ATM Full Form In Marathi: ATM म्हणजे काय?

ATM Full Form In Marathi
ATM Full Form In Marathi: ATM म्हणजे काय?

आपल्या दररोजच्या कामात वापरला जाणारा शब्द म्हणजे ATM. आपण बाहेर गावी गेल्यावर पैसे काढण्याकरिता ATM चा वापर करून सहजरित्या पैसे काढू शकतो.

परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का कि ATM Full Form In Marathi काय होतो? ATM चे प्रकार कोणते असतात? आपण आज या लेखात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

आजच्या या लेखात आपण ATM म्हणजे काय? ATM Long Form काय? ATM कसे काम करते? ATM चे प्रकार कोणते? इत्यादी प्रश्नांबाबत माहिती बघणार आहोत.

आपण माहिती जाणून घेण्यास सुरवात करू पण तुम्ही हा लेख शेवटपर्यंत वाचावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. जेणेकरून तुम्हाला असलेल्या सर्व शंका दूर होतील.

चला तर मग जाणून घेऊयात ATM Meaning In Marathi.

ATM Full Form In Marathi: ATM म्हणजे काय?

Tweet

ATM चा इतिहास:History Of ATM

अमेरिकन लुथर जॉर्ज सिमजियन यांनी १९६० मध्ये बँकोग्राफ नावाची एक मशीन तयार केली. हि मशीन पैसे जमा करण्याकरिता तयार करण्यात आली होती. नंतर हि मशीन जुन १९६७ मध्ये लंडनमधील Barclays bank च्या एका शाखेत ठेवण्यात आली. तसेच जॉन शेफर्ड-बॅरन या ब्रिटिश शोधकर्त्याला या शोधाचे श्रेय दिले जाते.

ATM म्हणजे काय?:ATM काय आहे?

मित्रांनो ATM म्हणजे एक इलेकट्रोनिक टेलिकम्युनिकेशन मशीन आहे ज्याचा उपयोग हा पैसे काढणे, पैसे पाठवणे अश्या अनेक प्रकारच्या पैशांच्या व्यवहारामध्ये होतो.

ATM च्या या मशीन तुम्ही शहराच्या विविध भागात बहुतेक वेळा बघितल्या आहेत. ATM मशीन आल्यापासून बँकेचे व्यवहार हे अधिक सोप्पे आणि जलद झाले आहेत.

ATM मशीनमुळे पैसे काढणे आणि पाठवणे सोपे झाल्याने बँकेमध्ये जाणून स्लिप भरणे आणि नंतर त्यावर अधिकाऱ्यांची सही व शिक्का घेण्याची गरज फार प्रमाणात कमी झाली आहे.

आता या मशिनमधून पैशांचा व्यवहार करण्यासाठी बँकेकडून तुम्हाला एक प्लास्टिक चे कार्ड मिळते. या कार्ड सोबत तुम्हाला एक गोपनीय पिन (Password) दिला जातो. जो आपल्याला आपले कार्ड मशीन मध्ये टाकल्यानंतर टाइप करावा लागतो. नंतरच आपले पैशांचे व्यवहार करणे शक्य होत असते.

ATM Full Form In Marathi : ATM Long Form मराठीमध्ये

मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या लक्ष्यात आलेच असेल की ATM म्हणजे एक माशीन आहे.ज्याद्वारे आपण पैशांची लेन-देन खुपच सोप्प्या पद्धतीने करू शकतो.

आता आपण ATM चा फुल फॉर्म जाणून घेऊयात.

मित्रांनो इंग्लिश मध्ये ATM चा फुल फॉर्म हा Automated Teller Machineअसा होतो.

तसेच मराठीमध्ये ATM चा फुल फॉर्म हा “स्वयंचलित टेलर मशीन” असा होतो.

ATM चा वापर हा आजच्या काळात खुप वाढला असून याचे भरपूर फायदे आहेत.

तसेच जुन्या काळात बाहेर गावी पैसे पाठवायचे असल्यास आपल्याला मनीऑर्डर करावी लागायची आणि त्याला पण घेणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचायला खूप दिवस लागायचे.

याउलट आता हे ATM मशीनद्वारे आपण तात्काळ काही मिनिटात कोणत्याही ठिकाणी पैसे पाठवू शकतो.

ATM मधून व्यवहार कसे करतात?:ATM कसे कार्य करते?

मित्रांनो ATM चा Long Form आपण बघितला कि Automated Teller Machine असा होतो. आता आपण हे ATM कार्य कसे करते ते जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम कोणत्याही ATM मधून पैशांचा व्यवहार करण्याकरिता एका ATM कार्डची गरज असते. हे ATM कार्ड प्लास्टिक चे बनलेले असते आणि हे कार्ड आपल्याला बँकेकडून प्राप्त होत असते.

तसेच ATM कार्ड सोबत आपल्याला एक गोपनीय पिन भेटत असतो हा पिन फक्त आणि फक्त आपल्या ATM कार्ड सोबतच काम करतो.

आता आपल्याकडे हे ATM कार्ड असेल तर हे कार्ड आपल्याला ATM मशीनमध्ये असलेल्या लहानश्या जागेत काहीवेळेसाठी टाकावे लागते.

काही वेळेस काही मशीनमध्ये आपले कार्ड हे दिलेल्या जागेत फिरवावे लागते म्हणजेच Card Swap करावे लागते.

या ATM कार्ड मध्ये आपली सर्व माहिती साठवलेली असते. हि माहिती कार्ड वर असलेल्या काळ्या पट्टीमध्ये इलेकट्रोनिक पद्धतीने साठवलेली असते. ती माहिती ATM मशीनद्वारे ओळखली जाते.

हे कार्ड तुम्ही Swap केल्यानंतर ते तुम्हाला तुमची माहिती हे असलेल्या Screen वर दिसते. जसे कि तुमचे नाव आणि इतर गोष्टी. नंतर ते तुम्हाला खालील गोष्टी विचारते.

Cash Withdrawl: यामध्ये तुमचे पैसे हे काढण्याचे काम केले जाते.

Cash Deposit: यामध्ये तुम्हाला पैसे हे तुमच्या किंवा इतरांच्या खात्यात जमा करता येतात.

Bank Statement: यामध्ये तुम्हाला तुमचे मागचे काही व्यवहाराची माहिती प्राप्त होत असते. हे एक प्रकारचे Passbook Entry असल्यासारखे आहे.

Money Transfer: यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील पैसे हे दुसऱ्याच्या खात्यात पाठवता येतात.

हे पण वाचा : Hanuman Chalisa Pdf Download

वरील विचारणा करण्यात आल्यानंतर तुम्हाला आपल्या गरजेनुसार निवड करावी लागते. नंतर ते तुम्हाला तुमचा बँकेमधून मिळालेला पिन विचारते आणि पिन टाईप केल्यानंतर पैश्यांची रक्कम टाकून तुमचा व्यवहार हा पूर्ण केल्या जातो.

तसेच तुमचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर मशिनमधून एक पावती प्राप्त होते. ज्यावरून तुम्हाला तुमचा व्यवहार हा पूर्ण आणि सुरक्षित पद्धतीने झाला आहे हे समजते.

हे पण जरूर वाचा : SSC Full Form In Marathi: SSC म्हणजे काय?

ATM चे कोणते कोणते प्रकार असतात?

ATM चे हे विविध प्रकार पाहायला मिळतात. आता आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.

१) ऑन साईट ATM (On-site ATM): जे ATM बँकेच्या परिसरात असते त्याला ऑन साईट ATM म्हटले जाते. 

२) ऑफ साईट ATM (Off-site ATM): जे ATM हे बँकेच्या परिसरात नसून इतर ठिकाणी असते त्याला ऑफ साईट ATM म्हटले जाते. 

३) ऑनलाइन ATM (Online ATM): जे ATM हे थेट बँकेच्या सर्व्हर सोबत जोडलेले असते त्याला ऑनलाइन ATM म्हटले जाते. 

४) ऑफलाइन ATM (Offline ATM): जे ATM हे बँकेच्या सर्व्हर सोबत जोडलेले नसते त्याला ऑफलाइन ATM म्हणतात. 

५) यल्लो लेबल ATM ( Yellow Label ATM): ई-कॉमर्स सुविधेसाठी यल्लो लेबल ATM असतात. 

६) व्हाईट लेबल ATM (White Label ATM): जे ATM हे नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनीने स्थापित केले असते त्याला व्हाईट लेबल ATM म्हटले जाते.

७) पिंक लेबल ATM (Pink Label ATM): हि ATM फक्त आणि फक्त महिलांच्या वापरासाठी असतात. 

८) ग्रीन लेबल ATM (Green Label ATM): हे ATM फक्त कृषी संबंधीत असणाऱ्या व्यवहारासाठी असतात.

९) ब्राऊन लेबल ATM (Brown Label ATM): हे ATM बँकेच्या मालकीचे नसते आणि बँकेकडून हे भाडेतत्वावर घेतले जाते तसेच हे ATM बँकेशी जोडलेले असते.

१०) ऑरेंज लेबल ATM (Orange Label ATM): हे ATM शेअर्स चे व्यवहार करण्याकरिता वापरले जाते.

Privately Owned ATM Machines म्हणजे काय?

Privately Owned ATM Machines हि एक अशी ATM मशीन असते ज्यावर कोणत्याही सरकारी किंवा वित्तीय संस्थेचा संबंध नसतो. हि ATM मशीन ज्या दुकान, मॉल, संस्थेवर असते त्यावर पूर्ण हक्क हा फक्त आणि फक्त त्याच संस्थेचा/ दुकानाचा असतो.

Privately Owned ATM Machines ह्या प्रामुख्याने विकसित देशांमध्ये आपल्याला बघायला मिळतात.

Privately Owned ATM Machines या प्रामुख्याने अमेरिकेमध्ये किराणा दुकान, शॉपिंग मॉल, रेस्टॉरंट सारख्या ठिकाणी दिसून येतात. या मशीन त्यांच्या मालकाद्वारे सांभाळल्या जातात ज्यामध्ये त्यात पैसे टाकणे, पैसे पाठवणे इत्यादी सुविधा उपलब्ध असतात.

Privately Owned ATM Machines ला व्हाईट लेबल ATM (White Label ATM) असे सुद्धा म्हटले जाते.

ATM मशीन ला असणारे विविध भाग:Parts of ATM Machine

ATM हे विविध भागांचे बनलेले असते. विविध भाग जोडून एक ATM मशीन तयार होते. आता ते विविध भाग कोणते ते आपण जाणून घेणार आहोत.

ATM मशीन ला खालील भाग असतात:

१) Central Processing Unit: हा भाग ATM चा मेंदू असतो. सर्व काही माहिती साठविण्याचे काम हा भाग करत असतो. तसेच इतर भागांना आज्ञा देण्याचे काम या भागाद्वारे करण्यात येते. 

२) Magnetic card Reader: या भागाद्वारे आपण ATM मशीन मध्ये टाकलेल्या कार्डने आपली ओळख होते नंतर मग आपल्याला आपल्या बँक खात्याशी जोडले जाते. 

३) Keyboard: जसे आपल्या मोबाइलवर अनेक बटन असतात तसेच बटन हे ATM मशीन मध्ये सुद्धा असतात. या बटनांद्वारे आपण आपला पिन टाकून व्यवहार पूर्ण करत असतो. 

४) Display: आपण ATM कार्ड टाकल्यानंतर आपल्याला जो व्यवहार करायचा असतो त्यासंबंधीची माहिती हे आपल्याला ATM मध्ये असणाऱ्या स्क्रीन वर प्राप्त होत असते. 

५) Function Key: हे बटन आपल्या Keybord च्या बाजूला किंवा स्क्रीन वर दिसत असतात. यांचा उपयोग हा व्यवहार पूर्ण करणे किंवा रद्द करण्याकरिता करण्यात येतो. 

६) Cash dispenser: हा एक अतिमहत्वपूर्ण भाग आहे. या भागामधून तुम्हाला तुमची रोख रक्कम प्राप्त होते. 

७) Record Printer: हे एक छोटेशे प्रिंटर असते ज्याद्वारे आपल्याला आपल्या व्यवहार पूर्ण झाल्याची पावती प्राप्त होते.

८) Speaker: ATM मशीन मध्ये एक स्पिकरसुद्धा असतो ज्याद्वारे आपल्याला वेळोवेळी आपल्या व्यवहाराची माहिती दिली जाते.

आमचे प्रसिद्ध लेख

निष्कर्ष

आपण या लेखात बघितले कि ATM Long Form काय? ATM म्हणजे काय? ATM मधून व्यवहार कसे करतात? ATM चा इतिहास काय? ATM चे कोणते कोणते प्रकार असतात? ATM मशीन ला असणारे विविध भाग कोणते?

मला अशा आहे मी दिलेल्या माहितीतुन तुमचे सर्वच प्रश्न दूर झाले असणार. तसेच दिलेल्या माहितीबद्दल आम्हाला आपल्या प्रतिक्रिया खाली Comment करून नक्की कळवा आणि हा लेख इतरांपर्यंत Share करायला विसरू नका.

याव्यतिरिक्त तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही आपणास नक्की प्रतिसाद देऊ.

धन्यवाद…

FAQ’s

  1. ATM द्वारे कोणते व्यवहार केले जातात?

    उत्तर: ATM द्वारे पैसे काढणे, पैसे पाठवणे, खाते चेक करणे, बँक स्टेटमेंट काढणे इत्यादी व्यवहार केले जातात.

  2. ATM मशीन वापरण्यासाठी काय आवश्यक असते?

    उत्तर: ATM मशीन वापरण्यासाठी ATM Card आणि त्याचा PIN आवश्यक असतो.

  3. ATM मशीन कुठे पाहायला मिळते?

    उत्तर: ATM मशीन हे आपल्याला बॅंकेजवळ, एकाद्या मॉलजवळ, पेट्रोल पॅम्पजवळ, आणि शैक्षणिक किंवा ऑफिस नजीक पाहायला मिळतात.

Leave a Comment