP), पटियालासरकारी वैद्यकीय महाविद्यालय / राजेंद्र रुग्णालय- (GMCP), पटियाला
  • सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय – (GMCH), चंडीगढ़
  • महाराजा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस- (MIMS) आंध्र प्रदेश
  • माधव विद्यापीठ – (MU), सिरोही
  • बाबा फरीद विद्यापीठ आणि आरोग्य विज्ञान – (BFUHS), फरीडकोट
  • येनेपोया विद्यापीठ – (YU) , मंगळूर
  • जनार्दन राय नगर राजस्थान विद्यापीठ – (JENRV) उदयपूर
  • श्री साईराम होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र – (SHMCRC), चेन्नई
  • वेंकटेश्वर होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल – (VHMCH), चेन्नई
  • शासकीय होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालय – (GHMC), बंगलोर
  • नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी – (NIH), कोलकाता
  • फादर मुलर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज – (FMHMC), कर्नाटक

BHMS मध्ये असणारे काही महत्वाचे विषय

तसे BHMS मध्ये प्रत्येक वर्षी वेगवेगळे विषय अभ्यासासाठी असतात. परंतु त्यापैकी आपण काही महत्वाचे विषय जाणून घेऊयात.

  • होमिओपॅथिक तत्त्वज्ञानाची तत्त्वे (Principles of Homoeopathic Philosophy)
  • शरीरशास्त्र (Anatomy)
  • ऑर्गनॉन ऑफ मेडिसिन (Organon of Medicine)
  • भ्रूणविज्ञान (Embryology)
  • होमिओपॅथिक मटेरिया मेडिका (Homeopathic Materia Medica)
  • होमिओथेरपी (Homeotherapeutic)
  • कम्युनिटी मेडिसिन (Community Medicine)
  • स्त्रीविज्ञान (Gynaecology)
  • हिस्टोलॉजी (Histology)
  • फॉरेन्सिक मेडिसिन (Forensic Medicine)

वरील सर्व विषयांचा अभ्यास BHMS मध्ये करावा लागतो. 

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि BHMS म्हणजे काय? BHMS Long Form In Marathi काय? BHMS साठी लागणारी पात्रता,  BHMS ची प्रवेश प्रक्रिया, BHMS कोर्स चा कालावधी,  BHMS ला लागणारा खर्च, BHMS मधील नोकरी पेशा, BHMS केल्यानंतर पुढे काय?, भारतातील काही प्रमुख BHMS कॉलेज, BHMS मध्ये असणारे काही महत्वाचे विषय कोणते?  

मित्रांनो मी आशा करतो कि मी दिलेली BHMS बद्दलची माहिती तुम्हाला उपयोगी पडली असेल. जर या लेखात मी कोणती माहिती देऊ शकलो नसेल किंवा तुम्हाला काही चूक सापडली असेल तर तुम्ही खाली Comment करून आम्हाला नक्की कळवा. 

तसेच हा लेख इतरांपर्यंत Share करायला विसरू नका. याव्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आपणास नक्की प्रतिसाद देऊ. 

धन्यवाद…

आमचे प्रसिद्ध लेख

FAQ’s

  1. BHMS करण्यासाठी NEET आवश्यक आहे का?

    उत्तर: १२ करून BHMS कडे जाण्याकरिता NEET आवश्यक आहे. NEET मध्ये चांगले गुण प्राप्त करून तुम्हाला चांगले कॉलेज मिळवता येते.

  2. BHMS करण्यासाठी किती वर्ष लागतात?

    उत्तर: BHMS करण्यासाठी ५ वर्ष ६ महिने लागतात. यापैकी १ वर्ष इंटर्नशिप करावी लागते.

  3. BHMS साठी कमीत कमी किती शिक्षण पात्रता आहे?

    उत्तर: BHMS साठी कमीत कमी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Leave a Comment